Skip to main content

Posts

Showing posts from June 4, 2020

कौशल्य की वृत्ती - काय महत्वाचे?

5 जून 20, मुंबई कौशल्य की वृत्ती - काय महत्वाचे? आजचा विषय थोडा वेगळा आहे. त्यासाठी आपण काही किस्से तपासून बघुया. पहिला किस्सा - धोका जिंकला  एका जंगलात प्राणी आणि पक्ष्यांमध्ये जंगलाचा प्रमुख कोण या विषयावरून मोठा वाद होतो. पक्ष्यांची संख्या जास्त असल्यामुळे काही पक्षी  आपल्यालाच गटातील एकाला प्रमुख करावे असे आवाहन करतात. शेवटी निवाडा होतो, की जो कुणी दुसर्‍या दिवशी सकाळी सूर्याच्या जितक्या जवळ जाऊन दाखवेल त्याला प्रमुख मानण्यात येईल. मग तो पक्षी असो किंवा प्राणी. दिवस उजाडतो. सगळे प्राणी आणि पक्षी आपल्याला परीने धावपळ करतात. प्राण्यांमध्ये कुणाला वाटते की जर ते पहाडाच्यावरती चढले की सूर्याजवळ पोहोचतील. त्यामुळे त्यांची चढाओढ सुरू होते. बरेचसे भारीभरकम प्राणी धावपळ करून थकतात. नाराज होऊन परत येतात. पक्ष्यांमध्ये मात्र उत्साह असतो. चिमणी पासून ते गरूड पर्यंत सगळेच पक्षी आपापल्या परीने उंचीने उडतात.  अर्थात चिमणी, मैना, पोपट, कावळे यांसारखे छोटे पक्षी फार उंच आणि लांब पोहोचू शकत नाही, म्हणुन ते नाराज होऊन परत येतात. सगळ्यांना एक मोठा गरुड आकाशात...