Skip to main content

Posts

Showing posts from November 14, 2020

तिमिरातूनी तेजाकडे

14 नोव्हेंबर 20, मुंबई तिमिरातूनी तेजाकडे..  आज कार्तिक अमावस्या. अशी मान्यता आहे की अमावस्याची तिथि देवी श्रीमहालक्ष्मी यांना प्रिय आहे. ब्रह्मपुराणानुसार आज श्रीमहालक्ष्मी देवी पृथ्वीतलावर येतात. महाभारतात शांतीपर्वात भगवान श्रीकृष्णाने कार्तिक अमावस्याबाबतीत वचन दिले होते. याच दिवशी चौदा वर्षांचा वनवास भोगून, रावणाचा नाश करून प्रभु श्रीराम अयोध्येला परतले होते. त्यांच्या स्वागतासाठी लक्ष लक्ष दीप प्रज्वलन करून सगळीकडे रोषणाई करण्यात आली होती. आस्था अशीही आहे की पितृपक्षात धरातलावर आलेले पितृगणांना, पितृलोकात परतायला त्रास होऊ नये म्हणून दिवे लावणी केली जाते. तेव्हा कार्तिक अमावस्या ही एक महत्वपूर्ण तिथि आहे. आपण या तिथीला रात्री श्रीलक्ष्मीपूजन करतो, आणि दिवे लावतो. एकाप्रकारे अमावस्येला असलेला दाट अंधार, दिव्यांच्या पवित्र अग्निमुळे दूर होतो. ॐ असतो मा सद्गमय । तमसो मा ज्योतिर्गमय । थोडक्यात, अन्धकारातुन प्रकाशकडे , तिमीराकडुन तेजाकडे असा हा प्रवास आहे, पर्व आहे. दीपोत्सवाच्या पवित्र तेजाने दुःख, अज्ञान, दारिद्र्य, रोग तडीस जाऊन सुख, ज्ञान, सं...