4 सप्टेंबर 20, मुंबई पिंजरा खाली .. संगीत क्षेत्रात ( विशेषकरून मराठी , भक्तिगीते आणि लोकगीते ) प्रसिद्ध असलेल्या शिंदेशाहीचे मूळ असलेले ज्येष्ठ लोकगायक श्री प्रल्हाद शिंदे यांनी सत्तरीच्या दशकात अनेक लोकगीते आणि हिंदी कव्वाली गायल्या होत्या . " तूच सुखकर्ता , बाप्पा मोरया रे " हे त्यांनी गायलेले मराठी भक्तिगीत सगळ्यांना ठाऊक असेलच . त्याचकाळात त्यांची एक हिंदी कव्वाली " उड़ जाएगा एक दिन पंछी , रहेगा पिंजरा खाली " प्रचंड लोकप्रिय झाली होती . मनुष्याने कितीही धन किंवा प्रसिद्धि कमवली तरी त्याचा शेवट स्मशानातच होतो , आत्मा रूपी पंछी शेवटी उडून जातो . त्यामुळे मनुष्याने जीवनात साधे सरळ ( थोडक्यात कुठल्याही गुर्मीत ना राहता ) राहावे असा त्या कव्वालीतील आशय होता. अत्यंत साध्या सोप्या भाषेत . असो . सबका अंत एक .. कुणी कितीही प्रसिद्ध , श्रीमंत झाला तरी अंत हे अबाधित सत्य आहे . जीवनाचा अमरपट्टा कुणाकडेच नाही किंवा तसा आव ही आणू नये . मग तो खेळाडू असो ...
A blog on Bharat. Sports. Politics. Current affairs. Marketing. Technology. Business - Dhananjay M. Deshmukh