26 मे 20, मुंबई
अपेक्षांचे ओझे की कर्तव्य बजावण्याची सोनेरी संधी?
महाभारतात अनेक प्रसंग आहेत जेव्हा, भगवान श्रीकृष्णा ने पार्थ, अर्जुनाला आपले कर्तव्य बजावण्याची सूचना केली, कधी सल्ला दिला आणि नंतर परखडपणे समजावीले. हे सर्वश्रुतच आहे. आपली संस्कृती आहे. इतिहास आहे.त्यांनी दिलेली कर्तव्य बजावण्याची शिकवण आजसुद्धा आपण आपल्या विचारसरणीत आणल्या आहेत, अनुसरण करीत आहोत.
येणार्या पिढीच्या मध्ये ही शिकवण संस्कारातून बिंबविण्यासाठी आपण प्रयत्नरत असतो.
इतिहासातील अनेक युद्धप्रसंग किंवा अटीतटीचे प्रसंग आपण वाचले तर आपल्याला असे जाणवेल की ते योद्धे कार्मिक भावनेतून आपले कर्तव्य आपल्या शक्ति आणि बुद्धीने प्रामाणिकपणे बजावीत होते. यश, अपयश हा भाग वगळता, यातून त्यांची कर्तव्यपरायणता आपल्या समोर उदाहरणे म्हणुन उभी राहिल्यात. आपल्याला कठीण वेळी ही उदाहरणे मार्गदर्शित करीत असतात. प्रेरित करतात.
आपण अनेकदा प्रस्थापित खेळाडू, शास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, पोलीस किंवा आरोग्य सेवेतील अधिकाऱ्यांच्या जिवनकथा वाचतो किंवा ऐकतो, तेव्हा एक बाब ठळकपणे पुढे येते - ती प्रसंगाला निर्भीडपणे तोंड देण्याची. आपल्या संपूर्ण ताकदीनिशी ठाकलेल्या प्रसंगाला आपण कसे संपवायचे किंवा तोंड द्यायचे हे. कर्तव्यपार पाडण्याआधी केलेली मानसिक, बौद्धिक आणि भौतिक तयारी, आणि ते पार पाडताना निर्विकार पण कर्मठपणे झोकून देणे हे.
कुणी देशासाठी खेळतो, तर कुणी बहुसंख्य समाजाला न्याय मिळावा, किंवा, काही अत्यंत मोठी आरोग्य आणीबाणी वा मोठा प्रसंग टाळण्यासाठी प्रयत्नरत असतात. यांच्यामध्ये समान दुवा आहे तो म्हणजे कर्तव्यदक्षता. कार्यक्षमता ही व्यक्ति दर व्यक्ति बदलू शकते, पंरतु कर्तव्य बजावण्याची बुद्धी ही समान असते.
कृती करतांना ते आपण आपल्या पूर्ण क्षमतेने कर्तव्य बजावत आहोत याचा विचार करतात, ना की आपण करीत असलेल्या कृतीमुळे होणारा देशाचा विजय किंवा समाजाचे भले. आपल्याला किंवा जनमानसाला अपेक्षित असलेल्या अंतिम परिणामाचा ते कृती करताना विचार करीत नसावेत. अंतिम परिणाम आणि त्यावर असलेल्या जनमानसाच्या अपेक्षा, आणि त्यातून निर्माण झालेले ओझे हे कदाचित ते कृती करताना विसरत असतिल. बहुतांश वेळी जाणूनबुजून. त्यांना दिसतो फक्त आपलं लक्ष, ध्येय.
थोडक्यात, ते कर्तव्य बजावतात, आपण लाखो, करोडो लोकांच्या अपेक्षांचे ओझे ढवतोय या मानसिकतेतून किंवा आविर्भावतून बाहेर येऊन. कदाचित म्हणुनच ते बहुतांश वेळी यशस्वी झालेत, अर्थात कधी आपल्या प्राणांची आहुती देऊन सुद्धा.
अर्थात, खेळाडूंच्या कर्तृत्वाला सामान्य लोक पाहिजे तेव्हा झळाळी देतात पाहिजे तेव्हा अडगळीत टाकतात. परन्तु, खेळाडू, उदाहरणार्थ भारत रत्न सचिन तेंडुलकर. त्यांनी जर आपल्यावर 100 कोटी लोकांच्या अपेक्षांचे ओझे आहे असे नेहमी मनात ठेवून खेळले असते तर कदाचित त्यांना अनेक अविस्मरणीय खेळी करताच आल्या नसत्या, किंवा अनेक जिकरीचे विजय खेचून आले नसते. शेवटी आपल्या कौशल्य, शारीरिक तंदुरुस्ती आणि जिंकण्याच्या ध्येयाने ते प्रत्येक खेळी करीत असावेत. अशी अनेक खेळाडू किंवा अधिकाऱ्यांचे तत्सम उदाहरणे आहेत.
