तर.. प्रवाहाबाहेर फेकले जाऊ शकाल... नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने भाजप शिवसेना रिपाई महायुतीला ठोस बहुमत दिले. महायुतीच्या 165 जागा आल्यात, त्यात काही अपक्ष, बंडखोर आमदारांची सुद्धा भर पडू शकते, आणि हा आकडा 175-180 पर्यंत जाऊ शकतो. 2014 मध्ये सत्ता स्थापित झाल्यावर, दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे युतीचे संख्याबळ 185 झाले होते. तेव्हा या दोन संख्याबळामध्ये फार काही मोठा फरक नाही. संख्येचे दृष्टीने फार मोठा तोटा नाही. महायुती, देवेन्द्र फडणवीस यांचे नेतृत्व लाभलेल्या सरकारची स्वच्छ कामगिरी, हिंदुत्व, आणि केंद्रातील विकासशील नेतृत्व घेऊन जनतेत गेली. लढली. 288 पैकी 175-180 मतदार संघात महायुतीच्या विचारधारेला बळ मिळाले. हिन्दुत्व हा मुद्दा अजून अधोरेखित झाला. भाजप आणि शिवसेनेची युती ही हिंदुत्वाचा भरभक्कम विचार संवर्धित करण्याच्या, आणि त्याला पुढे नेण्याच्या एकमतावर झालेली आहे. हिंदुत्व विचारधारेचा नैसर्गिक प्रवाह म्हणुन ही युती अबाधित राहिली आहे. तुटली, जुळली परंतु प्रवाह एकत्र राहिला. मोठा झाला. महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून येण्यासाठी बहुतां...
A blog on Bharat. Sports. Politics. Current affairs. Marketing. Technology. Business - Dhananjay M. Deshmukh