Skip to main content

Posts

Showing posts from October 28, 2021

भारत - जागतिक लोकतंत्र ते विश्वगुरु

28 ऑक्टोबर 2021, मुंबई  भारत - जागतिक लोकतंत्र ते विश्वगुरु गेल्या सात वर्षांत भारतीय विदेश नीति बदलली की नाही याचे उत्तर आजघडीला अनेक देशांचे भारताचे असलेले सामरिक, वैचारिक, आर्थिक, विज्ञान /तंत्रज्ञान संबंधित, व्यापारिक, सांस्कृतिक संबंध बघितल्यावर लक्षांत येईल. पूर्वी एखाद्या देशाच्या विदेशनीतीच्या मूल्यमापनाची ठोकताळे होते - वैश्विक महासत्ता म्हणून ओळखली जाणारी राष्ट्रे किंवा समूह - उदाहरणार्थ अमेरिका, जर्मनी, रशिया, फ्रांस, ब्रिटन, चीन, आणि जापान, हे तुमच्या राष्ट्राला कसे देखतात, तोलतात. त्याला अजून एक जोड पश्चिम आशिया पण होते. यूनाइटेड नेशन्स, IMF, World Bank, OPEC, BRICS, G7, G20 यांसारखे आंतराष्ट्रीय समूहात तुमच्या देशाला स्थान असेल तर तो देश शक्तिशाली आहे किंवा तसे होण्याचा मार्गावर आहे याचे द्योतक होते.  गेल्या सात वर्षांत पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली या मूल्यांकन पद्धतीला नवीन कंगोरे मिळाले. फक्त महासत्ताकडे लक्ष केंद्रित करण्यापेक्षा छोटे समूह किंवा मध्यम देशांना आपले वैचारिक किंवा सामरिक मित्र कसे होतील यावर भर दिला गेला असे आढळते. व्यापारीकर...