आजच्या घडीला कर्तव्यपरायणतेच्या वृत्तीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. कारण आज महाराष्ट्रात कोरोना महामारी तांडव घालतेय. आकडा रोज फ़ूगतोय. अनेक हृदय विदारक बातम्या, घटना पुढे येत आहेत. याला कुणीतरी, कुठेतरी जबाबदार असावेत. आहेत. त्यांनी जबाबदारी पार पाडावी. ही जबाबदारी आपले कर्तव्य आहे म्हणुन कर्मठपणे पेलून न्यावी.
आपल्या कर्तव्यदक्षतेने अनेकांना, विशेषतः प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रेरित करावे.
आपल्या कर्तव्यदक्षतेने अनेकांचे मनोबल उंचवावे, विशेषतः पोलीस, आरोग्य अधिकाऱ्यांचे.
आपल्या कर्तव्यदक्षतेने विश्वास निर्माण करावा.
विशेषतः राज्यातील सामान्य जनतेला विश्वास द्यावा.
आभाळाकडे कसे विश्वासाने किंवा अपेक्षेने बघतात, आज राज्यातील जनता त्याच आशेने राज्य सरकारकडे डोळे लावून आहे.
जनतेच्या अपेक्षा माफक आहेत -
ह्या अपेक्षा खरच माफक आहेत. त्यांचे ओझे ते काय व्हावे? फक्त या अपेक्षा महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेच्या आहेत म्हणुन त्याचे ओझे? मग ज्यांच्या वर एकशे तीस कोटी जनतेची जबाबदारी आहे त्यांनी काय करावे? "कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे " हे गीत गात रहावे?
सत्ता आली की जबाबदारी असतेच. उलट जबाबदारी असते म्हणुन सत्ता असते. खबरदारी ज्यांनी घ्यायची त्यांनी घेतलेली आहे. ज्यांना जबाबदारी घ्यायची आहे ते कधी पुढे येणार आहेत? मैदानात येऊन आपल्या योद्धाला कधी पाठबळ देणार?
कुणी जबाबदारीची जाणीव करून दिली तर ते राजकारण करतात, ही आवई बर्याच दिवसांनी उठविली जातेय. त्यांच्या वर अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन अश्लाघ्य भाषेत टीका (खरेतर टीका शब्द सौम्य असावा) केली जातेय. कुत्र्या मांजरीचे ग्राफिक्स काढून हिणवले जातेय.
राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे परंतु तिन्ही पक्षांत सुसूत्रता आहे असे वाटत नाही. सत्ता उपभोगायची असेल तर सोबत आणि जबाबदारी निभावण्याची वेळ आली तर आपसातच मतभेद. की हा सगळा बनाव आहे?
मग आता कुठे गेलेत ते "मास्टरस्ट्रोक" मारून एकोप्याने राहण्याच्या बाता मारणारे? महाराष्ट्र देशाला दिशा देतो आणि आम्ही महाराष्ट्राला दिशा देऊ अश्या गप्पा ठोकणारे?
नुसती युद्धजन्य वातावरणनिर्मिती करून, कुठला योद्धा खरेच रणांगणात आपली संपूर्ण शक्तिनिशी लढतो?
आजची महाराष्ट्राची जी दशा झाली आहे ती बाब फक्त भारतातच नाही तर संपूर्ण विश्वात चिंतेचा विषय झाली आहे. महाराष्ट्र देशाची फक्त आर्थिक राजधानी नाही तर इथे मोठमोठे देशी-विदेशी उद्योग धंदे आहे, शिक्षण संस्था आहेत. आजच्या या बिकट परिस्थितीने महाराष्ट्र किती वर्षाने मागे गेलाय? राज्यकर्त्यांच्या बेदरकारी ने राज्य अजून किती खाली ढकलले गेले किंवा अजून किती खाली जाईल याची कुणाला जाणीव आहे का?
राज्यात अनेक जाणते नेते आहेत. किंबहुना त्यांचे चाहते तरी तशी आवई उठवित असतात. आज घडीला कुठे आहेत ते?
आणि या नेत्यांचे चाहते आज काय करीत आहे - लोकांनी कुठल्या कोषाला देणगी द्यावी याच्या मागे? पंतप्रधान कोषाला देणगी दिली म्हणुन ते कसे राजद्रोही आहे हे प्रसार माध्यमांमध्ये किंवा सोशल मीडिया मध्ये, जसे खिळे ठोकतात तसे ठोकत बसणे हाच उद्योग उरला काय त्यांना? आपले नेता, त्यांच्या बुद्धीचा राज्याला आता का फायदा होत नाही आहे (एरवी त्यांचा तोरा असा असतो की त्यांचे नेते महाराष्ट्राचेच नाही तर देशाच्या प्रत्येक प्रश्नाला चुटकी सरशी सोडवू शकतात, किंबहुना केंद्र सरकारने कुठलाही चांगला निर्णय घेतला की तो यांच्या नेत्यानेच सूचित केला होता अस आभास निर्माण करतात)?
