10 जून 20, Mumbai
राजकीय पटलावरील विदूषक / जोकर
परवा भाजपने "महाराष्ट्र संवाद रैली" आयोजित केली होती - अर्थात ऑनलाईन. या कार्यक्रमात गृहमंत्री श्री राजनाथसिंह यांनी महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरू आहे असे म्हंटले. याचा व्हायचा तो परिणाम झाला. महाआघाडी कडून अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यात महत्वाची म्हणजे, ज्येष्ठ नेते श्री शरद पवार यांची - "महाराष्ट्र सरकारमध्ये विदूषकाची गरज आहे". अर्थात, हे सगळे एकमेकांवर राजकिय कोटी करण्यासारखे असले तरी त्यात काही खोटे नाही.
आपण फक्त खेळ बदलला की तोच विदुषक, म्हणजे जोकर, अत्यंत महत्वपूर्ण होऊन जातो. भाव खातो. सर्कस बघण्याएवजी जर आपण पत्त्याची रमी खेळली तर?
रमी मध्ये जोकराला अनन्य साधारण महत्व असते, कारण तो कुठलीही अपूर्ण जोडी पूर्ण करू शकतो. अर्थात काही गंभीर खेळाडू, जोकरा बद्दल नियम लावुन खेळतात - जसे कुठल्या जोडीत तो वापरु शकतो, कितवा नंबरचा तो पत्ता असू शकतो. खरे तर, गंभीरतेने रमी खेळणाऱ्यांनी जोकरचा वापरच करू नए, म्हणजे, "Pure" जोडी होते. खेळ चांगला होतो. जोकर कधी असतो कधी नसतो. तो असला की खेळातील मजा निघून जाते. निष्णातपणा दाखविता येत नाही.
कॅरम मध्ये जसा "थम" सहसा खेळला जात नाही त्याच पद्धतीने जोकर हद्दपार करून रमीचा डाव खेळणे. असो.
राजकारणातसुद्धा जोकर असतात. असावेच लागतात. मनोरंजन करणारे तर असतातच, परंतु महत्वाचे असतात ते जोड्या पूर्ण करणारे. काही त्यांना "पपलू (go to, conduit)" असेही म्हणतात.
जर श्री पवार यांसारखी ज्येष्ठ राजकारणी व्यक्ति, महाराष्ट्राच्या सरकारमध्ये जोकर (जोड्या पूर्ण करणार्या) ची कमतरता आहे असे म्हणत असेल तर ते महत्वपूर्ण आहे. विशेषतः जेव्हा माध्यमातून तिन्ही पक्षात समन्वय नसल्याच्या बातम्या दर दोन-चार दिवसांनी झळकतात तेव्हा.
असे एक चित्र निर्माण झाले आहे की महा आघाडीतील तिन्ही पक्षांत प्रचंड बेबनाव आहे, संघर्ष आहे, प्रशासकीय अधिकार्यांना मंत्र्यांना सोबत घेऊन काम न केल्यामुळे डटावल्याच्या बातम्या येतात आहेत. अर्थात यातील बर्याच बातम्या रंगवून सांगितल्या जात असतिल. काही जाणून बुजून पेरल्या सुद्धा असतिल - कवर फायरिंग करतात तश्या, जेणेकरून जनतेचे, माध्यमांचे किंवा विरोधी पक्षाचे लक्ष दुसरीकडे जाईल. कुछ भी हो सकता है.
राजकारणातील "जोकर (ज्याला पपलू सुद्धा म्हणतात)"
विनोदाचा भाग सोडून, राजकिय विषयक बोलुया. राजकीय जोकर म्हणजे, नैसर्गिकरित्या एकमेकांसोबत ना जाणार्या राजकिय पक्षांना सोबत आणण्याची किमया करणारे व्यक्तिमत्त्व. त्यामुळे या लिखाणातील राजकीय जोकर ही संज्ञा (उपाधि / शब्द उपयोग) केवळ त्याचदृष्टीने बघावी. यात कुणालाही कमी लेखण्याचा किंवा त्यांची थट्टा करण्याचा किंवा अपमान करण्याचा प्रयत्न नाही.
