12 जानेवारी 2021, मुंबई बेस्ट होतेय का वेस्ट ? अंदाजे दोन कोटी जनसंख्या असलेल्या , मुम्बई शहराला चोवीस तास जिवित ठेवण्यात महत्वाची कामगिरी बजावणाऱ्या जीवनरेषापैकी एक म्हणजे मुंबईची लोकल सेवा आणि दूसरी म्हणजे मुंबई महानगरपालिका अंतर्गत असलेली बस सेवा , BEST ( बेस्ट ). निरंतर सेवा , खडतर प्रवास .. निरंतर सेवा प्रदान करण्यात अग्रेसर असलेली , एकेकाळची महत्वाची असलेली बेस्ट ही सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे . काटकसरीचे दिवस आहे . आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्ट कर्मचारी सुद्धा कोरोना योद्धा आहेत कारण कोरोना महामारीच्या काळात सुद्धा बेस्ट निरंतर सेवा देत होती . त्या अनुषंगाने त्यांना भत्ता मिळणे क्रमप्राप्त आहे , परंतु आज पर्यंत हा भत्ता न मिळाल्याचे कळते . एका आकडेवारी नुसार हा भत्ता जवळपास रू 60-70 कोटी एवढा आहे . बजेट एकीकरण होणार ? काल परवा , बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन केला ...
A blog on Bharat. Sports. Politics. Current affairs. Marketing. Technology. Business - Dhananjay M. Deshmukh