"आम्ही तुमच्या सगळ्या आशा-अपेक्षा पूर्णत्वास नेऊ, त्यांचे आमच्यावर कितीही ओझे झाले तरी चालेल", सतत अश्या तोऱ्यात वावरणारे राज्यकर्ते जागे कधी होतील? आणि, तुमच्या या अपेक्षांचे ओझे आमचे नेते त्यांच्या खांद्यावर घेताहेत, म्हणुन तुमच्यावर आमचे (आणि आमच्या नेत्यांचे) अनंत उपकार आहेत अश्या आविर्भावात राहणारे त्यांचे बगलबच्चे सुधरणार कधी?
आपल्याला जे समाजकारण करायचे आहे हे योग्य वेळी उमगले तर पुढचे राजकारण सोपे जाते असे म्हणतात. आपण, आपल्याला मान्य असलेल्या मित्राला सुद्धा धोका देऊ शकतो. अशी मानसिकता असलेले लोक, आणि धोका दिला; म्हणुन फक्त आपल्यालाच राजकारण जबरदस्त जमते, आपणच चाणक्य, आपले नेते राजा विक्रम अश्या तोऱ्यात राहणाऱ्या लोकांना समाजकारण काय असते हे काय कळणार? त्यांना सपशेल विसर पडलाय समाजकारणाचा!
मौका सभी को मिलता है,
कभी काम करने का, कभी काम तमाम करने का,
बस मन मे ठान लेने की जरूरत है.
प्रख्यात कवि गोविंदग्रजांच्या काही ओळी आठवतात.
मंगल देशा, पवित्रा देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा..
वेळ आहे कणखर भूमिका घेऊन राकटपणे कृती करून कोरोना महामारीला महाराष्ट्राच्या आणि देशाच्या बाहेर करण्याची. त्याला संपविण्याची.
कृतीची गरज आहे. कणखर कृतीची.
कर्तव्यदक्षतेच्या भावनेतून स्वतःला झोकून देण्याच्या तयारीने केलेल्या कृतीची. अशी कृती करण्याची ताकद कुणामध्ये आहे, कुणामध्ये अशी कर्मठता आहे, कुणाची स्वतःला झोकुन द्यायची तयारी आहे?
राज्यातील सद्यपरिस्थिती बघता, आजघडीला अशी कर्तव्यदक्ष कृती कुठला नेता योग्यपद्धतीने पार पाडू शकतो हे ज्याचे त्याने ठरवावे.
महाराष्ट्राची जनता तशी समजूतदार आहे. तिला आता कामगिरी आणि भावना यातील फरक सूर्यप्रकाशा एवढा स्वच्छ दिसतो. जनतेचा आता अजून बुद्धिभेद करता येणार नाही.
तेव्हा, राज्यातील समस्त राजकारण्यांनो (आणि राज्यकर्त्यांनो), कोरोना महामारीने राज्यावर आक्रमण केले आहे - तुम्हाला संधी दिली आहे महाराष्ट्राला वाचवायची आणि पुननिर्माण करण्याची. त्या संधीचे ओझे करू नका. सोने करा. जे काही करायचे असेल ते लवकर कृतीबद्ध करा, वेळेत.
जबाबदारी घ्यायची एखाद्याची तयारी नसेल तर दुसर्याने पुढे यावे. नाही तर असे नको व्हायला -
"बहुत देर से दर पे आँखें लगी थीं,
हुज़ूर आते-आते बहुत देर कर दी.
मसीहा मेरे तूने बीमार-ए-ग़म की
दवा लाते-लाते बहुत देर कर दी."
शुभम भवतु!
- धनंजय मधुकर देशमुख, मुंबई
dhan1011@gmail.com

---------

- नियम सगळ्यांना लागू व्हावे.
- खरी माहिती तात्काळ मिळत रहावी (रियल टाइम). त्यात कुठलीही लपवाछपवि होऊ नए.
- विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नए.
- योग्य आरोग्यसेवा सगळ्यांना वेळेमध्ये प्राप्त व्हावी. त्यात भेदभाव नसावा.
- आरोग्य सेवा प्रमाणित असावी (स्टँडर्ड). त्यांची फरफट होऊ नए. अवास्तव लूट होऊ नए.
- गोर गरिबांना मदत मिळावी. बळीराजाला मदतीचा हात द्यावा.

युती सरकार हि गंभीर परिस्थिती हाताळण्यात आपण कमी पडलो हे समजण्यास तयार नाही .आपली तुलना उत्तर प्रदेश व गुजरात सोबत करण्यात काहीच अर्थ नाही. आपल्याच राज्यात कोरोना लागण कीती झालेत व कीती मृत झालेत यावरच लक्ष केंद्रितकरणे आवश्यक आहे.महाराष्ट्र राज्याकडून इतर राज्यांनाच नव्हे तर इतर देशांना सुध्दा काही चांगले घडण्याची अपेक्षा आहे.
ReplyDeleteचांगल्याचीच अपेक्षा ठेवूया 🙏
ReplyDelete