Skip to main content

Posts

Showing posts from December 1, 2018

हलके फुलके - पारिजात

पारिजात काही ज्येष्ठ गमतिने म्हणतात की, पारिजातकाचं रोप आपल्या दारी लावु नये. कारण वाढल्यावर ह्याचे झाड, फूल शेजारी (किंवा सवतिच्या) अंगणी टाकतो. त्यामुळे लावणार्‍याचे नुकसानच!!असो, ही एक म्हण असावी... मात्र एक रोप आहे ते कधी ही आपल्या किंवा मित्र, भावंड, शेजारी, नातेवाईक ह्यांच्या मनाच्या अंगणी लागू देता कामा नये. हे रोप आहे असुयेच. हे रोपटे जेव्हा फुलते, तेव्हा लावणार्‍या ला त्याची फुले नकोच असतात. आणि गंमत म्हणजे ह्या झाडाची विषारी फुले, काटे, पाकळी, पान पाचोळा हा शेजारी (नातेवाईक) ह्यांच्या कडेच पडवा अशी लावणार्‍या ची मनोकामना असते. आणि एकदा हे झाड फुलले की ते मग आयुष्यात कधीच पडू/पाडू शकत नाही, जळू / जाळू शकत नाही.. तेव्हा, "आम्हाला काय करायचे, ज्याचे त्याच्या जवळ" ही भावना ठेवून दुर्लक्ष करणाऱ्यांची मात्र दैना (आर्थिक, मानासिक, शारीरिक) होते. तेव्हा जो कोणी (मित्र, भावंड, नातेवाईक) ह्या असुये च्या बीज पोषित असेल त्याच्या कडे दुर्लक्ष करू नका, बीजारोपण व्हायच्या आधीच असूया धरणाऱ्या व्यक्ति शी सुसंवाद साधा, समजवा..हे विषारी रोपटे लागू देऊ नका. अजून एक रोपटे आ...