Skip to main content

Posts

Showing posts from November 23, 2020

असत्याचे सत्य...

  23 नोव्हेंबर 20, मुंबई   असत्याचे सत्य ... मागच्या 23 नोव्हेंबर ला पहाटे आठ वाजता महाराष्ट्रात एक प्रकारचा राजकिय भूकंप आला होता . देवेन्द्र फडणवीस आणि अजित पवार यांचा छोटेखानी शपथविधी थेट टीव्ही वर झळकला . 8 नोव्हेंबर 2016 रात्री 8 वाजता नोटबंदी घोषित झाल्यानंतर जशी धावपळ उडाली होती तशीच त्यादिवशी सुद्धा उडाली होती . अर्थात रात्र सरता - सरता हे स्पष्ट झाले की नव्या मैत्रीला वाट खडतर आहे , आणी शेवटी तीन दिवसांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला . पुढे 28 नोव्हेंबरला शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या सरकारच्या प्रमुखपदाची , म्हणजेच मुख्यमंत्रीपदाची शपथ दादर येथील शिवाजीपार्क येथे एका मोठ्या समारंभात घेतली . असो .    छत्तीस रातीत काय घडले ?  24 ऑक्टोबर ते 28 नोव्हेंबर दरम्यानच्या 36 रात्रीत नेमके काय घडले हे फारच कमी लोकांना ठाऊक असेल , त्याला अनेक कंगोरे असतिल . आखणी , विभागणी , जबाबदार् ‍ या , कुणा...