Skip to main content

Posts

Showing posts from August 3, 2020

दुधात पडली माशी?

3 ऑगस्ट 20, मुंबई   दुधात पडली माशी ? लहान मुलांसाठी चांदोबाचे एक अंगाई गीत   गायले जाते . चांदोबा रागावलेला असतो , त्याला तूप रोटी खाण्यास बोलवतात , पण तो काही येत नाही , तेवढ्या तुपात माशी पडते आणि मग चांदोबाला उपाशी राहावे लागते . मतितार्थ जास्त भाव खाल्ल्याने वेळ निघून जाते आणि मग हातात आहे ते सुद्धा राहत नाही .  आजकालच्या महागाईच्या जमान्यात तूप रोटी एवजी दूध रोटी म्हणु या ! अरे , विसरलोच , सध्या राज्यात दूध आंदोलन सुद्धा पेटलाय . दुग्ध क्रांति .. एनडीडीबी द्वारा ऑपरेशन फ्लड किंवा व्हाइट रिवोल्यूशन 1970 मध्ये सुरू झाले . दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी डॉ . वर्गिस कुरियन यांच्या नेतृत्वाखाली ही संकल्पना रचण्यात आली होती . 1970 ते 1996 पर्यंत तीन टप्प्यात ही संकल्पना राबविली गेली . 1996 मध्ये जवळपास साडे तीन कोटी दूध उत्पादक आणि 73000 सहकारी संस्था जोडल्या गेल्या , देशात दुध उत्पादन आणि संकलनाला नवी दिशा मिळाली .  1991 मध्ये भारताचे दूध उत्पादन 5.5 क...