"हूल" की "भूल"? परवा भारतीय क्रिकेटमध्ये असा एक गम्मतीशिर किस्सा घडला की ज्यामुळे सध्या क्रिकेट जगतात चर्चा सुरू आहे. C K नायडू स्पर्धेत (२३ वर्षा खालील खेळाडू) उत्तर प्रदेश आणि बंगालच्या सामन्यात उत्तर प्रदेश चा फिरकीपटू शिवा सिंह गोलंदाजी करायला आला. त्यानी सुरुवात उजव्या हाताची एक्शन करून केली, मात्र बॉल टाकायच्या आधी पूर्ण 360 अंश फिरून शेवटी डाव्या हाताने बॉल टाकला. अंपायर ने तो बॉल डेड घोषित केला. जर फलंदाज "स्विच हिट " किंवा "रिवर्स स्वीप" करू शकतात तर गोलंदाजीमध्ये असे का नाही होऊ शकत ह्या विषयावर चर्चा, मत प्रदर्शन सुरू आहेत. बघुया ICC ह्यातून काही बोध घेऊन नियमांमध्ये बदल करते का ते. तूर्तास तरी गोलंदाजाचा हा "हूल" द्यायचा प्रयत्न फसला आहे. मात्र, १९८१ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूज़ीलैंड मधील एक दिवसीय सामन्यात ट्रेवर चपल चा "अंडर आर्म" बॉल हा न्यूज़ीलैंड च्या ब्रायन मैकेंची ला "हूल" देण्यात यशस्वी झाला होता. सध्या "हूल" बाबतीत ICC तसे कठोर दिसतय, कारण एखाद्या फील्डर ने फिल्डिंग करतांना थ्रो ...
A blog on Bharat. Sports. Politics. Current affairs. Marketing. Technology. Business - Dhananjay M. Deshmukh