स्वयंभूरूप
हे राजकीय जोकर कुठूनही कधीही उगवू शकतात. अगदी सरपंचापासून तर राज्याच्या किंवा देशाच्या राजकारणात भूमिका बजावतात. काही राजकारणी पक्षच नेहमी पपलूच्या भूमिकेत असतात. आयुष्यभर. अर्थात, या पपलूचे हितसंबंध जो पर्यंत राखले जातात. काही पपलू, आपण किंगमेकर आहोत असा आभास निर्माण करतात, जरी प्रत्यक्षात त्यांच्या कार्यमर्यादा किंवा किम्मत फार कमी असेल तरीही (शोले सिनेमामध्ये , जसा लाकडी तुकड्याचा बंदूक म्हणुन आव आणला जातो तसा, अर्थात याला गंभीरतेने घेणारा सुद्धा एक मूर्ख "अंग्रेजो के ज़माने का जेलर" असावा लागतो).
अनेक प्रादेशिक पक्ष, किंवा नेते, ही भूमिका जोरकसपणे पार पाडतात. त्यासाठी त्यांना नेहमी सरकार मध्ये राहणे गरजेचे असते असेही नाही. उदाहरणार्थ, जेव्हा कधी संसदेत किंवा विधीमंडळात एखादा प्रस्ताव पारित करायचा असेल किंवा होऊ नसेल द्यायचा, तेव्हा हे, राजकीय जोकर (पत्यांतील पपलू) आपली भूमिका बजावतात. कुठल्याही बाजूने, विजय त्यांचाच असतो. शेअर मार्केट मधील शॉर्टटर्म ट्रेडिंग सारखे असते हे. काम खत्म, खेल खत्म.
या भूमिकेत असलेले अनेक राजकिय नेते, पक्ष आपण बघितले आहेत. अजूनही बघत आहोत. प्रत्येक राजकिय पक्षात सुद्धा राजकिय जोकर (पपलू), अनेकदा पक्षांतर्गत वादामध्ये भूमिका निभावतात. जोड्या जुळवून आणतात.
अर्थात, पाहिजे त्याला आणि पाहिजे तेव्हा जोकर मिळवून देणे हे सुद्धा मोठे काम असते. त्याला अनेक विशेषगुण लागतात - अर्थकारण करता येणे हा गुण असावाच लागतो, परंतु त्याहूनही अनेकदा मनुष्यकारण म्हणजे नेटवर्किंग हा गुण आधी असायला हवा. त्यासाठी अनेकदा नेहमी चहापेक्षाही गरम असलेल्या केटलीला पुजावे लागते, अर्थात आजकाल सगळीकडे पुजारी असतातच. राजकीय लोकच जोड्या लावून देतात असेच काही गरजेचे नाही. कधी-कधी कलाकार, संपादक, पत्रकार, आध्यात्मिक गुरु, व्यापारी किंवा राजकीय विश्लेषक, कन्सल्टंट हे सुद्धा पडद्याआड किंवा "सूर्यप्रकाशात उजळ माथ्याने" राजकिय जोकरची (पपलूची) भूमिका बजावतात. जोड्या घडवून आणतात.
राजकीय जोकर, आपले सगळ्या पक्षांत मित्र आहेत असे सतत भासवत असतात. तशी गरजच असते, नाहितर त्यांचे अस्तिव धोक्यात येते
असे म्हंटले जाते, भारताच्या राजकिय पटलावर शरदराव पवार यांचे जेवढे मित्र असतिल तेवढे कुणाचेच नसावेत. अर्थात यात अतिशयोक्ती असू सुद्धा शकते. परंतु, आजकाल प्रत्येक मोठ्या राजकिय पक्षात "मैत्रीकार" असतात. असावेच लागतात. एक काळ असा होता की राजकीय मतभेद असले तर एक प्रकारचा अबोला राहायचा. आता काळ बदलला आहे. राजकिय मतभेद वेगळे, व्यक्तिगत मैत्री वेगळी असे मानणारे व्यवसायिक राजकारणी आजकाल सगळीकडे दिसतात. त्याच व्यक्तिगत मैत्रीचा हात पुढे करून राजकिय गळाभेटी घडवितात, नवीन सूत्र तयार करण्यात हातभार लावतात.
