Skip to main content

Posts

Showing posts from May 24, 2020

एवढा द्वेष का?

24 मे 20 एवढा द्वेष का?? कोरोना विषाणू ने जगामध्ये कहर घातला आहे. भारत त्याला अपवाद ठरू शकला नाही. देशभर, सगळ्यांच राज्यात कोरोनाबाधित रुग्ण आहेत. काही राज्यांत मोठ्या प्रमाणात तर काही मध्ये कमी. जेथे रुग्ण कमी प्रमाणात आढळले तेथील बातमीदार/अधिकारी त्या वॉर्डचा किंवा जिल्ह्याचा किंवा राज्याचा "मॉडेल" जनतेत प्रस्तुत करीत आहेत. त्यात वावगे काहीच नाही. परंतु काही राज्यकर्ते असल्या तथाकथित "मॉडेल्स" चा वापर आपल्या प्रसिद्धीसाठी करण्यात गुंग दिसतात. असो. महाराष्ट्रात कोरोना ची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. मुंबई मध्ये तर अजून भयावह परिस्थिती आहे. मुंबईचा आकडा रोज हजार - दीड हजाराने वाढतोय. महाराष्ट्रात पहिले रुग्ण 7 ते 10 मार्च दरम्यान पुण्यामध्ये आढळले. आज त्याला 70 दिवस झाले आहे. मधल्या काळात महाराष्ट्रात अनेक कायदा व्यवस्था निगडित घटना घडल्यात. कोरोनाचा आकडा आटोक्यात येणे तर दूर, जी परिस्थिती आहे त्याला तोंड देण्यासाठी राज्यात कार्यक्षम उपाययोजना दिसली नाही. प्रशासकीय अधिकारी, मंत्री आणि राज्यकर्ते यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याच्या बातम्या आल्या. ...