17 डिसेंबर 20, मुंबई
2020 हे गॅप ईयर झाले. काही पाश्चिमात्य देशांत, ब्रिटन, अमेरिका मध्ये कोरोना वर मात करणारी लस देण्यास सुरुवात झाली आहे. भारतात सुद्धा तीन ते चार कंपन्या पुढच्या दोन तीन महिन्यात लस घेऊन येणार आहेत. एकदा लसीकरण सुरू झाले की, त्याचा जनतेच्या मानसिकतेवर मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रभाव पडेल, "मेंटल इम्यूनिटी "वाढेल.
तेव्हा येणारे नवीन वर्ष, 2021, हे मानवतेसाठी "पुनर्निर्माण वर्ष" ठरेल अशी आशा ठेवण्यास वाव आहे. अर्थात, येणार्या वर्षात अनेक बदल घडतील, काही गोड, काही कडू. कालचक्र आहे.
दिल्लीतील वारे काय म्हणतात?
येणारे दशक भाजपाचे?
दुसरीकडे, येणार्या काळात तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ आणि पंजाब इथे सुद्धा निवडणुका लागतील. तेलंगण राज्यातील भाग्यनगर/हैदराबाद येथील नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत भाजपला जबरदस्त यश मिळाले. केरळ मध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकीत भाजपची लक्षणीय कामगिरी झाली आहे. थोडक्यात, पक्षाने आता दक्षिण भारतात पाया रचलेला आहे, येणार्या काळात दक्षिण भारतातून भाजपला मोठय़ा प्रमाणात लोकप्रतिनिधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यात नवीन उद्योग आणणे म्हणजे त्याच त्या क्षेत्रात गुंतवणुक आणणे असे नव्हे. संपूर्णपणे नवीन इंडस्ट्री आणणे गरजेचे आहे. जसे, तैवान येथील सेमीकंडक्टर आणि integrated सर्किट (आईसी) मधील कंपन्यांना राज्यात गुंतवणूक करण्यास आकर्षित करणे. या पद्धतीच्या इंडस्ट्रीमुळे एक संपूर्ण नवीन उद्योग साखळी निर्माण होऊ शकते. (वाचा - Make Maharashtra Great Again! Economically.)
2021 मध्ये आपल्या राज्यात पुन्हा एकदा खुशाली नांदो ही अपेक्षा करूया.
राजकीय हवापालट..
आघाडी सरकारने पहिली वर्षपूर्ती केली खरी, मात्र अनेकदा तिन्ही पक्षांमध्ये वादविवाद, समन्वयचा अभाव आणि मानापमान नाट्य रंगताना आढळले. दुसरीकडे भाजप मध्ये खरेच आलबेल आहे का? असा सवाल यायला काही घटना गेल्या वर्षभरात घडल्या, त्यांचे काही नेते पक्ष सोडून गेले. काल-परवा आघाडी सरकारच्या एका ज्येष्ठ नेत्याने, भाजपचे दहा आमदार त्यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले, मात्र हे सांगताना नेते , हे आमदार आजी की माजी हे नमूद करायला विसरले!
मध्यंतरी विधानपरिषदेच्या निवडणुका झाल्या. मे मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला 9 पैकी 4 जागा मिळाल्या. मात्र या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या निवडणुकीत 6 जागांपैकी भाजपला एकाच जागेवर समाधान मानावे लागले. नागपूर आणि पुणे येथील परम्परागत जागा हातून निसटल्या. याची कारणमीमांसा झाली असेलच, मात्र काही नेत्यांनी कुठे उमेदवार निवडीत उशीर किंवा चूक झाल्याचे म्हंटले. काही ठिकाणी गटबाजी उफाळून आली का, किंवा, एकमेकांस हलके करण्याच्या नादात दोन जागा गमावल्या का असा प्रश्न अनेकांना पडला असावा. जरी उमेदवार एखाद्या गटाचा नसला तरीही, एकदिलाने काम होऊ शकले असते. पाडापाडीचे राजकारण करणार्यांना हे माहिती नसावे का, की या सगळ्या प्रकारात आपण नेतृत्वाच्या नजरेत येऊ? पक्ष नेतृत्वाला यातून बरेच काही शिकण्यासाठी मिळाले असेल. हार मध्ये जीत काय असते ते कालांतराने दिसेलच, कारण, "सस्ती चीजों का शौक हम भी नहीं रखते" या तत्त्वाचे पालन करणारे अनेक आहेत. निवडणुका वेगळ्या असल्या तरीही, मैदान तेच आहेत - नागपूर आणि पुणे. विधानसभा निवडणुकीत सुद्धा याच भागांत घमासान झाले होते! वर्ष झाले तरीही ते शमले किंवा काही मान्यवरांची दिलजमाई झाली हा गैरसमज आहे हेच यातून निष्पन्न होते. अर्थात, तीन पक्षांची आघाडी ही निर्णायक ठरू शकते हे सुद्धा यातून सिद्ध झाले.
