30 मे 20, मुंबई बीत गई सो बात गई. क्रिकेटचा सामना रंगलाय. टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवसाच्या शेवटाच्या सत्राच्या खेळाला सुरुवात झाली आहे. वातावरण आभाळी आहे, पण मध्येच सूर्य प्रखरपणे डोकावून जातो. हवा सुद्धा नेहमीपेक्षा थोडी जास्त आहे. पीच वरील गवत अजूनही जिवंत आहे. साठ षटके झाल्यामुळे बॉल थोडा जुना झाला आहे, परंतु एखाद्या मुरलेल्या स्विंग गोलंदाजाला रिवर्स स्विंग टाकायला एकदम पोषक परिस्थिती. हा गोलंदाज, फलंदाजाचा कधी घसा कापला जाईल, तर त्याच्या कधी मानेला फटका बसेल असे बाऊन्सर फेकतो, तर, मध्येच रिवर्स स्विंग करून यॉर्कर टाकतो. फलंदाजांची पुरे पळापळ होते. काय करावे सुचत नाही. असो. टेस्ट क्रिकेट म्हंटले की गोलंदाज नजरेसमोर येतात. विशेषतः, ऐंशीच्या मध्यापासून ते नव्वदीच्या सुरवातीच्या काळातील वेगवान गोलंदाजी करणारे बरेच विंडीज, ऑस्ट्रेलियन, इंग्लिश, न्यूझिलॅण्ड आणि भारतीय गोलंदाज नजरेसमोर येतात, सोबत येते त्यांची शैली, खासियत. कुठलाही वेगवान गोलंदाज बाऊन्सर टाकण्यात पटाईत असतो. ते त्याचे अस्त्रच असते. परन्तु बाऊन्सर कोण टाकतो, यावर सुद्धा त्या बाऊन्सरची घातकता अवलंबून असते. उदाहरणार्थ,...
A blog on Bharat. Sports. Politics. Current affairs. Marketing. Technology. Business - Dhananjay M. Deshmukh