13 जुलै 20, मुंबई
महाराष्ट्रचाले वेगळा..
त्यांच्या साध्या अनुशासनबद्ध आणि सुसंबद्ध कार्यपद्धतीबद्दल प्रशासकीय आणि राजकिय गोटांमध्ये आदर निर्माण झाला. सामान्य जनतेला स्वच्छ कारभार भावला. तरूण वर्गाला त्यांच्यातील निर्णायक आणि प्रगतशील नेता आवडला.
मागच्या पाच वर्षांत, राज्याने त्यांची मेहनत आणि कल्पकता बघितली आहे. त्या अनुषंगाने त्यांना पक्षाच्या केंद्रीय विचारव्यवस्थेत स्थान मिळणे क्रमप्राप्त आहे. भविष्यात केंद्रामध्ये महत्वाची भूमिका ते बजावतील यात शंकाच नाही.परंतु आजघडीला, देवेन्द्र फडणवीस यांना परत एकदा राज्याची धुरा मिळावी अशी भावना जनतेमध्ये दिवसेंदिवस गाढ होत चालली आहे. ते सुद्धा त्यासाठी प्रयत्नरत असतिलच.
आजपर्यंत त्यांनी राज्याच्या प्रगतीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे अभिनंदन, आभार आणि त्यांच्या पुढील प्रवासाला शुभेच्छा. त्यांना एवढेच सांगावेसे वाटते की, देवेन्द्रजी, 'रुक जाना नहीं तू कहीं हार के (इम्तिहान, 1974, मजरुह सुलतान पूरी, किशोर कुमार, लक्ष्मीकांत प्यारेलाल)'.
बोले तैसा चाले, गारूड घातलया..
आपल्यापैकी बहुतांश लोकांनी पंचतंत्रातील गोष्टी वाचल्या असतिल. त्यातील दोन नमूद कराव्याशा वाटतात.
एकदा वारा आणि सूर्या मध्ये, दोघांपैकी कोण शक्तिवान आहे यावरून भांडण होते. त्यांना एक यात्रेकरू रस्त्यावरून जाताना दिसतो. त्याने घातलेला कोट कोण काढेल याची पैज लागते. वारा आपली शक्ति दाखवितो, अत्यंत वेगाने आणि जोराने वाहतो. यात्रेकरू मात्र आपला कोट घट्ट पकडून उभा राहतो. मग सूर्य हळू हळू तापायला सुरू होतो, यात्रेकरू आपला कोट काढतो, घामाघूम होतो. कासावीस होतो. सूर्य जिंकतो.
तात्पर्य - एकाग्रचित्ताने आणि चिकाटीने आपली शक्ति थोड्या थोड्या प्रमाणात वाढवून केलेले प्रयत्न यशस्वी होतात.
एक नाकतोडा गवतात नुसताच हुंदडत असतो. मात्र त्याचवेळी मुंगळे, अन्नाचे छोटे छोटे कण घेऊन झाडात जात असतात, अविरतपणे. नाकतोडा हसतो, म्हणतो काय मुर्ख आहेत, जेव्हा बघावे तेव्हा काम करीत असतात. काही दिवसांनी दुष्काळ पडतो, नाकतोड्याला खायला काहीच गवत उरत नाही. शेवटी तो रडकुंडीला येतो, मग काही मुंगळे येऊन त्याला त्यांचे अन्न खायला देतात, नाकतोडा जगतो.
तात्पर्य - दूरदृष्टी ठेवून केलेले अविरत प्रयत्न कधीच वाया जात नाही.
ईसापनीतिच्या या गोष्टी काल्पनिक जरी असल्या तरी त्यातला बोध महत्वाचा, तो घेणे गरजेचे - मग तुम्ही कुठल्याही क्षेत्रात कार्यरत असाल, जसे व्यापार, व्यवसाय, खेळाडू, राजकारणी किंवा कलाक्षेत्र.
प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा..
आपल्या थोर पूर्वजांनी, छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा ज्योतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सर्वसमावेशी विचारांतून आणि कृतीने राज्य घडविले, त्याला योग्य दिशा देण्याचे कार्य केले. आज महाराष्ट्र देशातील एक प्रगत आणि आर्थिकदृष्टय़ा संपन्न राज्य आहे.
महाराष्ट्राच्या राजकिय पटलावर अनेक नेते होऊन गेलेत, आहेत - राज्याला अनेक उत्तुंग व्यक्तिमत्त्व लाभलेत. महाराष्ट्र हे राज्य नावाप्रमाणे आहे - राज्याची जडणघडण, भूभाग, जनसंख्या, शिक्षण क्षेत्रातील प्रगती, वैचारिक प्रगती आणि एकूण नैसर्गिक बाबी बघता, राज्यात नेहमीच सुबत्ता नांदली.
