२४ नोव्हेंबर २०२२ वीर-गाथा: ईशान्य भारताचे वीर लचित बोरफुकन आज २४ नोव्हेंबर म्हणजेच “लचित दिवस"-अहोम सैन्याचे कमांडर आणि आसामी राष्ट्रवादाचे प्रतीक श्री लचित बोरफुकन यांची ४००वी जन्मजयंती. (अहोम साम्राज्याने आसामला सुमारे ६५० वर्षे स्वतंत्र ठेवले. अहोमांनी खिलजीपासून औरंगजेबापर्यंत सर्वांचा पराभव केला). काल पासून नवी दिल्लीतील विज्ञान भवनात दोन दिवसीय कार्यक्रम सुरु आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहिलेत, या प्रसंगी आंतरराष्ट्रीय चर्चासत्र आणि प्रदर्शनाचे आयोजन केले गेले. आज २४ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी लचित बोरफुकनवरील एक पुस्तक राष्ट्राला समर्पित करतील. लचित बोरफुकन यांच्या जीवनावर आधारित माहितीपटाच्या स्क्रीनिंगचे उद्घाटन गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. हा चित्रपट नंतर अनेक प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखवला जाईल. काही महिन्यांपूर्वी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी इतर राज्यांतील त्यांच्या समकक्षांना पत्र लिहून त्यांच्य...
A blog on Bharat. Sports. Politics. Current affairs. Marketing. Technology. Business - Dhananjay M. Deshmukh