24 मे 20
एवढा द्वेष का??
कोरोना विषाणू ने जगामध्ये कहर घातला आहे. भारत त्याला अपवाद ठरू शकला नाही. देशभर, सगळ्यांच राज्यात कोरोनाबाधित रुग्ण आहेत. काही राज्यांत मोठ्या प्रमाणात तर काही मध्ये कमी. जेथे रुग्ण कमी प्रमाणात आढळले तेथील बातमीदार/अधिकारी त्या वॉर्डचा किंवा जिल्ह्याचा किंवा राज्याचा "मॉडेल" जनतेत प्रस्तुत करीत आहेत. त्यात वावगे काहीच नाही. परंतु काही राज्यकर्ते असल्या तथाकथित "मॉडेल्स" चा वापर आपल्या प्रसिद्धीसाठी करण्यात गुंग दिसतात. असो.
महाराष्ट्रात कोरोना ची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. मुंबई मध्ये तर अजून भयावह परिस्थिती आहे. मुंबईचा आकडा रोज हजार - दीड हजाराने वाढतोय.
महाराष्ट्रात पहिले रुग्ण 7 ते 10 मार्च दरम्यान पुण्यामध्ये आढळले. आज त्याला 70 दिवस झाले आहे. मधल्या काळात महाराष्ट्रात अनेक कायदा व्यवस्था निगडित घटना घडल्यात.
कोरोनाचा आकडा आटोक्यात येणे तर दूर, जी परिस्थिती आहे त्याला तोंड देण्यासाठी राज्यात कार्यक्षम उपाययोजना दिसली नाही. प्रशासकीय अधिकारी, मंत्री आणि राज्यकर्ते यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याच्या बातम्या आल्या.
एक सामान्य नागरिक म्हणुन जेव्हा मी बघतो, तेव्हा मला असे जाणवले की एप्रिल पासून, सरकारला त्यांनी जबाबदारीने काम करावे असे जनतेने किंवा विरोधी पक्षाने प्रखरतेने निदर्शनास आणून देणे गरजेचे होते. लॉकडाऊन मुळे कदाचित ते जमले नसेल.
2019 मध्ये कोल्हापूरमधील महापुराच्या वेळी, त्यावेळच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या भूमिका जनतेने बघितल्या आहेत.
आज जर अश्या परिस्थितीत राज्यात भाजप सरकार असते तर भाजप विरोधीपक्षांनी अनेक समाजसेवी संस्था किंवा मोर्चासंघटना उभ्या करून त्यांच्या मार्फत मार्च मध्येच आंदोलने केली असती. 70 दिवस तर फारच झालेत.
त्यामानाने भाजपने फार संयम दाखविला असेच म्हणावे लागेल. पहिली केस आढळल्यानंतर, जवळपास 70 दिवसांनी, पक्षाने राज्यात "महाराष्ट्र बचाव" ची हाक दिली. ऑनलाईन + ऑफलाइन अश्या अभिनव पद्धतीने हे आंदोलन राबविले. यशस्वी केले.
परंतु, आता सगळीकडे भाजप, महाराष्ट्रद्रोही आहे अशी आवई उठविली जातेय. प्रसार माध्यमे, सोशल मीडिया, हे - सत्ताधारी नेते, कार्यकर्ते यांच्या "भाजप महाराष्ट्रद्रोही" संदेशांनी भरलेली आहे. भरवलेली आहेत.
महाराष्ट्र भाजप, आणि राज्यातील त्यांचे शीर्ष नेतृत्व, देवेन्द्र फडणवीस आणि चंद्रकांत दादा पाटील, आणि इतर नेत्यांवर अत्यंत खालच्या थराची टीका (वैयक्तिक, शारीरिक अंगावरून) केली जातेय. ग्राफिक्स, कार्टून आणि अत्यंत शेलक्या शब्दात त्यांनी महाराष्ट्रद्रोह केला आहे हे जनमानसात बिंबविण्यासाठी इतर पक्षातील नेते आणि कार्यकर्ते धावपळ करताना दिसत आहेत. हे अत्यंत निंदनीय आहे.
भाजप, भटांची पार्टी आहे, असा दुष्प्रचार नेहमीप्रमाणे सुरू आहे. माजी मुख्यमंत्र्यांना जाती वरून आणि इतरांना अंग / रंगावरून हिणवले जातेय. द्वेष पसरविला जातोय.
द्वेषाचे वातावरण तयार केले जातेय त्याच भाजपबद्दल आणि माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीसबद्दल, ज्यांच्या नावावर आणि कामावर महाविकास आघाडीच्या एका पक्षाला 56 जागा मिळाल्या. त्यांना यातील अनेक जागा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर वा मोदी, फडणवीस यांच्या कामगिरीवर वा भाजप (आणि संघ परिवार) कार्यकर्त्यांच्या पुण्याईवर मिळाल्या.