2022 मध्ये मुंबई आणि इतर महानगरपालिकांच्या निवडणुका लागतील. त्याआधी कदाचित राज्यात मध्यावधि निवडणुका सुद्धा होऊ शकतात. या पार्श्वभुमीवर 2021 हे वर्ष महाराष्ट्रासाठी, राज्य भाजपासाठी, आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी फार महत्वाचे राहणार आहे.(वाचा - गारूड घातलया)
या महिन्याच्या अखेरीस केंद्रीय मंत्रिमंडळात काही बदल होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास, महाराष्ट्रातील काही नेत्यांची, विशेषतः भाजपच्या मुंबईतील तीन खासदारांपैकी कुणा एकाची वर्णी लागली तर आश्चर्य वाटायला नको.
जाता जाता..
- हे दशक भारताच्या आर्थिक प्रगतीचे आणि अंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा निर्मितीचे होणार का?
- भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची कधी होणार?
- जम्मू आणि काश्मीर, लडाख भागात शांतता निर्माण होणार का? पाकिस्तान आणि चीनने बळकावलेले भूभाग, उदाहरणार्थ पाकिस्तान ऑक्पाईड जम्मू आणि काश्मीर (PoJK) परत भारतात विलीन होणार का?
- देशामध्ये जनसंख्या नियमन कायदा, समान नागरी कायदा, नॅशनल सिटीझन रजिस्टर (NCR) लागू होणार का? उदारमतवादी मानसिकतेच्या नावाखाली कट्टरपंथी कटकारस्थान करणार्यांना हद्दपार केले जाणार का?
- भारताला ऑलिंपिक स्पर्धेत सोनेरी कामगिरी करता येईल का?
- विश्वगुरु होण्याचा ध्येयाने प्रेरित होऊन सुरू असलेले कार्य गतिशील होणार का?
- उत्तर प्रदेश मधील प्रस्तावित फिल्मसिटी मुंबईतील फिल्मसिटी ला बाद करणार का?
- मुंबईकरांना त्यांच्या हक्काची ३०० किलोमीटरची रेट्रो मिळणार का? मुंबईकर BMC मध्ये बदल घडवतील का ?
- मुंबईला टोकियोसारखी अंडरग्राउंड सांडपाणी व्यवस्था मिळेल का ?
अर्थात मला जसे प्रश्न पडले तसेच दुसऱ्यांना पडणे स्वाभाविक आहे, उदाहरणार्थ, "भावी" पंतप्रधान, आणि "भावी" मुख्यमंत्री यांची इच्छापूर्ति होणार का?
येणारे नवीन दशक हे देशासाठी आणि देशातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे हे मात्र खरे. जेव्हढी स्वप्ने मोठी, तेवढीच आव्हाने अवघड राहणार आहेत. या दशकातील शेवटच्या सहा वर्षांत मिळालेल्या निश्चायक नेतृत्वामुळे आणि राजकिय स्थैर्यामुळे , देशाची पुढील दशकातील वाटचाल यशस्वी होणार हा विश्वास निर्माण झाला आहे हे मात्र खरे.
नवीन वर्ष, नवीन दशक सुरू व्हायच्या आधी थोडे थांबून विचार करावयास हवा, मोकळा श्वास घेऊन येणार्या काळासाठी उत्साही राहूया. पंडित हरिवंशराय बच्चन यांनी म्हंटल्याप्रमाणे..
‘जीवन की आपाधापी में कब वक्त मिला
Comments
Post a Comment