सरशी राजकारणाचीच..
स्वातंत्र्यानंतर, राज्यातील घडी बसविताना अनेक समाजकारणी आणी राजकारणी मंडळीचा हातभार लागला. परंतु काळाच्या ओघात, समाजकारण मागे पडले आणि राजकारण पुढे धावू लागले. जात, धर्म यांच्यातील तिढे वाढू लागले, मात्र त्यांना खतपाणी घालणारे फोफावू लागले, राज्यातील वातावरण बदलले, राजकारण बदलले, राज्यात राजकिय अस्थिरता आली.
साधारणपणे 1999 नंतर राज्यातील राजकिय परिस्थिती अस्थिर होत गेली. कधी दोन पक्षांचे सरकार, तर कधी अपक्षांच्या बळावर, कसेही करून हिंदुत्व विचारसरणीला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी अनेक केविलवाणे प्रयत्न झाले. आघाड्या झाल्या. धुसफुसत कारभार सुरू राहिला, परन्तु सत्तालोभी पणा वाढला मग त्यातून भ्रष्टाचार फोफावला.
·
राज्यातील जनतेवर अनेक नैसर्गीक संकटे आली - दुष्काळ, पूरपरिस्थिती. शेतकर्यांच्या आत्महत्या वाढू लागल्या.
·
NCRB च्या आकड्यांनुसार 1995 ते 2013 काळात राज्यात 60750 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या.
·
2004 ते 2013 च्या काळात तर हे प्रमाण वाढले - दर रोज दहा, दहा वर्षांत एकूण 36850 आत्महत्या!
·
राज्यात अनेक बॉम्ब ब्लास्ट झाले, पाकिस्तानी हल्लेखोरांनी (आतंकवादी) मुंबईत येऊन हल्ले सुद्धा केले.
राज्याने बरेच सोसले.
प्रगतीच पडली मागे..
एकविसाव्या शतकात व्हावीतशी प्रगती राज्याची होऊ शकली नाही. याचे एकमेव कारण होते, राजकिय अस्थिरता. त्याला जोड होती जातीयवादी शक्तींच्या भरोश्यावर चालणार्या राजकारणाची.
महा-खडखडाट..
मात्र महाराष्ट्रात पंधरा वर्षापासुन सुरू असलेल्या संसारात कुरघोडीचे राजकारण सुरू झाले. राज्याच्या तिजोरीत भर पडण्याएवजी कर्जाचे डोंगर उभे झाले. कुठल्याही मोठ्या लोकोपयोगी सुविधा (मेट्रो किंवा रस्ते) किंवा इतर योजना उभ्या झाल्या नसताना, 2000 मध्ये रुपये अट्ठावन्न हजार कोटी इतके असलेले राज्यावरील कर्ज, पाच पटीने वाढून, ऑक्टोबर 2014 पर्यंत रुपये तीन लाख कोटी एवढे झाले.
1990-2000 मध्ये, राज्याच्या निव्वळ मिळकतीचे 13.57% असलेले कर्ज, 2013-14
मध्ये 18.4% एवढे झाले. याकाळात राज्याची मिळकत सुद्धा वाढली, त्यामुळे कर्जाच्या आकड्यात आलेला फुगवटा अजून महत्वाचा होतो. एकूणच, महाराष्ट्र राजकिय अस्थिरतेच्या आणि आर्थिक कर्जबाजारीपणाच्या दुहेरी संकटात सापडला होता.
देशात वाहिले बदलाचे वारे..
2012 पासून देशाच्या राजकारणाची दिशा बदलू लागली. भ्रष्टाचार आणि तुष्टीकरण ला बढावा देणार्या राजकीय शक्तींच्या विरोधात अत्यंत मोठ्या प्रमाणात जनजागृती होऊ लागली. साथ लाभली प्रसार माध्यमे आणि सामान्य जनतेची. दोन वर्षानी देशात एक अभूतपूर्व सत्तापालट झाले, स्वच्छ बहुमत घेऊन नरेन्द्र मोदी पंतप्रधान झाले.
महाराष्ट्रचाले वेगळा..
लोकसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर राज्यात सत्ता बदल होणे अपेक्षित होते, परंतु ऐनवेळेवर, समविचारी आणि नैसर्गिक मित्र असलेले भाजप आणि शिवसेना काही कारणांमुळे वेगळे झाले. विधानसभेची निवडणूक चौहेरी झाली. भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला तरीही त्याला पाठिंब्याची गरज होती. राज्याला गरज होती राजकिय आणि आर्थिक स्थैर्याची. राज्यातील जनता, पायाभूत सुविधा सुधारतील आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल या अपेक्षेत होती.
अभूतपूर्व..
याच पार्श्वभूमीवर दिल्ली आणि नागपूर मधील श्रेष्ठींनी एक आश्चर्यकारक निर्णय घेतला, त्यावेळी चव्वेचाळीस वर्षीय देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांना महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणुन घोषित केले, एका ताज्यादमाच्या, अभ्यासू, तडफदार आणि कर्तव्यदक्ष कार्यकर्त्याला राज्याची पुनर्बाधणी करण्यासाठी पाचारण केले. राजकारणापेक्षा कामगिरीला प्राथमिकता देण्यात आली.
31 ऑक्टोबर 2014..
सर्वात मोठ्या पक्षाने अनुमोदित केल्याने, देवेंद्र फडणवीस 31 ऑक्टोबर 2014 ला राज्याचे अठरावे मुख्यमंत्री म्हणुन वानखडे स्टेडियमवर एका दिमाखदार सोहळ्यात शपथविधित झाले. राज्याच्या महत्वाकांक्षी भविष्याची एक नवीन सुरुवात झाली. सुरुवातीला बहुमत नसले तरीही, काही महिन्यांनीं शिवसेना भाजप सोबत सत्तेत सामील झाली. देवेन्द्र फडणवीसांचे सरकार स्थिर झाली. राज्यात राजकीय स्थैर्यला सुरुवात झाली.
महाराष्ट्रात देवेन्द्रपर्व..
2014-19 या काळात देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कामगिरीने राज्याची आर्थिक आणि राजकियबाजू सक्षमपणे पेलून नेली. राज्याचे दरडोई उत्पन्नात वाढ झाली, 2014-15 मधील सालाना एक लाख पंचवीस हजार रुपयांवरून, 2019-20 मध्ये दोन लाख रुपये एवढे.
अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र अधिक संपन्न होत होता.
राज्यात विदेशी गुंतवणूक २०१४ च्या तुलनेत तिप्पटीने वाढली. 2019 मध्ये राज्यात रुपये २५३०० कोटी एवढी परदेशी गुंतवणूक झाली (२०१८ च्या तुलनेत वेग मंदावला जरूर).
जरी राज्यावर कर्जाचा बोजा वाढला असला तरीही त्यातून तयार होणार्या सुविधा या शाश्वत राहणार होत्या, त्यातून राज्याला उत्पन्न मिळणार होते, जनतेला सोय होणार होती.
मेट्रो, जलयुक्त शिवार अभियान, मराठवाडा वॉटर ग्रिड, मुख्यमंत्री ग्रामीण रस्ते योजना, महासमृद्धि महामार्ग, कोस्टल रोड, यांसारखे अनेक प्रकल्प आणले गेले, त्यातील काही राबविले सुद्धा गेले.आज मुंबईत अडीचशे ते तीनशे किलोमीटर एवढे मोठे मेट्रो रेल्वेचे जाळे निर्माणाधीन आहे. पुढील तीन ते चार वर्षामध्ये जेव्हा हे तयार होईल, तेव्हा मुंबईची सर्वात मोठी समस्या बर्याच प्रमाणात कमी होईल.
बळीराजा महत्वाचा..
शेतकरी हा राज्याच्या विकासात महत्वाचा योगदान करतो हे जाणून, जलयुक्त शिवार योजना, नदीजोड प्रकल्प आणि मग शेतकरी शाश्वत कर्जमुक्त कसा होईल याच्या वर आधारित कर्जमाफी, आणि इतर कार्यक्रम राबवून सामान्य शेतकर्याला दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
उद्यमशील महाराष्ट्र..
महाराष्ट्राची गणती प्रगत राज्यांमध्ये होते, त्यात अव्वल स्थान मिळविण्यासाठी 'मैग्नेटिक महाराष्ट्र' या कार्यक्रमांतर्गत राज्यात प्रगत उद्योग आणण्याचे प्रयत्न केले गेले. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या भारतीय अर्थव्यवस्थेला 2025-26 पर्यंत पाच ट्रिलियन अमेरिकन डॉलर बनवण्याच्या कार्यक्रमात, महाराष्ट्र एक मोठे योगदान करू शकते. फडणवीस यांनी एक ट्रिलियन अमेरिकन डॉलर चे लक्ष्य ठेवले होते.
