दिवेलागण "दिवे लागले रे दिवे लागले तमाच्या तळाशी दिवे लागले दिठींच्या दिशा खोल तेजाळताना कुणी जागले रे कुणी जागले" https://youtu.be/8CC0rUKAwZU पंडित जितेंद्र अभिषेकी ह्यांचे हे भावगीत ऐकल्यावर काळाच्या पडद्याआड झालेल्या अनेक "संध्याकाळी" लहरीप्रमाणे तरळून गेल्या.. तरंगून गेल्यात. अर्थात, ह्या गीतातील मतीतार्थ खूप गहन आहे, वेगळा आहे.. तरीही. अर्धे आयुष्य अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथे गेले. ऐनशी-नव्वदीच्या काळातील अमरावती बडनेरा हे फार वेगळ होतं आणि त्या संध्याकाळी सुद्धा! त्यांचा सूर, साज काही औरच असतो..असायचा.. गावाकडील संध्याकाळ ही मोसमवार असते . म्हणजे पावसाळ्यातील संध्याकाळ फारशी "हॅप्पनिंग" नसायची, एकदा ढगांचा आणि विजेचा "सांगीतिक" जुगलबंदीचा खडखडाट आणि पाऊस सुरू झाला की आधी सरळ घर गाठायचे हे ठरलेले राहायचे. एक वेगळीच हुरहुर रहायची. संध्याकाळ आहे अस फारसे कळायचेच नाही..कधी कधी संध्याकाळी बडनेरा रेल्वे स्टेशन वरgघरी आलेल्या पाहुण्यांना गाडीत सोडायला जायचो.. गाडी गेल्यावर वर एक वेगळीच भावना रहायची. नुकतीच पावसाच...
A blog on Bharat. Sports. Politics. Current affairs. Marketing. Technology. Business - Dhananjay M. Deshmukh