4 नोव्हेंबर 2020, मुंबई लांबलेले सीमोल्लंघन .. दसरा म्हंटले की सीमोल्लंघन आलेच . वीसेक वर्षांपूर्वी ( आताही बर्याचशा भागात ) बहुतांश हिंदू पुरुष , संध्याकाळच्या वेळेला आपापल्या राहत्या घराबाहेर पडून गावाच्या सीमेवरील मंदिरात जायचे , प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन घरी परतायचे . एका प्रकारे ते सीमोल्लंघन व्हायचे . आजकालच्या शहरी जीवन पद्धतीमुळे ही प्रथा कदाचित थोड्याफार प्रमाणात कमी झाली असावी . त्याला आता आंतरिक स्वरूप जास्त आले आहे - " आपल्यातील " स्वत्व " च्या सीमा तोडून , चांगली व्यक्ति व्हा " याला आता सीमोल्लंघन चे स्वरुप आले आहे . असो . भ्रमनिरास ? महाराष्ट्राच्या राजकिय नेत्यांसाठी या वेळचा दसरा , सीमोल्लंघन महत्वाचा ठरणार असे चित्र निर्माण झाले होते . पुढेमागे होईलही . पण दसऱ्याच्या एक दिवस आधी बातमी धडकली - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून आपल्याला कोरोना झाल्याचे सांगितले . 15 मार्च ला केंद्र सरकारने देशात कोरोना महा...
A blog on Bharat. Sports. Politics. Current affairs. Marketing. Technology. Business - Dhananjay M. Deshmukh