आणि आज, ते सत्तेत आहे तेव्हा, विरोधीपक्षाने जनतेच्या भल्यासाठी काही प्रश्न विचारले म्हणुन त्यांचा हा अपमान? टिंगल टवाळक्या? हा अपमान नाही द्वेष आहे. असूया आहे. विध्वंसकारी प्रवृत्तीचे प्रमाण आहे. "हम करे सो कायदा" ची मगरूरी आहे. अरेरावी आहे. जनता पुढेमागे याचे काय प्रत्युत्तर द्यायचे ते देईलच.
सद्यपरिस्थितित हे जाणणे महत्वपूर्ण आहे की हा द्वेष नेमका कसला आहे? कशाला आहे? का आहे? कुणाला आहे?
भाजप म्हणजे अनुशासनता. परिवार वादाला वाव नाही. देश प्रथम. मग पक्ष आणि नंतर कार्यकर्ता. त्यामुळे इथे सगळ्यांनाच समान विचारसारणी आणि अनुशासना चे पालन करावे लागते. करतात.
परंतु, यांचा द्वेष नेमका कशाला?
हिंदुत्वाला? राष्ट्रवादाला?
भाजपचे हिन्दुत्व, हे विदुषक जसा रंगीबिरंगी झगे घालतो तसा भगवा रंगाचा झगा घातलाय असे नाही. त्यांचे हिंदुत्व हे जन्मजात आहे. राष्ट्रवाद हा पक्षाला जन्मापासूनच अंगीकृत आहे, अजूनही जोपासला जातोय. पुढेही राहणार आहे. त्यात कधीच तडजोड झाली नाही. होणार नाही.
तेव्हा भाजपच्या हिंदुत्ववादी आणि राष्ट्रवादी भूमिकेला काही कपाळकरंट्यांचा विरोध असणे स्वाभाविक आहे.
द्वेष करणारे कोण असावेत?
गेली सत्तर वर्षे ज्यांना भारतात संभावना असतानाही समृद्ध करता आले नाही, परिवार वादाच्या अजगर मिठीतून ज्यांनी कधी देशाला निघू दिले नाही, आणि आपल्या अपयशाला हिंदू मुस्लीम चा मुलामा देऊन, आपण कसे धर्मनिरपेक्ष आहोत हे दाखविण्यासाठी सतत खटाटोप करणारे.
अनुशासनाला विरोध?
सकाळी एक, दुपारी दूसरे आणि रात्र होता होता काहितरी तिसरेच बरळायचे हे भाजपच्या चरित्रात बसत नाही. इतर पक्षांतील नेत्यांना मात्र याची सवय आहे. पक्षामध्ये अनुशासनहीनतेला थारा नाही. कदाचित त्याचा ही राग असावा?
भाजपमध्ये जायचेय पण आपल्याला हे कधीच जमणार नाही हे जेव्हा काही नेत्यांना उमगते तेव्हा ते वैफल्यग्रस्त होतात आणि गरळ ओकतात.
चुकलेली संधी?
मागच्या वर्षी अनेक छोट्यामोठ्या नेत्यांना भाजप मध्ये सामील केले गेले. काहींना मानाने सामील केले गेले. काही इच्छेने सामील झाले. काही नेत्यांना लोकसभा, विधानसभा, आणि नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत मानाने संधी दिली गेली. काहींना यश मिळाले, काहींना नाही. काही मंडळीना मोर्चा किंवा पक्षात इतर महत्वपूर्ण जबाबदार्या दिल्या गेल्या. अर्थात अनेक असे नेते असावेत ज्यांना त्यावेळेस भाजपमध्ये सामील केले गेले नाही किंवा तशी संधीच मिळाली नाही. त्याचा परिणाम म्हणुन आता हे नेते, प्रवक्ते आगपाखड करताना दिसताहेत.
समान संधीची शाश्वता? (Equal Opportunity Provider)
भाजप मध्ये, बहुतांशी जो कार्यक्षम आहे त्यांना, त्यांच्या कार्यक्षमतेप्रमाणे संधी दिली जाते असे म्हणतात. आत्ता झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपने चार नवीन चेहरे देऊन हेच सिद्ध केले. कदाचित, इतर पक्षातील नेत्यांना / प्रवक्त्यांना अशी संधी त्यांच्या पक्षात कधी मिळाली नसावी म्हणुन तर भाजप द्वेष नसावा?
आम्हाला पण घ्या?
कधी कधी जेव्हा एखाद्याचे ऐकले जात नाही, तेव्हा ती व्यक्ति तुमच्या विरुद्ध आकांडतांडव करते. त्याचा मूळ मुद्दा असतो, माझ्याकडे या. माझ्याशी बोला (Get me on the table to talk).
