तर.. प्रवाहाबाहेर फेकले जाऊ शकाल...
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने भाजप शिवसेना रिपाई महायुतीला ठोस बहुमत दिले. महायुतीच्या 165 जागा आल्यात, त्यात काही अपक्ष, बंडखोर आमदारांची सुद्धा भर पडू शकते, आणि हा आकडा 175-180 पर्यंत जाऊ शकतो.
2014 मध्ये सत्ता स्थापित झाल्यावर, दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे युतीचे संख्याबळ 185 झाले होते. तेव्हा या दोन संख्याबळामध्ये फार काही मोठा फरक नाही. संख्येचे दृष्टीने फार मोठा तोटा नाही.
महायुती, देवेन्द्र फडणवीस यांचे नेतृत्व लाभलेल्या सरकारची स्वच्छ कामगिरी, हिंदुत्व, आणि केंद्रातील विकासशील नेतृत्व घेऊन जनतेत गेली. लढली. 288 पैकी 175-180 मतदार संघात महायुतीच्या विचारधारेला बळ मिळाले. हिन्दुत्व हा मुद्दा अजून अधोरेखित झाला.
भाजप आणि शिवसेनेची युती ही हिंदुत्वाचा भरभक्कम विचार संवर्धित करण्याच्या, आणि त्याला पुढे नेण्याच्या एकमतावर झालेली आहे. हिंदुत्व विचारधारेचा नैसर्गिक प्रवाह म्हणुन ही युती अबाधित राहिली आहे. तुटली, जुळली परंतु प्रवाह एकत्र राहिला. मोठा झाला.
महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून येण्यासाठी बहुतांश हिंदुत्ववादी संस्थांनी संपूर्ण ताकद लावली होती - मग ते भाजप साठी असो की शिव सेने साठी. विशेषत मुंबई किंवा इतर ठिकाणी संपूर्ण यंत्रणा लाऊन हिंदुत्वाचा तिरस्कार करणार्या कपाळ करंट्यांचा पराभव घडून आला. उदाहरणार्थ मुंबईतील चांदिवली विधानसभा किंवा भायखळा ह्या जागांवर हिंदुत्वाचा जयघोष झाला. ह्या दोन्ही जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले हे नमूद करणे अत्यंत महत्वाचे आहे.
आज, निवडणुकीच्या निकालानंतर 27वा दिवस आहे, परंतु ज्वलंत हिंदुत्वाचा प्रसार करणार्या पक्षाचे नेते अजूनही सत्ता स्थापनेस भाजप सोबत येण्यास उत्सुक दिसत नाहिये.
किंबहुना, माध्यमातील बातम्यांची दाखल घेतली तर ज्वलंत हिंदुत्वाचा प्रसार करणारे नेते, अमन शांती, सर्वधर्म समभावचा दैवी नारा देणार्या (कॉंग्रेस), आणि सदैव समय सूचकता पाळणार्या (रा कॉन्ग्रेस) यांच्या सोबत घरोबा करण्यात उत्सुक आहे असे आढळते.
पक्षीय विचारधारा, मतदारांचा विश्वास, किंवा भविष्यात पाच राज्यांत होणार्या निवडणुका यांचा विचार करून सर्वधर्म समभाव वाला गट, ज्वलंत हिंदुत्वाचा प्रसार करणार्या गटासोबत जाणार नाही हे सगळे माध्यमांनी, माध्यमांसाठी मांडलेले थोतांड आहे.
माझ्यामते राजकारणात अलीकडच्या काल काय घडले, आणि नजीकच्या आज आणि उद्या मध्ये काय वाईट घडू नये यावर सगळ्या खेळी असतात. विशेष करून जेव्हा एखादा राष्ट्रीय पक्ष केंद्रात सत्तेत नसतो तेव्हा, एखाद्या राज्यात त्याच्याच कट्टर विरोधकासोबत जाण्याचे नुकसान अधिक, कि ना जाण्याचे फायदे अधिक यावर पक्षाचे मोठे नेते गणित मांडतात. जुळवतात.
काळ बदलला, वृत्ती बदलली. दिखावा, पेहराव बदलला असेच झाले. पक्षांनी आपापल्या जागा सुद्धा बदलल्या.
