Skip to main content

Posts

Showing posts from May 26, 2020

अपेक्षांचे ओझे की कर्तव्य बजावण्याची सोनेरी संधी?

26 मे 20, मुंबई अपेक्षांचे ओझे की कर्तव्य बजावण्याची सोनेरी संधी? महाभारतात अनेक प्रसंग आहेत जेव्हा, भगवान श्रीकृष्णा ने पार्थ, अर्जुनाला आपले कर्तव्य बजावण्याची सूचना केली, कधी सल्ला दिला आणि नंतर परखडपणे समजावीले. हे सर्वश्रुतच आहे. आपली संस्कृती आहे. इतिहास आहे.त्यांनी दिलेली कर्तव्य बजावण्याची शिकवण आजसुद्धा आपण आपल्या विचारसरणीत आणल्या आहेत, अनुसरण करीत आहोत. येणार्‍या पिढीच्या मध्ये ही शिकवण संस्कारातून बिंबविण्यासाठी आपण प्रयत्नरत असतो. इतिहासातील अनेक युद्धप्रसंग किंवा अटीतटीचे प्रसंग आपण वाचले तर आपल्याला असे जाणवेल की ते योद्धे कार्मिक भावनेतून आपले कर्तव्य आपल्या शक्ति आणि बुद्धीने प्रामाणिकपणे बजावीत होते. यश, अपयश हा भाग वगळता, यातून त्यांची कर्तव्यपरायणता आपल्या समोर उदाहरणे म्हणुन उभी राहिल्यात. आपल्याला कठीण वेळी ही उदाहरणे मार्गदर्शित करीत असतात. प्रेरित करतात. आपण अनेकदा प्रस्थापित खेळाडू, शास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, पोलीस किंवा आरोग्य सेवेतील अधिकाऱ्यांच्या जिवनकथा वाचतो किंवा ऐकतो, तेव्हा एक बाब ठळकपणे पुढे येते - ती प्रसंगाला निर्भ...