स्वपक्षामध्ये भविष्य / शाश्वती नाही?
इतर पक्षातील नेते या भीतीतून ग्रासलेले असावेत की त्यांची जागा / पद हे कधीही काढून घेतले जाऊ शकते. विशेषतः जेव्हा आत्ता झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेने, कॉन्ग्रेस कडून एक जागा जादा घेतली. पुढेमागे कॉन्ग्रेस ने ही जागा परत मागितली तर? तेव्हा कुणाला तरी आपली जागा खाली करावी लागेल! आपला त्यात नंबर लागू नए म्हणुन कदाचित काही नेत्यांनी "Offence is best defense" (स्वतः ला वाचवायचे असेल तर दुसरा आक्रमण करण्याच्या आधीच आपण आक्रमण करणे) ची शक्कल लढवित असतिल. मग ते, IT सेल किंवा PR कंपनि कडून थिल्लर कार्टून काढून सोशल मीडिया मध्ये टाकणे, काहीतरी जातीवाचक बोलणे अश्या कृतीमध्ये मशगूल दिसतात.
जानेवारी 2019 पासून प्रशांत किशोर नावाचे स्वयंघोषित "आधुनिक चाणक्य" हे राजकीय विश्लेषक शिवसेनेच्या रणनीतीक आरमाराला आपली बुध्दिने समृद्ध करीत होते असे माध्यमातून कळते. त्यांच्या नंतर कॉन्ग्रेसच्या एक प्रवक्त्या सेनेत दाखल झाल्यात. त्यांनाही आपले स्थान जमविण्याचा अधिकार आहेच, आणि ते मग रोज सोशल मीडिया वर भाजप, त्यांच्या नेत्यांवर काही ना काही टीका करतात.
त्यामुळे असे आढळते की, ह्या नेत्यांचा उदय व्हायच्या आधी पक्षात जे "भूमिपुत्र/पुत्री" आहेत ते आता ते आपले अस्तित्व टिकविण्यासाठी यांच्यापेक्षाही खालच्या स्तरावर जाऊन टीका करताना दिसताहेत. काही काळापासून, आपल्या विरोधकांवर किती खालची टीका जमेल याचे प्रात्यक्षिक दाखविले जातेय. मग ही टीका शारीरिक, जातीवाचक असली तरी चालेल असा त्यांचा कल दिसतोय. द्वेष होतोय.
आपण याच नेत्यांसोबत पाच वर्षे राज्य केले, याच मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले हे सपशेल विसरलेले दिसतात.
हिंदू विरोध?
विधानसभा निवडणुकीच्या एन तोंडावर शिवसेना आणि भाजपमध्ये मुंबईतील मेट्रो 3 साठी आरे उद्यानातील वृक्षतोडी वरून बरीच जुंपली होती. ज्या समाजसेवी संस्था या वृक्षतोडीचा विरोध करीत होत्या, त्यातील काहींना चर्चचा पाठींबा होता असे म्हणतात.
भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत पक्ष आहे, आणि मुस्लिम आणि दलित विरोधी आहे असा अपप्रचार काही संस्था, राजकिय पक्ष, प्रसार माध्यमे नेहमीच करीत असतात. यांचे पाठिराखे, राजे कोण हे सर्वज्ञात आहे.
दमदार कामगिरी?
कधी कधी आपले यश हेच आपल्याला खाली नेते असे म्हणतात. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप सेने ने मागील पाच वर्षात एक सुसूत्र, स्वच्छ, आणि पारदर्शी सरकार दिले. भ्रष्टाचार मुक्त आणि कामगिरी युक्त असे सरकार ज्याने महाराष्ट्राला राजकिय आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले होते. व्यवसाय, प्रगती आणि स्थैर्य राज्यात एका नवीन उंचीवर नेले गेले होते.
आता विद्यमान राज्यकर्त्यांना ही उंची गाठणे जमत नाही तर मग आपल्या चुका झाकण्यासाठी तर ते टीका करीत नाही?
पक्षांतर्गत गटबाजी?
एखाद्या पक्षाचे नुकसान पक्षाच्या विरोधकांपेक्षा अंतर्गत गटबाजीतून सुद्धा होते. बर्याचदा बाहेरच्या लोकांना रसद घरातलेच (कधी कधी ते दुसर्या गावातील पण असू शकतात) नाराज सदस्य पोहोचवत असतात. त्यातूनच मग विरोधक टीका, विरोध किया टिंगल टवाळ्या करतात.
"निंदकाचे घर असावे शेजारी" अशी म्हण आहे. परन्तु निंदकाचे हे कर्तव्य आहे की, त्यांनी समाज, जाति, धर्म, वैयक्तिक बाबी - बाजूला ठेवून निंदा /टीका करावी. कार्य, कार्यशैली, वैचारिकता यावर निंदा केली तर ती योग्यच असते. त्याचा फायदाही होऊ शकतो.
