Skip to main content

Posts

Showing posts from March 21, 2021

रमूया थोड़े रमीत.....

21 मार्च 2021, मुंबई   रमूया थोड़े रमीत .. . बर्‍याच दिवसांनी आज रमीचा डाव खेळलो . दहा पत्त्याची , 3-3-4, आणि जोकर नसलेली रमी ! ( जोकर असलेली रमी खेळणे म्हणजे मिळमिळीत मिसळ खाणे , काय असते मजा तिला ?). पहिल्याच डावात मात्र गम्मत झाली , दोन - दोनच्या पाच जोड्या लागून आल्या , मग झाली ना फजिती ! कुठला पत्ता सोडावा आणि कुठला ठेवावा यात गल्लत होत गेली . सामान्य माणसाला दरवेळेस दोन पैकी नेमका कुठला पत्ता टाकावा याचे जजमेंट दरवेळेस जमेलच असे नाही . अनेकदा आपण फेकलेल्या पत्त्याच्या जोडीचेच पत्ते , नेमके तो पत्ता आपण फेकल्यावर आपल्या समोर येतात !   नंतर विचार केला तर असे आढळते की , रमीमध्ये , सुरुवातीलाच आपल्याला सोडता येणारी काही पत्ते येणे बर्‍याचदा फायद्याचे सुद्धा असते . दहापैकी 6-7 आसपास जुळलेली आणि 2-3 सोडण्यासाठी किंवा जमले तर जमले या कॅटेगरी मधील !! त्यामुळे खेळणाऱ्याला सोपे जाते . अर्थात , काहींना ही विचारसरणी नकारात्मक वाटू शकते , असो .   राजकारणात पण रमीप्...