गारूड घातलया..
सुरुवातीला नवखे वाटणार्या देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मनमिळावू स्वभावामुळे आणि अभ्यासूवृत्तीमुळे प्रशासकीय वर्गात एक वेगळी पण सकारात्मक छाप निर्माण केली. त्याचा परिणाम राज्यातील कायदा सुव्यवस्था आणि इतर बाबींवर झाला. राज्यात जरी युतीचे सरकार होते, तरीही मित्रपक्षाकडून होणारे कानपिचक्याचे राजकारण, पक्षांतर्गत स्पर्धा (राज्यात आणी पश्चिम भारतात) या दुहेरी आव्हानांना सामोरे जाऊन त्यांना पद्धतशीरपणे हाताळणे गरजेचे होते.
त्यांच्या साथीला विरोधकांनी काही गटांना सोबत घेऊन केलेले जातीचे राजकारण लाभलेले होते. या सोबत राज्यातील इतर प्रश्न - अपराधांतून निर्माण होणारे सामाजिक प्रश्न, अनेक दशकांपासून प्रलंबित असलेले मराठा आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा; फडणवीसांच्या समोर उभे ठाकले. आपल्या सहकार्यांना आणि गरज पडली तेव्हा विरोधकांना विश्वासात घेऊन त्यांनी यातील अनेक प्रश्न मार्गी लावले.
त्यांच्या साध्या अनुशासनबद्ध आणि सुसंबद्ध कार्यपद्धतीबद्दल प्रशासकीय आणि राजकिय गोटांमध्ये आदर निर्माण झाला. सामान्य जनतेला स्वच्छ कारभार भावला. तरूण वर्गाला त्यांच्यातील निर्णायक आणि प्रगतशील नेता आवडला.
वाटले
दिल्लीला जातात का?
2016 च्या ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये असे चित्र निर्माण झाले होते की राज्यात नेतृत्व बदल होईल. परंतु तसे काही घडले नाही. त्यानंतर मात्र, भाजपने आणी फडणवीसांवर भरोसा कायम ठेवून राज्यातील राजकारणात भक्कमपणा आणला. पक्षाची तळागाळातील मतदातावरील पकड, सामान्य कार्यकर्त्यांची मेहनत, नरेंद्र मोदी यांची प्रतिमा आणि फडणवीस यांच्या पारदर्शक कारभारामुळे मुंबई आणि अनेक महापालिका निवडणुकांत भाजपने यश मिळविले.
निवडणुकीच्या वर्षांत अनेक घडामोडी घडतात, कुणी पक्षात येतात, कुणी जातात, अर्थात याचा विभागनिहाय ताळमेळ बसणे गरजेचे असते. महाराष्ट्रात तर जातीला सुद्धा अनन्य महत्त्वपूर्ण आहे. या सगळ्यांचा विचार करून टीम बनविणे गरजेचे असते, त्याच अनुषंगाने अनेक नेते पक्षात आले.
दरियादिल पार्टनर..
देवेंद्र फडणवीस यांना क्रिकेटमध्ये रस आहे. क्रिकेट मध्ये फलंदाजी करतांना, फलंदाज आपल्याच नाही तर दुसर्या टोकावर फलंदाजी करणार्या सहकार्याच्या धावांसाठी सुद्धा धावतो. हे अत्यंत महत्वाचे असते. त्यानी नुसता धावफलक खेळता राहतो असे नाही, तर सहकारी फलंदाजाच्या धावा वाढतात, त्याचा आत्मविश्वास गुणावतो, संघाच्या धावा वाढतात.
देवेंद्र फडणवीस सुद्धा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपल्या मित्रपक्षांना यश मिळावे म्हणुन राज्यभर भिंगरी लागल्यागत फिर-फिर फिरले. अर्थात त्यावेळी, ते राजकिय आणि मैत्री पर्यटनात रमले आहेत असे कुणी नाही म्हणाले. उलट त्यांच्या ब्रॅन्ड इमेजचा फायदाच लाटला.अबकी बार इतनी जोर से शॉट मारना की गेंद सिर्फ स्टेडियम के बाहर ही नहीं, बल्कि गाव के बाहर चली जाए गेंद (लोकसभा निवडणुकीच्या मुंबईतील शेवटच्या सभेत त्यांचे भाषण विशेष गाजले होते, त्यांनी स्टेडियमच्या बाहेर षटकार मारल्याचे कौतुक केले गेले).
