Skip to main content

Posts

Showing posts from June 10, 2020

राजकीय पटलावरील विदूषक / जोकर

10 जून 20, Mumbai राजकीय पटलावरील विदूषक / जोकर परवा भाजपने "महाराष्ट्र संवाद रैली" आयोजित केली होती - अर्थात ऑनलाईन. या कार्यक्रमात गृहमंत्री श्री राजनाथसिंह यांनी महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरू आहे असे म्हंटले. याचा व्हायचा तो परिणाम झाला. महाआघाडी कडून अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यात महत्वाची म्हणजे, ज्येष्ठ नेते श्री शरद पवार यांची - "महाराष्ट्र सरकारमध्ये विदूषकाची गरज आहे". अर्थात, हे सगळे एकमेकांवर राजकिय कोटी करण्यासारखे असले तरी त्यात काही खोटे नाही. आपण फक्त खेळ बदलला की तोच विदुषक, म्हणजे जोकर, अत्यंत महत्वपूर्ण होऊन जातो. भाव खातो. सर्कस बघण्याएवजी जर आपण पत्त्याची रमी खेळली तर? रमी मध्ये जोकराला अनन्य साधारण महत्व असते, कारण तो कुठलीही अपूर्ण जोडी पूर्ण करू शकतो. अर्थात काही गंभीर खेळाडू, जोकरा बद्दल नियम लावुन खेळतात - जसे कुठल्या जोडीत तो वापरु शकतो, कितवा नंबरचा तो पत्ता असू शकतो. खरे तर, गंभीरतेने रमी खेळणाऱ्यांनी जोकरचा वापरच करू नए, म्हणजे, "Pure" जोडी होते. खेळ चांगला होतो. जोकर कधी असतो कधी नसतो. तो असला की खेळातील ...