Skip to main content

Posts

Showing posts from June 16, 2020

तू चाल पुढं, तुला र गड्या भीती कशाची

१६ जून २०२० मुंबई  तू चाल पुढं, तुला र गड्या भीती कशाची 3 जून ला कोकण किनारपट्टीवर "निसर्ग" नावाचे चक्रीवादळ आदळले. सुमारे 100-120 किमीच्या वेगाने वारा, पाऊस आणि ढग यांचे मिश्रण असलेले हे चक्रीवादळ रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात थैमान घालून पुढे  गेले. अन्य जिल्ह्यात सुद्धा नुकसान झाले. सुपारी/पोफळी, नारळ, काजू, आंबा, कोकम इत्यादी, लागवडीच्या बागा/वाड्या जमीन दोस्त झाल्यात. जी झाडे सध्या उभी आहेत ती चांगली आहेत का, किंवा किती दिवस उभी राहतील याची काही शाश्वती नाही. बर्‍याच ठिकाणी मोठी झाडे आंबे, फणस सुद्धा उन्मळून पडली. एक झाड कापून न्यायचे, दोन हजार. छोट्या वाडय़ांमध्ये सरासरी पन्नास ते साठ झाडे असतात. म्हणजे एक दीड लाख रुपये खर्च फक्त झाडे तोडून, जागा साफ करून घेण्यासाठी. बर्‍याच ठिकाणी अजून नियमित वीज पुरवठा नाही. एरवी चारशे पाचशे रुपयांचा पत्रा आठशे नऊशे ला विकला जातोय. लावायला लागणारी माणसे कमी, कामे जास्त. कौलारू घरासाठी लागणारे कौलं सुद्धा अव्वाच्या-सव्वा भावात विकले जात आहेत. त्यात आता पुन्हा, समोर मॉन्सून उभा ठाकलेला. म्हणजे पुढच्या तीन चार महिन्या...