8 जून 20, मुंबई विचारमालिका - जे-जे सुंदर आणि शुभंकर, पूर्णत्वा ते नेई - मुकुटमणी "जे-जे सुंदर आणि शुभंकर, पूर्णत्वा ते नेई..." किती सुंदर ओळी आहेत या! "शाबास सूनबाई" चित्रपटातील (1986) "माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझीया येई" या गीतातिल (गायिका स्वरसाम्राज्ञी लता मंगेशकर, रचना सुधीर मोघे, संगीत मीना मंगेशकर) आहेत. असो. जम्मू आणि काश्मीर हा भारतामातेचा मुकुट आहे असे म्हंटले जाते. एकप्रकारे ते खरेही आहे. 7 जून 1952 ला जम्मू आणि काश्मीर च्या विधिमंडळात एक ठराव झाला, ज्यात राज्याची स्वतंत्र ओळख म्हणुन वेगळा ध्वज असावा हा प्रस्ताव पारित केला गेला. तेव्हापासुन गेल्या 67 वर्षे राज्यसरकार प्रत्येक 7 जूनला राज्याचा वेगळा ध्वज फडकावून हा दिवस साजरा करायची. भारत हा एक सार्वभौम देश आहे, आणि सगळी राज्ये त्याची घटके आहेत, त्यामुळे वेगळा राज्यध्वज ही परिकल्पना इतर कुठल्याही राज्यात नजीकच्या काळात तरी नव्हती. जम्मू आणि काश्मीरलाच ही सवलत का होती? जम्मू आणि काश्मीर चे विलिनीकरण हे अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत झाले, अस...
A blog on Bharat. Sports. Politics. Current affairs. Marketing. Technology. Business - Dhananjay M. Deshmukh