Skip to main content

Posts

Showing posts from April 4, 2021

मैत्रीचा कोथळा, ट्रोजन हॉर्स, डॉमिनो इफेक्ट, आणि ऐकीडो.....

04 एप्रिल 2021, मुंबई मैत्रीचा कोथळा, ट्रोजन हॉर्स , डॉमिनो इफेक्ट , आणि ऐकीडो ... मैत्रीचा कोथळा ..  24 ऑक्टोबर 19 ला राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले , देवेंद फडणवीस यांच्या स्वछ ,पारदर्शक आणि प्रगतिशील कार्यपद्धतीला राज्यातील जनतेने भरभरून प्रतिसाद दिला.त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप शिवसेना महायुतीला 161 जागा म्हणजेच निर्भेळ बहुमत मिळाले , काही अपक्ष धरून त्यांचा आकडा 175 पर्यंत सहज पोहोचला असता.पण राज्याच्या बारा कोटी जनतेला " मैत्रीचा कोथळा (आतड्या) काढणे  " नावाच्या गनिमी काव्याचा विशेष प्रयोग बघायला मिळाला . महायुती तुटली , कदाचित शिवसेनेच्या नेत्यांनी 24 लाच या अंकाचा प्रयोग करण्याचे ठरविले होते . शिवसेना आणि भाजप मधील संवाद तुटला आणि नवीन समीकरणे जुळवून आणण्याचे प्रयोजन सुरू झाले .. ट्रोजन हॉर्स .. " ट्रोजन हॉर्स " ची कथा किंवा संकल्पना अनेकांनी वाचली असेल , बघितली असेल , अनुभवली असेल . अत्यंत जुनी पण प्रभावी रणनीती आहे ही . आपला गुप्तहेर किंवा सैन्...