17 डिसेंबर 20, मुंबई मावळत्या दिनकरा ... डिसेंबर अर्धा संपला , वर्ष मावळतीला आले ! 2020 संपेल , दशकपूर्ती होणार !! खरे तर 2020 हे वर्ष अनेकांना महत्त्वाचे होते . 2010 ते 2015 मध्ये अनेक मिशन , धोरणे 2020 च्या अनुषंगाने बनविलेली होती . 2019 पर्यंत राज्य आणि केंद्रातील सरकारांनी आपापल्या परीने प्रगतीच्या / धोरणांच्या जहाजाच्या सुकाणूला नियंत्रित केले ( ढोबळमानाने जर पाहिलं तर सुकाणू म्हणजे जहाजाला दिशा देण्यासाठी ज्या गोल चाकासारख्या स्टेअरिंगचा वापर होतो , तो म्हणजे सुकाणू . सुकाणू अगदी जहाजाच्या मध्यभागी असतो . सुकाणूमुळे विपरीत परिस्थिती अथवा गरजेनुसार जहाजाची दिशा बदलली जाते , प्रवाहापासून जहाजाची दिशा बदलण्यासाठी सुकाणूचा वापर होतो .). 2020 आले , मात्र वर्ष नुक्ते उजाडलेच होते , आणि संपूर्ण जगात कोरोना महामारीची सुनामी आली . आरोग्यविषयक आणीबाणी निर्माण झाली , जागतिक बाजारपेठ मध्ये मंदी आली . मानव अंतर्मुख झाला . उद्योग , व्यापार , खेळ , मनोरंजन , पर्यटन सगळ्या क्षेत्रांना खी...
A blog on Bharat. Sports. Politics. Current affairs. Marketing. Technology. Business - Dhananjay M. Deshmukh