बहोत कुछ कर दिखाया है..
राज्यात सलग पाच वर्षे यशस्वीपणे राज्यकारभार चालविण्याची किमया करून, पुन्हा तोच चेहरा वापरुन पक्षाने लढलेल्या सत्तर टक्के जागा निवडून आणल्याचा समाधान भाजपला असला तरीही वेळेवर झालेला धोका हा अभूतपूर्व आहे. हरण्याची जबाबदारी कुणाची यावर खल झाले असतिल, वरवर जरी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा बनाव आणला गेला असला तरीही, आतमध्ये, त्यांच्या पारदर्शक कारभारामुळे राज्यातील राजकारण्यांची किंवा संस्थांची कोंडी होऊ नये हे कारण सुद्धा असू शकते. अर्थात यात क्षेत्रीय राजकारण समजणे सुद्धा महत्वाचे आहे.
थोड़ा है, थोड़े की जरुरत है..
जाणकारांच्या मते फडणवीस यांचा कार्यकाळ तसा चांगलाच यशस्वी झाला , दोन-चार बाबी सोडल्या तर, जश्या - काही सहकाऱ्यांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, नाणार प्रकल्प रद्द होणे, पक्षांतर्गत महत्वाकांक्षा, निवडक अधिकारी आणि सहकाऱ्यांवरती अपेक्षेपेक्षा जास्त विश्वास, एक-दोन वेळेस प्रशासनात झालेले गैरसमजुती, आणि आधीच्या सरकारमधील भ्रष्टाचाराचे प्रकरणं पूर्णपणे तडीस गेले नाही. काही अनाकलनीय गोष्टी सुद्धा घडल्या - मैग्नेटिक महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्यक्रमात लागलेली आग, छत्रपती शिवस्मारकच्या पाहणीला गेलेल्या बोटीला समुद्रात झालेला अपघात, आणि त्यांच्या हेलिकॉप्टर मध्ये दोन-तीनदा झालेला बिघाड आणि अपघात (नुकताच त्यांच्या गाडीला सुद्धा किरकोळ अपघात झाला).
तरुणाई भक्कमपणे सोबत..
राजकीय वारसा जरी असला तरीही त्याचा फडणवीस यांच्या राजकीय प्रवासावर कितपत प्रभाव होता हे सांगणे कठीण आहे. तेच सांगू शकतील. मात्र सामान्य जनतेला त्यांनी वयाच्या बावीसाव्या वर्षी नागपूरचे महापौरपद सांभाळण्याचे अप्रूप वाटले असावे. त्यांचा स्वच्छ कारभार, घेतलेल्या शिक्षणाचा (नागपूरहून कायदा, आणि जर्मनीतून प्रोजेक्ट मॅनेजमेंट) पुरेपूर उपयोग करणे, अभ्यासपूर्वक आकडेवारीसह आपला विषय मुद्देसूदपणे (वेळ पडली तर वीररसाचा वापर करून प्रेरणा दायक संदेश देणे) मांडणे हे राज्यातील तरुण पिढीने ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्हीही पद्धतीने बघितले.
सोबतच, राज्याला प्रगत तंत्रज्ञान (आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हायपर लूप, फिनटेक) वापरुन पुढे नेण्याचा त्यांचा ध्यास, तरुण पिढीला राजकारण आणि प्रशासकीय गोष्टींचा अनुभव यावा यासाठी राबविलेली 'सिएम फेलोशिप' योजना, यामुळे तरुण पिढी सोबत त्यांचा एक 'सशक्त दुवा / स्ट्रॉन्ग कनेक्ट' निर्माण झाला. आजही तेवढाच आहे, किंबहुना वाढलाच असावा.
अनेक "फोर्स मल्टीप्लायर" निर्मित..
देवेन्द्र फडणवीस यांच्या कार्यकाळात राज्यात रुपये दोन लाख कोटींची पायाभूत सुविधांची कामे सुरू झाली. जेव्हा कधी रस्ते, वीज निर्मिती, रेल्वे, यांसारखी पायाभूत सुविधांचा निर्माण होतो तेव्हा त्यातून राज्याला पुढील काळात महसूल तर मिळतोच, परंतु या सुविधा निर्माण करताना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते, त्यावर केलेला पैसा पुन्हा अर्थव्यवस्थेत येतो, खेळतो, अर्थव्यवस्थेवर तीन ते पाच वर्षांत त्याचा सकारात्मक परिणाम होतो, जीडीपी वाढतो. याला "मल्टीप्लायर इफेक्ट" असे म्हणतात.