अमन शांती, सर्वधर्म समभाव, समानता ह्या गोष्टींच्या गमजा मारणाऱ्या पक्षाला, आपला नेता नुसता हिंदू नव्हे तर "जनेउधारी ब्राह्मण "आहे घोषित करावे लागले. "सॉफ्ट हिंदुत्व" या तकलादू मानसिकतेचा टेकू घ्यावा लागला. हा टेकू काही टिकला नाही हे मात्र गेल्या दीड वर्षात जगजाहीर झाले आहे. त्यांचे टेम्पल रन बंद झालेत.
आता ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणार्यांची वेळ आहे. दर्ग्यात जाऊन चादर चढविणे आणि इतर दुसर्या सांकेतिक गोष्टींनी मवाळ छवी साकारली जातेय का? खरेतर मागच्या पाच-सात वर्षात फक्त हिन्दुत्व या बिंदू वर या संघटनेने किती मोहिमा आखल्या आणि त्या पूर्णत्वास नेल्या हे सुद्धा बघणे गरजेचे आहे. त्यामुळे, मुळातच हिन्दुत्व हा आयाम यांना आता खरच हवा आहे का हे ही तपासून घेणे गरजेचे आहे.
गमतीची गोष्ट अशी आहे या दोन्ही पक्षांना त्या-त्या काळात सल्ला देणारे स्वयंघोषित चाणक्य एकच आहेत!! या स्वयंघोषित चाणक्यांनी आधी बिहार, आणि आता पश्चिम बंगालच्या प्रादेशिक पक्षांना आपल्या ज्ञानदानात सामील केल्याचे समजते. असो.
महाराष्ट्रातिलच जनता नव्हे तर संपूर्ण भारतातील , किंबहुना विदेशातील मंडळी सुद्धा महाराष्ट्राच्या राजकिय घडामोडी घडामोडींकडे पूर्ण लक्ष देऊन आहे. महाराष्ट्र एक उद्योगशील आणि उद्यमशील राज्य आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई चे राज्य आहे.
जनमानसाच्या अपेक्षेप्रमाणे जर महायुतीचे शपथग्रहित नाही झाले तर हा महाराष्ट्राच्या जनादेशाचा अवमान होईल. विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर युती ठरत असतांना दोन्ही पक्षांच्या वाटाघाटीत, विशेषतः शिवसेनेच्या मुख्यमंत्री पदाच्या मागणीवर विचार झाला नसेल मुळातच हास्यास्पद वाटते.
आता जर ठरलेल्या कार्यक्रमातून कुठलाही एक पक्ष हात बाहेर काढत असेल तर हा हिंदुत्ववादी विचारसरणीचा अपमान असेल.
हिंदुत्वाच्या नैसर्गिक प्रवाहावर आरूढ होऊन सत्तेचे इमले रचणाऱ्या सत्तापिपासू मंडळीने या पवित्र प्रवाहाशी केलेली कुचंबणा आगामी काळात अश्या क्रोधित लाटेला जन्म देईल की असली विघ्नसंतोषी मंडळी (मग ते पक्ष क्षेत्रीय असो की राष्ट्रीय), ती संपूर्णपणे प्रवाहाबाहेर फेकली गेली तर आश्चर्य नसावे. दोन पक्षातील या संघर्षाला खतपाणी घालण्याचे पातक राष्ट्रीयपक्षातिल स्थानिक किंवा क्षेत्रीय पातळीवरील काही मंडळी करीत असतिल तर त्यांना सुद्धा या प्रवाहाच्या कोपाचा फटका बसला तर त्यात काही आश्चर्य वाटायला नको.
अर्थात, ज्वलंत विचारांचे पुरस्कर्ते हिंदुत्ववादी संघटनांच्या भावनेची खिल्ली, टर उडवताना दिसले तर त्यातही आश्चर्य ते काय.
महाराष्ट्रातील या सगळ्या राजकीय घडामोडी ज्यांनी घडवून आणल्या असतिल आणि या घडामोडींचा आसुरी आनंद घेऊन, जी मंडळी आपले इमले बांधत असेल त्यांच्यासाठी..
"सितारों से आगे जहां और भी है ,
अभी इश्क के इम्तिहाँ और भी हैं"
कालाय तस्मै नमः.
धनंजय मधुकरराव देशमुख

Comments
Post a Comment