Skip to main content

Posts

Showing posts from July 21, 2021

कोण आहे नेता नीओ मिलेनियल्सचा?

21  जुलै 2021, मुंबई कोण आहे नेता नीओ मिलेनियल्सचा ? वैश्विक शोधकार्य करणार् ‍ यांनी जन्मकाळाप्रमाणे पिढ्यांचे नामकरण केले आहे . उदाहरणार्थ , जे 1946-64 दरम्यान जन्मले त्यांना “ बेबी बूमर्स ” असे म्हणतात. 1965-80 दरम्यान जन्मलेल्या पिढीला जनरेशन एक्स (Gen X) म्हणतात  जी पीढ़ी 1981-96 या काळात जन्मली त्यांना " मिलेनियल्स (Millennials)" किंवा “ जनरेशन वाय (Gen Y)” असे म्हणतात. जे 1997-2005 मध्ये जन्मले त्यांना " जनरेशन झेड (Gen Z)" असे म्हणता त. त्यानंतरच्या पिढीला  जनरेशन झेड नेक्स्ट म्हणता येईल.  2010 नंतर जन्मलेल्या पिढीला " जनरेशन अल्फा (Gen Alpha)” असे म्हणतात . शास्त्रज्ञांच्या मते दर पिढीगत वैचारिक मत , बोलण्याची तर् ‍ हा , विचार करण्याची पद्धत आणि जीवनाचा दृष्टिकोन बदलतो . प्राथमिकता बदलतात . काळानुसार तंत्रज्ञान विकसित झाले , प्रगल्भ झाले . त्याचा वापर प्रत्येक पिढीने आपापल्या पद्धतीने केला . प्रत्त्येक पिढीने आपला परिवार बदलताना बघितला , आपले परिसर बदलताना बघितले , त्यांच्या ...