Skip to main content

Posts

Showing posts from July 19, 2020

भय इथले अजून संपलेले नाही.....

20 July 20, मुंबई   भय इथले अजून संपलेले नाही ... मार्चच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील माध्यमे आणि जनता त्यावेळेस अधिवेशन , अयोध्यायात्रा इत्यादि बाबींमध्ये व्यस्त होती . राज्यकर्त्यांमध्ये , " तुम्ही अयोध्येतील राममंदिरात जाल तर आम्ही मशिदीत जाऊ " याप्रकारच्या फुशारक्या मारणे सुरू होते , माध्यमांतून ज्या विषयाला हवी तशी प्रसिद्धि दिली जात होती . अर्थात यातून कुणाची प्राथमिकता काय आहे हे स्पष्टपणे प्रतीत होत होते . जनता निमुटपणे बघत होती आणि नेहमीप्रमाणे आपले दैनंदिन कामे करीत होती . सोशल मीडिया - ट्विटर , Whatsapp, फ़ेसबुक तर चीन , इटली , ईरान मधील कोरोना संबंधित माहिती देण्यात आणि बातम्यांत गुंग होते . शेवटी बातमी धडकली - महाराष्ट्रात कोरोनाची पहिली केस पुण्यात ! दहा   मार्चची ही गोष्ट असावी,  एक ते पाच मार्च दरम्यान दुबईहून आलेले काही मुंबई , आणि पुण्याचे रहिवासी कोरोना संशयित आढळले , त्यातील काहींना कोरोना आहे हे स्पष्ट झाले . पुढील काही दिवसात कोरोनाच्...