फडणवीस यांच्या कार्यकाळात सकारात्मक मल्टीप्लायर इफेक्ट असलेले अनेक प्रकल्प - मैग्नेटिक महाराष्ट्र, मेट्रो, समृद्धि महामार्ग, कोस्टल रोड, मराठवाडा वॉटरग्रिड, जलयुक्तशिवार अभियान इत्यादी, राबविले गेले. या प्रकल्पांना 'फोर्स मल्टीप्लायर' असे म्हणु शकतो. या 'फोर्स मल्टीप्लायरनी सामान्य जनतेमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड सकारात्मकता निर्माण केली.
फडणवीस यांच्या कार्यकाळात सकारात्मक मल्टीप्लायर इफेक्ट असलेले अनेक प्रकल्प - मैग्नेटिक महाराष्ट्र, मेट्रो, समृद्धि महामार्ग, कोस्टल रोड, मराठवाडा वॉटरग्रिड, जलयुक्तशिवार अभियान इत्यादी, राबविले गेले. या प्रकल्पांना 'फोर्स मल्टीप्लायर' असे म्हणु शकतो. या 'फोर्स मल्टीप्लायरनी सामान्य जनतेमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड सकारात्मकता निर्माण केली.
कब आओगे?
वैश्विक कोरोना महामारीने राज्यावर वैद्यकीय आणि आर्थिक संकट आले आहे. राज्य 'बॅकफुट'वर जाते की काय अशी भिती निर्माण झाली आहे.
- विरोधीपक्षनेता म्हणुन देवेंद्र फडणवीस फ्रंटफुटवर खेळत आहेत.
- राज्यातील जनतेने त्यांना कधी मुंबईतील आणि इतर जिल्ह्यातील इस्पितळे, क्वारणटाईन सेंटर मध्ये प्रशासकीय, वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना तर , दुसरीकडे कोकणात आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसानीची पाहणी आणि नुकसानग्रस्त परिवाराचे सांत्वन करतांना बघितले.
- विदर्भातील शेतकर्यांची बनावट बियाणांमुळे फसवणूक झाली, आर्थिक नुकसान झाले. फडणवीस त्यांच्या ही बांधावर जाऊन आले.
दुनियेने सगळे बघितले - राज्यात कोरोनाचा कहर आहे, तरीही उन-वारा-पाऊस यांची तमा ना बाळगता फडणवीस राज्यभर फिरत आहेत (महाजनादेश यात्रेपेक्षाही जास्त प्रामाणिकपणे), हे होत असताना सामान्य जनतेकडून फडणवीस यांच्या प्रामाणिक कार्यकाळाबद्दलची स्तुती, आणि त्यांनी लवकरात लवकर पुन्हा कार्यभार सांभाळावा याची कळकळ.
कुरकुरणारे ट्रोलकर..
फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना आणि नसताना सुद्धा, त्यांच्यावर टीका केली गेली - कधी जातीवाचक, तर कधी त्यांच्या शरीरात यष्टीवर. टीकाकार कधी राजकीय नेते होते, कधी त्यांचे बगलबच्चे तर कधी भाड्याने घेतलेले इंटरनेट वरील ट्रोलकर. टीकाकार दिवसेंदिवस खालच्या पातळीवर जात आहेत. कधी त्यांच्या पत्नी आणि आईवर अत्यंत अश्लाघ्य भाषेत टिप्पणी केल्या जात आहेत. हे घृणास्पद आहे.या टीकाकारांचे मालक हे विसरताना दिसतात की, भविष्यात एखाद्यावेळेस, पुन्हा त्यांच्याकडेच हात पसरवून जावे लागेल. कुणास ठाऊक? नियती कुणी बघितली आहे का?
टीमवर्क..
आपली लोकप्रियता असली तरीही फडणवीस आपल्या टीमला नेहमी उत्साहित करतात, त्यांच्या कार्याला पावती देतात. त्यांचे अस्तित्व मान्य करतात. कार्यक्षमता असलेले नवीन सहकारी जोडत असतात (राजकिय वारसा असेल नसेल). कुणीतरी म्हंटले आहेच, कॅप्टन हा टीम एवढाच चांगला किंवा वाईट असतो (a captain is as good as his
team).r
कुठेतरी टीस असेलच!
