28 मे 20 आपला रक्षणकर्ता, हाच आपला दुखहर्ता. . कोरोना ने सगळीकडे हाहाकार केला आहे. महाराष्ट्रराज्य याच्या गर्तेतून सुटू शकले नाही. राज्यातील रुग्णांचा आकडा आज पन्नास हजारावर गेला आहे, समाजातील सगळ्याचा स्तरातील लोकांना, कमीअधिक प्रमाणात कोरोनाची लागण झाली आहे. काहींना आपले कर्त्तव्य बजावताना तर काहींना घरातून बाहेर ना पडल्यावरही कोरोनाची लागण झाली. ज्यांना आपण आपली, "फर्स्ट लाइन ऑफ डिफेंस" असे म्हणतो, कोरोनायोद्धा असे म्हणतो, ते डॉक्टर्स, परिचारिका, साफसफाई कर्मचारी यांच्यासोबतच अनेक पोलीसकर्मी सुद्धा कोरोनाच्या विळख्यात सापडले. काही बातम्यांची दखल घेतली तर, राज्यात आजघडीला एक हजारावर पोलिस अधिकारी कोरोनाग्रस्त आहेत. त्यातील 22 अधिकाऱ्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. काल दिवसभरात दोनशेहून अधिक अधिकारी कोरोना बाधित झाल्याची बातमी आहे. पोलीस हे जनतेच्या सुरक्षेची पहिलीकडी आहेत. सामान्य जनता त्यांना आपल्या सुरक्षेची हमी समजतात. गेल्या काही महिन्यांत, राज्यातील अनेक ठिकाणी पोलिसांवर हल्ले झालेत, दगडफेक झाली. मुंबईतील एक तरुण पोलीस अधिकारी कोरोना बाधित झाल्याचे निष्पन्न ...
A blog on Bharat. Sports. Politics. Current affairs. Marketing. Technology. Business - Dhananjay M. Deshmukh