८ एप्रिल २०२२, मुंबई एक अधिक शून्य.. - धनंजय देशमुख एक अधिक शून्य म्हंटले की सर्वप्रथम काय येते डोक्यात? एक, दहा, काहीच नाही? उद्योग जगतात, एक-अधिक- शून्याच्या अनेक गोष्टी घडतात. "एक" म्हणजे प्रस्थापित उद्योग, "शून्य" म्हणजे प्रस्थापित नसलेले किंवा तोट्यात असलेले उद्योग. अनेकदा आपण बघतो, फायद्यात असलेली विमान कंपनी, इ-कॉमर्स कंपनी तोट्यात असलेल्या कंपनिला विकत घेते किंवा त्यांच्या सोबत भागीदारी करते. काय साध्य होत असेल? कधी(कधी, "स्केल ऑफ इकनॉमिक्स" म्हणता येईल, किंवा एकमेकांच्या पूरक गोष्टी ज्यामुळे ग्राहक, व्यवसाय वाढतो, खर्च काही प्रमाणात कमी होतो. मुख्य म्हणजे स्पर्धात्मक खर्च कमी होतो. म्हणजे शेवटी फायदाच वाढतो, किंवा नुकसान कमी होतो. त्यामुळे उद्योगक्षेत्रात अनेकदा "एक अधिक शून्य" हा सव्वा सुद्धा होऊ शकतो! सिनेक्षेत्रात आधी सिंगल स्टारर सिनेमे यायचे पण नंतर नंतर दोन अभिनेते असलेले आणि नंतर मल्टी स्टारर सिनेमे यायचे. अर्थात सगळेच यशस्वी व्हायचे असे नाही. राजकिय अन्वयार्थ. . राजकारण हे वेगळया धाटणीचे क्षेत्र आहे. इथे ग्राहक पाच वर्षांतून ...
A blog on Bharat. Sports. Politics. Current affairs. Marketing. Technology. Business - Dhananjay M. Deshmukh