राजकारणात मैत्री आणि शत्रुता कायम राहत नसली तरी, एक फॉल्ट लाइन (भ्रंश / दोष रेषा) नेहमी राहते. याच रेषेचा वापर करून, काही चाणाक्ष राजकारणी तिला अंत:प्रवाहात परिवर्तीत करतात, आणि त्या प्रवाहाला वेग देऊन साधायचे ते साधतात. आपल्याला पाहिजे तशी भाकरी फिरवतात.
महाराष्ट्रातील आजची राजकीय परिस्थिती स्थिर आहे असे म्हणणे अतिशयोक्तीचे होईल. भाजपला, आणि विशेष करून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी केलेली ही जुळवाजुळव आहे. त्यात बराच अंतर्विरोध आहे. हा अंतर्विरोध फक्त तीन पक्षांमध्ये आहे असेही नाही, या तिन्ही पक्षांमधील नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याच पक्षाच्या भूमिकवरुन अंतर्विरोध आढळतो.
काही राजकीय विश्लेषकांच्या भाकितानुसार याच अंतर्विरोधामुळे महाराष्ट्रात लवकरच राजकीय बदल घडतील. असे म्हंटले जातेय. परंतु, हे जर व्हायचे असेल तर महाराष्ट्रातील राजकिय जोकरांना (पपलू) जागृत करण्याची हीच ती वेळ. मात्र यावेळी ह्यांची भूमिका दूरगामी असावी लागेल, जेणेकरून महाराष्ट्रात पुढचे चार वर्षे राजकिय स्थैर्यता नांदायलाच हवी. वैश्विक कोरोना महामारीमुळे होत असलेल्या जिवित, आर्थिक आणि मानसिक हानीमुळे महाराष्ट्राच्या बारा कोटी च्या भल्यासाठी, राज्यात राजकिय स्थैर्यता अत्यंत गरजेची आहे.
कुणीतरी म्हंटले आहे -
अर्थात जोकर हा नेहमीच गरजेचा असतो असेही नाही. काही गंभीर खेळाडूंना त्यांच्या कौशल्यावर भरोसा असतो. आपल्याकडे जोकर नसतानाही जिंकण्याचे कसब त्यांच्याकडे असते. कदाचित त्यांच्या मनात हे असेल-
येणारा काळच दाखवेल की महाराष्ट्राच्या राजकिय पटलावर कोण एक्का, बादशहा किंवा जोकर म्हणुन पुढे येतो ते.
शुभम भवतु!
धनंजय मधुकर देशमुख, मुंबई
Dhan1011@gmail.com

"ताश का जोकर और अपनों की ठोकर
अक्सर जिंदगी की बाजी घुमा देते है'
अर्थात जोकर हा नेहमीच गरजेचा असतो असेही नाही. काही गंभीर खेळाडूंना त्यांच्या कौशल्यावर भरोसा असतो. आपल्याकडे जोकर नसतानाही जिंकण्याचे कसब त्यांच्याकडे असते. कदाचित त्यांच्या मनात हे असेल-
"खेल ताश का हो या जिंदगी का,
अपना ईक्का तब ही दिखाना जब सामने बादशाह हो! "
येणारा काळच दाखवेल की महाराष्ट्राच्या राजकिय पटलावर कोण एक्का, बादशहा किंवा जोकर म्हणुन पुढे येतो ते.
शुभम भवतु!
धनंजय मधुकर देशमुख, मुंबई
Dhan1011@gmail.com
महाराष्ट्रात सत्तांत्तर होणे शक्य नाही कारण शीवसेनेला माहिती आहे की जर आता ते सत्तेतुन बाहेर फेकल्या गेले तर मतदार त्यांना चांगला धडा शीकवतील.अन त्याकरिता त्यांनी हिंदुत्वादि आपली इमेज पूर्ण बदललेली आहे.सत्तेसाठी कॅांग्रेस अन राष्टवादि कोणतीहि तडजोड मान्य करतील.
ReplyDeleteराहिला राहिला प्रश्ण सर्कस चा तर संजय राऊत अन स्वतः पवारांनी च हे कबूल केल आहे की अनेक पक्षाचे सरकार चालवणे म्हणजे सर्कस चालवीणे सारखच आहे.परंतु एका जेष्ठ नेत्याने एका जेष्ठ नेत्यांना विदूषक म्हणने योग्य नाही.
🙏 समय बलवान होता है
Delete