Skip to main content

Posts

Showing posts from July 31, 2020

मीच एकटा राजहंस, बाकी सगळे...

31 जुलै 20, मुंबई मीच एकटा राजहंस , बाकी सगळे . . लहानपणी ( किंवा आताही ) मराठीतील प्रसिद्द कवि , श्री ग . दी . माडगूळकर यांचे श्रीनिवास खळे यांच्या संगीताने अजरामर झालेले गीत " एका तळ्यांत होती बदकें पिलें सुरेख " आपण सगळ्यांनी कधी ना कधी तरी ऐकलेलं असेलच . एका तळ्यांत होती बदकें पिलें सुरेख होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक कोणी न तयास घेई खेळावयास संगे सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे … या कवितेची सुरुवात फार हृदयद्रावक आहे , पण अंत मात्र सुखावह आहे . ते " बदक " स्वतःचे रूप पाण्यात बघते , आणि त्याला कळते की आपण वेगळे आहो , एक राजहंस आहोत . आणि तो उडून राजहंसांच्या थव्यात सामील होतो . ही एक साहित्यिक कल्पना जरी असली तरी , आपल्याला बर्‍याचदा आसपासच्या वस्तुस्थितीत तिचे दर्शन होते . अर्थात , अनेकदा त्याचा अट्टाहास होताना दिसतो . " मीच एकटा राजहंस , बाकी कावळे " असा तोरा किंवा मानसिकता ठेवून वागणारे अनेक लोक आपल्याला अवतीभवती दिसतात , ल...