Skip to main content

Posts

Showing posts from December 9, 2022

उद्योगांवर बोलू काही - महाराष्ट्रापुढील आव्हाने आणि संधी

०९ डिसेंबर २०२२ उद्योगांवर बोलू काही - महाराष्ट्रापुढील   आव्हाने आणि संधी धनंजय   देशमुख,  मुंबई ऑक्टोबर २०१९ मध्ये राज्यात विधानसभा निवडणूक झाली , भाजप शिवसेना युती देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा घेऊन लढली त्यावेळीउद्योगजगतातील बहुतांश मंडळी देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार या भरोश्यात होते युतीला अपेक्षित असे घवघवीत बहुमत मिळाले सुद्धा , मात्र अत्यंत अनाकलनीय पद्धतीने सत्ता बदल घडला , राज्यात तीन पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार बसले - आणि कदाचित  तेथून राज्यातील उद्योजकांमध्ये अस्थिरतेचा संदेश गेला? महाराष्ट्र एक औद्योगिकदृष्ट्या विकसनशील राज्य आहे , आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्याची एक वेगळी ओळख आहे - स्थिर , पुरोगामी , भाषिक उदारता आणि आर्थिकदृष्ट्या भक्कम अशी . राजकीय अस्थैर्यतेचा पहिला बळी पडतो तो छोट्या उद्योगांचा , त्यानंतर देशातील मोठे आणि मग बहूराष्ट्रीयउद्योगांवर . हि एक साखळी आहे . काळाच्या ओघात देशातील मोठे आणि बहूराष्ट्रीय उद्योगांकडे जायचा तो संदेश ग...