२४ जुलाई २०२३ वाट दिसू दे गा देवा .. धनंजय मधुकर देशमुख , मुंबई काही वर्षांपूर्वी "जाऊद्याना बाळासाहेब" गाजलेल्या मराठी चित्रपटात एक गाऱ्हाणे गीत होते.. "वाट दिसू दे गा देवा वाट दिसू दे वाट दिसू दे गा देवा गाठ सुटू दे" ईश्वराला (देवाला) अत्यंत आजर्वतेने व अगतिकतपणे केलेले हे एक गाऱ्हाणे! वैयक्तिक जीवनात म्हणा की कौटुंबिक किंवा सामाजिक जीवनात, अनेकदा अशी परिस्थिती येते जेव्हा समोर काय वाढून ठेवले आहे, काय घडणार हे जाणण्याची अधीरता असते पण काहीच दिसत नाही, संकेत मिळत नाही. धुमशान कोसळणार्या पावसामुळे कसा डोळ्यासमोर पांढरा अंधार होतो तसेच काही झाल्यावर अशी अगतिकता निर्माण होते, आणि आपसूकच मनात शब्द येतात " वाट दिसू दे ..". राज्याच्या राजकीय मैदानात सुद्धा आज असाच काहीसा "पांढरा अंधार" साठलेला दिसतोय. २०१९ मध्ये एक चुकलेली वाट, राज्याच्या राजकारणाला आणि राजकारण्यांना अश्या गडद जंगलात घेऊन गेलेली आहे जिथून वाटा अनेक निघतात पण कुठली वाट खरी आहे हे कळायला कठीण जातेय. ए...
A blog on Bharat. Sports. Politics. Current affairs. Marketing. Technology. Business - Dhananjay M. Deshmukh