26 मे 20, मुंबई परीक्षांची परीक्षा.. कोरोना महामारी मुळे राज्यात लॉक डाऊन सुरू आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. बर्याच शहरांमध्ये निमलष्करी दल दाखिल झाले आहेत. 25 मार्च मध्ये पहिला लॉकडाऊन जाहीर झाला त्यात राज्यातील सगळी शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली होती. काहींना त्यावेळी अपेक्षित होते की कदाचित एप्रिल - मे मध्ये परिस्थितीत सुधार होईल. ते स्वाभाविक होते. परंतु, तसे घडले नाही. राज्यात आज आकडा पन्नास हजारावर पोहोचला आहे. त्यामुळे एकीकडे चिंतेची बाब आहे, परंतु दुसरीकडे एक मोठा प्रश्न निर्माण झाला तो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा. विशेषकरून, इंजीनियरिंगच्या विद्यार्थ्यांपुढे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. मार्च पर्यंत कॉलेजेस सुरू असल्यामुळे, बहुतांश कॉलेजात 60-70% अभ्यासक्रम पूर्ण झाला होता. UGC च्या निर्देशना प्रमाणे राज्यातील शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा 1 ते 10 जुलै दरम्यान घ्यावयाच्या आहेत. उदाहरणार्थ, जी मुले इंजीनियरिंग च्या शेवटच्या वर्षाला आहेत, त्यांची आठव्या सेमिस्टरची परीक्षा वरील तारखांना...
A blog on Bharat. Sports. Politics. Current affairs. Marketing. Technology. Business - Dhananjay M. Deshmukh