Skip to main content

Posts

Showing posts from November 12, 2020

दीपोत्सव , तिखट+ गोड, आणि बरेच काही ....

12 नोव्हेंबर 20, मुंबई आहे तेच , तरीही ... बर्‍याच लोकांनी कधीतरी टॉम क्रूस याचे मिशन इम्पॉसिबल (MI) नावाचे सिनेमे बघितले असतील . 1996 मध्ये सुरू झालेली आणि आज पर्यंत सहा सिनेमे असलेली ही सिरीज दर दोन - तीन वर्षात एक नवीन सिनेमा घेऊन येते . पुढच्या दोन वर्षांत MI-7 आणि MI-8 येतील . आज पर्यंत आलेले MI सिरीजचे सहा सिनेमे , USD 828 मिलियन म्हणजे जवळपास सहा हजार कोटी रुपये ( आजच्या चलनदरात मोजले तर ) खर्च करून बनविले आहे . त्यांची जागतिक कमाई सुद्धा तेवढीच घसघशीत आहे , USD 3.57 बिलियन म्हणजे जवळपास 26-27,000 कोटी रुपये !! काय आहे MI चे वैशिष्टय़ ?   तसे बघायला गेले तर विशेष असे काहीच नाही . प्रत्येक MI सिनेमाची जडणघडण सारखीच असते . बहुतांश वेळी कथानक रशिया किंवा पूर्व यूरोप मध्ये असतो , आतंकवादी किंवा शस्त्रांचे तस्कर यांना काबू करण्यासाठी IMF नावाची संस्था त्यांच्या तरबेज एजेंट ईथान हंट ( टॉम क्रूस ) ला तीन चार सहकारी देऊन एक मोहीम आखून देते . प्रत्येक सिनेमात...