18 जुलै 20, मुंबई जनता सोसतेया कळ , मध्यावधी अटळ गावाकडे जे लहानपणी " कंचे " ( मुंबईच्या भाषेत गोट्या ) खेळले असतिल त्यांना " बल्ल्या " हा शब्दप्रयोग माहिती असेल . जर तुम्ही सांगितलेल्या कंच्याला सोडून दुसर्या कुठल्या कंच्याला ( गोटी ) ला निशाना लावला , किंवा दोन कंच्याना मारले तर तो फाऊल होतो . त्याला गावठी भाषेत " बल्ल्या " म्हणतात . " बल्ल्या " झाला की तुम्हाला खेळात अजून कंचे द्यावे लागतात ( ढाई कितीची असते त्याच्यावर ते अवलंबून असते , कधी एक तर दोन तर कधी चार कंचे द्यावे लागतात ), ढाई मोठी होते , खेळ रंगतो . शेवटी जो दुसर्या गटाने सांगितलेल्या कंच्यालाच बरोब्बर मारतो ( बल्ल्या ना करता ) तो जिंकतो , आणि सगळे कंचे स्वतःकडे ठेवतो . मग पुन्हा सगळे खेळाडू ठरवल्या प्रमाणे एक / दोन / चार कंचे गोळा करतात , आणि नवीन खेळ सुरू होतो . बल्ल्या होतात . कुणी जिंकतो , कुणी हरतो . कधी-कधी मारा-माऱ्या सुद्धा होतात. बल्ल्या झाला रे .. महाराष्ट्रात एक...
A blog on Bharat. Sports. Politics. Current affairs. Marketing. Technology. Business - Dhananjay M. Deshmukh