Skip to main content

Posts

Showing posts from June 1, 2020

नेमकी कुणाची जबाबदारी?

1 जून 20, मुंबई  नेमकी कुणाची जबाबदारी?  नजीकच्या काळातील काही प्रसंग आठवा - 1. पश्चिमबंगाल मध्ये एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची चौकशी करण्यासाठी CBI चे पथक येणार होते, परंतु त्याला स्थानिक राज्यसरकारने विरोध केला (त्याआधी आंध्रप्रदेश मध्ये पण असेच एक प्रकरण घडले होते). या बातमीने लोकांच्या मनात केंद्राच्या अधिकारांबद्दल शंका येणे साहजिकच आहे. तर काही लोक केंद्राच्या प्रामाणिकपणावर वर शंका घेऊ शकतात. 2. 16 एप्रिल 20 ला दोन महंतांची महाराष्ट्रातील पालघर येथे नृशंस हत्या झाली. जनतेत प्रचंड आक्रोश निर्माण झाला. सामान्य माणसाला असे वाटते की केंद्रसरकार आरोपींना शिक्षा बजावण्यात यशस्वी होईल. 3. कोरोना मुळे राज्यांतील परिस्थिती गंभीर, आपले अपयश दाबण्यासाठी अनेक राज्य सरकार केंद्रकडे बोट दाखवित आहेत. 4. महाराष्ट्रातील कोरोना महामारीची परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चालली आहे. सामान्य नागरिकाला केंद्राकडून अपेक्षा आहे की परिस्थिती निवळेल. 5. कोरोना महामारी मुळे अर्थव्यवस्था डगमगली. त्याला प्रतिसाद म्हणुन केंद्र सरकारने, देशाच्या वार्षिक सकल उत्पादनाच्या (GDP) दहा टक्के म्हणज...