Skip to main content

Posts

Showing posts from July 12, 2020

गारूड घातलया..

13  जुलै 20, मुंबई बोले तैसा चाले , गारूड घातलया .. आपल्यापैकी बहुतांश लोकांनी पंचतंत्रातील गोष्टी वाचल्या असतिल . त्यातील दोन नमूद कराव्याशा वाटतात . एकदा वारा आणि सूर्या मध्ये , दोघांपैकी कोण शक्तिवान आहे यावरून भांडण होते . त्यांना एक यात्रेकरू रस्त्यावरून जाताना दिसतो . त्याने घातलेला कोट कोण काढेल याची पैज लागते . वारा आपली शक्ति दाखवितो , अत्यंत वेगाने आणि जोराने वाहतो . यात्रेकरू मात्र आपला कोट घट्ट पकडून उभा राहतो . मग सूर्य हळू हळू तापायला सुरू होतो , यात्रेकरू आपला कोट काढतो , घामाघूम होतो . कासावीस होतो . सूर्य जिंकतो . तात्पर्य - एकाग्रचित्ताने आणि चिकाटीने आपली शक्ति थोड्या थोड्या प्रमाणात वाढवून केलेले प्रयत्न यशस्वी होतात . एक नाकतोडा गवतात नुसताच हुंदडत असतो . मात्र त्याचवेळी मुंगळे , अन्नाचे छोटे छोटे कण घेऊन झाडात जात असतात , अविरतपणे . नाकतोडा हसतो , म्हणतो काय मुर्ख आहेत , जेव्हा बघावे तेव्हा काम करीत असतात . काही दिवसांनी दुष्काळ पडतो , नाकतोड्य...