Skip to main content

Posts

Showing posts from May 23, 2020

आता तरी जागे व्हा

23 मे 20 अंगण आणि रणांगण. काल महाराष्ट्र भाजप च्या वतीने "महाराष्ट्र बचाओ" आंदोलन एका अभिनव पद्धतीने राज्यभरात राबविण्यात आले. राज्यातील सगळ्या जिल्ह्यातील भाजप नेते, कार्यकर्ते आणि समर्थक उत्साहात हे आंदोलन करतांना आढळले. सोशल मीडिया चा वापर चोखंदळपणे केला गेला. विशेष करून ट्विटर, फ़ेसबुक वर #MaharashtraBachao या हैशटॅग वर सकाळ पासूनच बरीच हालचाल होती. याला प्रत्युत्तर म्हणुन आघाडी सरकारने त्यांच्या काही नेत्यांना पुढे करून बरीच धावपळ केली. अर्थात त्यांच्या दिमतीला त्यांचे IT सेल, भाड्याने घेतलेली PR संस्था, आणि ट्रोलर्स चे टोळके होतेच. ढोबळ मानाने बघितले तर, घराच्या अंगणात आणि ऑनलाईन अश्या दुहेरी पद्धतीने केलेल आंदोलन जनतेच्या नजरेतून सुटू शकले नाही. काही टीव्ही चैनल्सनी त्याची दखल घेतली. काहींनी पाठ फिरवली. सोशल मीडिया वर काही पत्रकार परवापासूनच या आंदोलनाला कशी खीळ बसेल किंवा खिल्ली उडवून वातावरणनिर्मिती करीत होते. परंतु भाजप ने हे आंदोलन पूर्णत्वास केले. यशस्वी पणे केले. ही वस्तुस्थिती आहे. यशस्वी यासाठी की विद्यमान सरकारचे धोरण आणि त्यांची कामगिरी - ही राज...