१७ डिसेंबर २२ , मुंबई धनंजय देशमुख मुंबई - हवा बदलत आहे .. " सीने में जलन आँखों में तूफान सा क्यों है इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है" गेल्या दोन - तीन आठवड्यांपासून मुंबई मध्ये दिल्लीच्या हवेचा फील यायला लागलाय . येथील हवेतील आर्द्रता (humidity) ऑक्टोबर ते डिसेंबर मध्ये कमी होतेच , त्यामुळे हवा हल्की गरम किंवा थंड होते , मात्र या वर्षी हवेची गुणवत्ता खालावली आहे . एयर क्वालिटी इंडेक्स , म्हणजे हवेचा गुणवत्ता निर्देशांक कमालीचा वाढला आहे . काही दिवसांपुर्वी तो धोकादायक पातळीवर गेला होता . सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्चनुसार , मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक ९ डिसेंबरला दिल्लीपेक्षा (262) बराच जास्त 308 होता . या हिवाळ्यात मुंबईशहराचा AQI देशाच्या राजधानीपेक्षा जास्त होण्याची ही दुसरी वेळ आहे . आजघडीला मुंबईतील सध्याचे PM2.5 एकाग्रता WHO द्वारे 24 तास हवा गुणवत्ता मार्गदर्शक तत्त्वे दिलेल्या शिफारस केलेल्या मर्यादेपेक्षा 4.3 पट जास्त आहे...
A blog on Bharat. Sports. Politics. Current affairs. Marketing. Technology. Business - Dhananjay M. Deshmukh