देवेन्द्र फडणवीस हे अत्यंत मनमिळावू असले तरी शेवटी मनुष्य स्वभावाने झाल्या घडामोडींमुळे त्यांच्या डोक्यात असंख्य प्रश्न असतिल, मेहनत घेऊन एकशे पाच जागा निवडून आल्यानंतरही एन मोक्याच्या वेळी सहकारीपक्षाने खो दिल्याने त्यांच्या मनात कुठेतरी टीस असेलच. त्याचे उत्तर आणि मलम काळाकडेच आहे. कालाय तस्मै नमः.
पुढे काय?
विरोधीपक्षनेते असले तरीही देवेंद्र फडणवीस हे सकारात्मक विचार करतांना दिसत आहे. राज्याची विस्कटलेली सामाजिक, वैद्यकीय आणि आर्थिकघडी पुन्हा कशी, चांगली आणि नव्या पद्धतीने घालता येईल याबाबतचे त्यांचे सतत आकलन सुरू असते. विविध क्षेत्रातील तज्ञांसोबत त्यांची सल्ला मसलत सुरू असते. प्रसारमाध्यमांच्याद्वारे ते आपली भूमिका मांडताना दिसतात. क्रिकेट मध्ये एक म्हण प्रसिद्ध आहे - 'फॉर्म हा क्षणिक असू शकतो, परंतु, दर्जा हा शाश्वत असतो' (Form is temporary, class is
permanent). ती इथे लागु होते असे वाटते.
जबरदस्त ब्रांड समीकरण..
ब्रांड "महाराष्ट्र" हा स्थैर्यासाठी,पायाभूत सुविधा, प्रशासकीय क्षमता आणि सकारात्मक आंतराष्ट्रीय प्रतिमासाठी ओळखला जातो. देवेंद्र फडणवीस ह्यांना जर ब्रांड समजले तर, त्यांच्या सोबत कर्तव्यदक्षता, निर्णायक, टेक्नोलॉजीला अनुकूल आणि प्रगतशील, आतंरिक सुरक्षेला महत्व देणारा, नविन पीढ़ीसोबत पक्का दुवा असे गुण लागु होताना दिसतील. दोन्ही ब्रांडचे गुण जोड़लेत तर एक जबरदस्त समीकरण तैयार होताना दिसेल!
कठोर व्हाच, पण नकारात्मक नाही..
काही आठवडय़ांपूर्वी एका मुलाखतीत 'मला किलर इन्स्टिंक्ट' नाही असे फडणवीस म्हणाले होते. त्यांना अपेक्षित असलेला किलर इन्स्टिंक्ट त्यांच्यात नसला तरीही, गरज आहे कठोर होण्याची. राजकारणात अजातशत्रू असणे हे मिथ्या आहे, ही एक परीकल्पना आहे. इथे कुणीही अजातशत्रु नसतो, अज्ञातशत्रु मात्र सगळेच असतात. त्यामुळे कठोर मन, कर्तव्यदक्षता आणि सदसद्विवेक बुध्दि शाबूत ठेऊन चालत राहणे हे गरजेचे आहे. दरारा निर्माण व्हायला हवा, जेणेकरून एखाद्या धोका देण्याच्या आधी दहादा विचार करेल. कुणीतरी म्हंटले आहे -
"मेरी दोस्ती का फायदा उठा लेना,
क्युंकी…मेरी दुश्मनी का नुकसान सह नही पाओगे .!!!"
जाता जाता..
देवेन्द्र फडणवीस अजुन तरुण आहेत. वरील ईसापनीतिच्या गोष्टींमध्ये नमूद केलेले गुण - अनुशासन, एकाग्रता, चिकाटी आणि दूरदृष्टी त्यांच्यात आहे. राज्यात नव्यापिढीचे लोकनेते म्हणुन ओळखले जातात. राजकियदृष्ट्या ते आता चांगल्यापैकी मुरलेले आहेत, त्यांचा आवाका वाढला आहे, क्षेत्रीय नेतृत्व म्हणुन त्यांची ओळख प्रस्थापित झाली आहे, विरोधकांनी कितीही कांगावा केला तरीही ही सत्यपरिस्थिती आहे. त्यांचे राजकारण मिरवणे, खिजवणे आणि उडविणे याच्या पलीकडचे आहे. ते सकारात्मक आहे. त्याचा धाक अनेकांना आहे.
ते एक चांगले लेखक सुद्धा आहेत - यावर्षी, अर्थसंकल्प आणि आत्मनिरभर भारत अभियान अंतर्गत महाराष्ट्राला मिळालेली मदत यावर पुस्तके लिहिली आहेत. सर्वसामान्य लोकांप्रमाणे ते सुद्धा परिवारात रमतात (अर्थ वेळ मिळाला तर, रोज सरासरी १2-१५ तास काम करतात असे ऐकले आहे ). त्यांना रहस्य / थ्रिलर आणि विनोदी धाटणीचे सिनेमे / वेब -सिरीज आवडतात.
