Skip to main content

Posts

Showing posts from June 20, 2020

भरलेले ताट आणि कुरकुरणारी खाट

20 जून 20 भरलेले ताट आणि कुरकुरणारी खाट ..   परवा एका मित्राच्या मुलाशी बोलणे झाले . नोकरीच्या कारणाने हा मुलगा आपल्या आईवडिलांपासून लांब राहत होता . लग्न व्हायचे होते त्यामुळे , समवयस्क मित्रांसोबत रहायचा . बोलता बोलता म्हणाला की सध्या जिथे राहतो तिथले फर्निचर जुनाट आहे , टेबल डगमगतो , खुर्च्या आवाज करतात . माझ्या माहितीप्रमाणे आधी तो एका मित्रासोबत त्याच्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये राहत होता , तेव्हा तिथले फर्निचर एकदम नवीन आणि व्यवस्थित होते . जेव्हा मी हे त्याला मी सांगितले तर म्हणाला , की आता तो दुसर्‍या मित्रांसोबत राहतो , आधीच्या मित्रा सोबत भांडण झाले ( की केले ?) तेव्हापासुन तो एका जुन्या पण फारसे सौख्य नव्हते म्हणुन दूर राहणार्‍या मित्रा च्या फ्लॅट मध्ये भाड्याने राहतोय . फ्लॅट नवीन दिसत असला तरी आतून फार काही व्यवस्थित नाही , त्याच्या या " जुन्या पण नवीन " मित्राने भावड्याचे फर्निचर आणून टाकले , ते सुद्धा जुने पुराणे . खायचे वांधे आहेत . स्टोव आह...