5 जुलै 2021, मुंबई दाणं उष्ट झालं जी .. एका लहान शेतकर्याची कथा . एक दिवस त्याचा एकमेव घोडा गाव सोडून पळून जातो . शेतकऱ्याचे शेजारी त्याचे सांत्वन करायला येतात आणि म्हणतात , " आपण खूप दुःखी असाल ", शेतकरी , फार काही उत्तर देत नाही , फक्त म्हणतो " बघुया , काही दिवसात कळेल , चांगले झाले की वाईट ". काही दिवसांनी त्याचा घोडा परत येतो , आणि त्याच्या सोबत अजून दहा जंगली घोडे असतात . शेतकरी आणि त्याचा मुलगा सगळ्या घोड्यांना तबेल्यात ठेवतो . शेतकर्याचे शेजारी पुन्हा येतात , यावेळी म्हणतात , " वा , आपला घोडा तर जोरदार निघाला , अजून दहा घोडे घेऊन आला ". शेतकरी निर्विकारपणे म्हणतो , " बघुया , काही दिवसात कळेल , चांगले झाले की वाईट ". दुसर्या दिवशी , जंगली घोड्यांपैकी एक घोडा शेतकर्याच्या मुलाला पायदळी तुडवतो , त्यात मुलाचा पाय तुटतो . पुन्हा शेजारी येतात , यावेळी सांत्वन करायला , पण शेतकरी नेहमी प्रमाणे उत्तर देतो , " बघुया , काही दिवसात कळेल , चांगले ...
A blog on Bharat. Sports. Politics. Current affairs. Marketing. Technology. Business - Dhananjay M. Deshmukh