28 जून 20, मुंबई शिक्षणव्यवस्था - एक अवलोकन वैश्विक कोरोना महामारीमुळे देशात अनेक संकटे उभी झाली . अर्थव्यवस्था , आरोग्यव्यवस्था , सामाजिकव्यवस्था , आणि कायदा सुव्यवस्था , सगळ्यांनावर अतोनात भार पडला , कधी आले नाही असे अनेक नवीन प्रश्न पुढे ठाकले . या सगळ्या व्यवस्था सावरण्याचे प्रयत्न केंद्र आणि राज्यसरकारे करीत आहेत . या संकटामुळे एक मोठे आव्हान ठाकले ते शिक्षण व्यवस्थेवर ! लॉकडाऊन मुळे शाळा , महाविद्यालये बंद करण्यात आली . काहींच्या परीक्षा झाल्या होत्या काहींच्या नाही . तीन महिन्याचा कालावधी मोठा आहे , त्यामुळे अनंतकाळ शाळा , महाविद्यालये बंद करून चालणार नाही . याला उपाय म्हणुन ऑनलाईन शिक्षण सुरू झाले . काही ठिकाणी इंटरनेट नेटवर्क , स्पीड , मुलांकडे मोबाईल किंवा कॉम्प्युटर नसणे असे अनेक तांत्रिक मुद्दे उपस्थित झालेत . लॉकडाऊन मुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा राहून गेल्या . आता त्या परीक्षा घ्याव्या की नाही यावरून राज...
A blog on Bharat. Sports. Politics. Current affairs. Marketing. Technology. Business - Dhananjay M. Deshmukh