जीवेत शरद: शतम्..
देवेन्द्र फडणवीस हे लवकरच एक्कावनव्या वर्षात पदार्पण करतील. तीस वर्षांचा राजकिय अनुभव त्यांच्या सोबत आहे. दिल्ली आणि नागपूर येथील ज्येष्ठांचा विश्वास आणि शुभाशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे.
संयमी, हुशार, प्रामाणिक, कर्तव्यदक्ष, प्रगतशील, प्रचंड निर्णय क्षमता असलेले, तरुणाईला गारूड घालणारे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. बोलतो तैसे करतो अशी त्यांची ख्याती आहे, त्याला ते जगतात. भेटी, ओळख लक्षात ठेवतात, माध्यमांमध्ये त्यांच्याबद्दल एक सकारात्मक आदर आहे.
आपले कसब ओळखून आपल्या आवडत्या क्षेत्रात कसे प्रगत व्हायचे याबद्दलचे ते एक रोल मॉडेल आहे. युवापिढी त्यांच्याकडून "आपले चांगले गुण ओळखून आपली कार्यक्षमता कशी वाढवायची" हे शिकू शकते (How to discover oneself, and discover the potential within).
संयमी, हुशार, प्रामाणिक, कर्तव्यदक्ष, प्रगतशील, प्रचंड निर्णय क्षमता असलेले, तरुणाईला गारूड घालणारे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. बोलतो तैसे करतो अशी त्यांची ख्याती आहे, त्याला ते जगतात. भेटी, ओळख लक्षात ठेवतात, माध्यमांमध्ये त्यांच्याबद्दल एक सकारात्मक आदर आहे.
आपले कसब ओळखून आपल्या आवडत्या क्षेत्रात कसे प्रगत व्हायचे याबद्दलचे ते एक रोल मॉडेल आहे. युवापिढी त्यांच्याकडून "आपले चांगले गुण ओळखून आपली कार्यक्षमता कशी वाढवायची" हे शिकू शकते (How to discover oneself, and discover the potential within).
मागच्या पाच वर्षांत, राज्याने त्यांची मेहनत आणि कल्पकता बघितली आहे. त्या अनुषंगाने त्यांना पक्षाच्या केंद्रीय विचारव्यवस्थेत स्थान मिळणे क्रमप्राप्त आहे. भविष्यात केंद्रामध्ये महत्वाची भूमिका ते बजावतील यात शंकाच नाही.परंतु आजघडीला, देवेन्द्र फडणवीस यांना परत एकदा राज्याची धुरा मिळावी अशी भावना जनतेमध्ये दिवसेंदिवस गाढ होत चालली आहे. ते सुद्धा त्यासाठी प्रयत्नरत असतिलच.
आजपर्यंत त्यांनी राज्याच्या प्रगतीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे अभिनंदन, आभार आणि त्यांच्या पुढील प्रवासाला शुभेच्छा. त्यांना एवढेच सांगावेसे वाटते की, देवेन्द्रजी, 'रुक जाना नहीं तू कहीं हार के (इम्तिहान, 1974, मजरुह सुलतान पूरी, किशोर कुमार, लक्ष्मीकांत प्यारेलाल)'.
"रुक जाना नहीं तू कहीं हार के
काँटों पे चलके मिलेंगे साए बहार के
ओ राही.. ओ राही..
साथी ना कारवां है
ये तेरा इम्तेहां है
यूँ ही चला चल दिल के सहारे
करती है मंजिल तुमको इशारे
देख कहीं कोई रोक नहीं ले तुझको पुकार के
ओ राही.. ओ राही.."
शुभम भवतु.
धनंजय मधुकर देशमुख, मुंबई
dhan1011@gmail.com
(लेखक एक स्वतंत्र मार्केट रिसर्च विश्लेषक आहे. वरील पोस्टसाठी लागणारी माहिती (फोटो, आकड़े, कविता) इंटरटनेट वरुन साभार गोळा करण्यात आली .)
खर आहे राजकारणात विश्वास घातकी लोक खुप असतात,अन प्रत्येक वेळी नरमाईच धोरण चालत नाही.कडकपणा तर पाहिजे च पण भाषा सुध्दा दादागिरीचीच पाहिजे.
ReplyDeleteखरे आहे, धन्यवाद 🙏
ReplyDelete