परंतु, जाती, धर्म, परिवारातील सदस्य, शारीरिक किंवा इतर व्यंग यावर केलेली टीका ही टीका नसते. ती असूया असते. ती यासाठी की तुम्ही ज्या व्यक्तीवर किंवा संघटनेवर टीका करायचा विचार करताहेत, त्यांच्या बद्दल तुमच्या कडे टीका करण्या सारखे काहीच नाही आहे. किंबहुना, त्यांच्या मध्ये असलेले गुण आपल्यात नाही ह्याच असूयेने टीका होते असे वाटते.
महाविकास आघाडीचे "आमचे सरकार" स्थापित होऊन आता सहा महिने होतील, तरीही, महाराष्ट्रात भाजपला विरोध नेमका कशाला?
1. भाजप राज्यात कधीही परतू शकते या भीतीतून?
2. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना का विरोध करण्यात येतो?
- त्यांची अचाट नेतृत्व आणि कार्यक्षमता?
- स्वच्छ कारभार? दमदार कामगिरी?
- ते विदर्भाचे आहेत म्हणुन?
- ब्राह्मण?
- किचकट प्रश्न सोडविले उदाहरणार्थ मराठा आरक्षण.
म्हणजे राज्यातील भाजप नेतृत्वाचा चेहरा बदलला की त्यांचा विरोध शमणार? ह्यांचा बोलविता धनी नेमका कोण? अनेक मंडळी डोळ्यासमोर येतात.
3. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विरोध?
ह्याच रा स्वः संघाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला नोव्हेंबर 2019 मध्ये मध्यस्थी करण्याची गळ घातली गेली? मग विरोध कुणाच्या इच्छेखातर?
4. मागच्या वर्षीपासून महाराष्ट्रातील एका पक्षातील काही मंडळी भाजपच्या राष्ट्रीय नेत्याला आपण मोठा भाऊ मानतो असे जाहीर करतात, पण भाजपच्याच दुसर्या नेत्यावर विश्वासघाताचा आरोप लावतात.
ह्यांना कुठली नवीन "लाइन ऑफ ऑर्डर" तयार करायची आहे का? ह्याला कोणाचे आणि कुठून पाठबळ लाभतय ?
विचार करण्यासारखे आहे. नेमक्या किती लोकांकडून कोणी सुपाऱ्या घेतल्या आहेत. आणि नेमक्या कुणा कुणाविरूद्ध आणि कुणाकुणा कडून!
भाजप किंवा त्यांचे राज्यातील नेते, नेतृत्व अश्या मुशीत घडलेले आहेत की त्यांना याची काडीमात्र चिंता नाही.
राष्ट्रहित सर्वोपरि आणि अंत्योदय, या विचारधारेचा पुरस्कार आणि अनुसरण करणारे हे शिलेदार आहेत. ते कधी झुकले नाही. कधी निर्ढावले नाही.
लोकशाही मध्ये विरोध करण्याचा हक्क हा मूलभूत हक्क आहे, त्याचा वापर व्हायलाच हवा. विरोध म्हंटले की टीका आलीच. निंदा किंवा टीका असेल तर ठीक, परंतु ती असूया होऊ नए. असूयेतून अनेक अपघात घडतात.
तेव्हा, राजकारण्यांनो, जरा जपून! निंदा किंवा टीका तेवढीच करा, जी तुम्हाला झेपेल. उद्याला जेव्हा तुम्ही एकमेकांसमोर असाल तेव्हा तुमची मान खाली जाणार नाही असे बघा. परतीचे दोर कापले जाणार नाही याचा विचार करा. टीका करा, दुष्मनी नका होऊ देऊ. द्वेष नका करू. असूया तर नक्कीच नाही.
राजकीय टीका आणि व्यक्तिगत टीका या दोन वेगळ्या बाबी आहेत. राजकारणात, आपल्या विरोधकांच्या परिवाराला किंवा त्यांच्या व्यक्तिगत बाबी किंवा व्यंगावर टीका करू नए हा अलिखित नियम आहे. परंतु आज परिस्थिती बदललेली आहे. आजकालच्या नवराजकारण्यांना तात्काळ समाधान (instant gratification) हे जास्त महत्वाचे वाटते. मग ते स्व बुद्धीने ने म्हणा किंवा भाडोत्री PR एजेंसी ला सोबत घेऊन अश्या घाणेरड्या थराला जाऊन टीका करतात.
कुणीतरी म्हंटले आहे -
टीका टिप्पणी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे,
जब कभी हम दोस्त हो जाएँ तो शर्मिंदा न हों.
कालाय तस्मै नमः!
- धनंजय मधुकर देशमुख
मुंबई
dhan1011@gmail.com 🙏

Comments
Post a Comment