31
जुलै 20, मुंबई
मीच एकटा राजहंस, बाकी सगळे..
लहानपणी (किंवा
आताही) मराठीतील प्रसिद्द कवि, श्री ग.दी.
माडगूळकर यांचे
श्रीनिवास खळे
यांच्या संगीताने अजरामर झालेले गीत
"एका तळ्यांत होती बदकें पिलें सुरेख" आपण सगळ्यांनी कधी ना कधी
तरी ऐकलेलं असेलच.
एका तळ्यांत होती बदकें पिलें सुरेख
होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक
कोणी न तयास घेई खेळावयास संगे
सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे…
या कवितेची सुरुवात फार हृदयद्रावक आहे,
पण अंत मात्र
सुखावह आहे. ते
"बदक" स्वतःचे रूप
पाण्यात बघते,
आणि त्याला कळते
की आपण वेगळे
आहो, एक राजहंस
आहोत. आणि तो
उडून राजहंसांच्या थव्यात
सामील होतो.
ही एक साहित्यिक कल्पना जरी असली
तरी, आपल्याला बर्याचदा आसपासच्या वस्तुस्थितीत तिचे दर्शन होते.
अर्थात, अनेकदा त्याचा
अट्टाहास होताना
दिसतो. "मीच एकटा राजहंस, बाकी कावळे" असा तोरा किंवा
मानसिकता ठेवून
वागणारे अनेक
लोक आपल्याला अवतीभवती दिसतात, लहान, मोठे,
शिक्षित, अशिक्षित. प्रत्येक क्षेत्रात असे डबक्यातले राजहंस
दिसतात (जसे झारीतले शुक्राचार्य असतात
तसे).
अगदी लहान मुलांच्या खेळाच्या टूर्नामेंटच्या वेळेस, बरेच
पालक आपलाच पाल्य
सुपरस्टार आहे
या तोऱ्यात वावरतात. कधी खरे ठरतात,
अनेकदा तोंडघशी पडतात.
क्रिडा, कला क्षेत्रात सुद्धा अनेक स्टार
पुत्र, पुत्री लॉंच
होताना आपण बघतो,
अर्थात त्यातील अनेक
स्टार आले तसेच
गायब सुद्धा होतात.
शेवटी जनता किंवा
त्यांचे कौशल्य,
कर्म ठरवते की
खरा राजहंस कोण.
राजकारणात सुद्धा
असेच आढळते. अर्थात
या क्षेत्रात (क्रीड़ा किंवा कला क्षेत्रात च्या तुलनेत) काही
मंडळी पाहिजे ते
मिळविण्यासाठी अनेक
वर्षे तग धरून
बसतात. अजूनही बसलेली
दिसतात. युवा नेते
ते पक्षाध्यक्ष झाले
तरीही, आपल्याच कुटुंबाला देश चालविण्याचा अधिकार
आहे या राजहंसी विचारात दिसतात.
गुर्मीत वावरतात.
"मीच राजहंस", ही एक मानसिकता आहे, ज्याला आपण सुपीरीयरिटी कॉम्प्लेक्स (superiority complex) म्हणु शकतो.
महाराष्ट्रातील राजकीय
पटलावर आपल्याला अनेक
"राजहंस" दिसतात, यातले
काही खरे, काही
तोतये आणि काही
आव आणलेले असतिल.
अर्थात काळाच्या ओघात
हे जनतेला कळतेच
की कोण खरं
राजहंस आहे ते.
काहींना फक्त
आम्हीच "राजहंस" होऊ
शकतो असा गैरसमज
आहे. काहीही झाले
तरी, येनकेनप्रकारेण राजहंसांच्या थव्याचे नेतृत्व फक्त आम्हीच करू
अशी महत्वाकांक्षा कायम
असते (मग हाती
फक्त पाच खासदार,
आणि पन्नास आमदार
असले तरीही).
अनेक मंडळी अश्या
आहेत की जे
कायम "आम्हाला कुणी
हरवू शकत नाही"
या गुर्मीत असतात.
भारतीय जनतेने अनेक
राजकारणी घराण्यांची राजकिय सद्दी तोडली
आहे. 2014 आणि 2019 मध्ये
नरेंद्र मोदी
यांचा झालेला दणदणीत
विजय याचे एक
उदाहरण आहे.अर्थात,
असे असले तरीही
काही मंडळी यातून
बोध घेताना दिसत
नाही. "गिरे तो
भी टांग ऊपर"
अशी त्यांची मानसिकता आहे. असो.
"ब्लॅक स्वान"
राजहंस साधारणतः हा
पांढरा असतो. इंग्रजीत त्याला स्वान म्हणतात. परंतु एखाद्या वेळे
दुर्मिळ असा
काळा राजहंस (ब्लॅक
स्वान) दिसू शकतो.
मात्र हा खूपच
दुर्मिळ असतो.
आपल्या आयुष्यात सुद्धा
"ब्लॅक स्वान" ईवेंट
(म्हणजे अत्यंत अनाकलनीय) घडतात. नसीम तालेब या इस्राइल च्या लेखकाने, "ब्लॅक स्वान" नावाच्या त्याच्या पुस्तकात याचे सविस्तर वर्णन केले आहे.
कोरोना महामारी जगामध्ये सध्या सगळीकडे पसरलेली आहे. ज्यामुळे मानवनिर्मित व्यवस्थेवर (आरोग्य,
आर्थिक) एक अभूतपूर्व संकट ठाकले आहे.
हे अनाकलनीय होते.
जगामध्ये सगळीकडे हाहाकार माजलेला आहे, आपण याला
एक "ब्लॅक स्वान"
ईवेंट म्हणू शकतो.
असे अनेक "ब्लॅक
स्वान" ईवेंट आपण
अनुभवलेले असतिल
- आयुष्यात, व्यापार, उद्योग, व्यवसाय, कला
आणि क्रीड़ा क्षेत्रात, आणि राजकारणात सुद्धा.
नोव्हेंबर 2019 मध्ये महाराष्ट्रातील राजकारणात असाच एक "ब्लॅक स्वान" ईवेंट झाला आणि, एकशे पाच आमदार आणि युतीला 161 जागा असून सुद्धा भाजप सत्तेपासून दूर झाला. व्हावे लागले. केला गेला. पण हे अनाकलनीय होते हे मात्र खरे.
कसा हाताळावा "ब्लॅक स्वान" ईवेंट?
खरे तर "ब्लॅक
स्वान" ईवेंट हा
कधीही होऊ शकतो.
म्हणून, कुठलाही कार्यक्रम ठरवताना, त्याच्या सगळ्याच बाजू
पडताळून बघणे
गरजेचे असते. काहींना हे आवडत नाही.
त्यांना "ब्लॅक
स्वान" ईवेंटचा विचार
करणे म्हणजे अपशकुन
केल्यासारखे वाटते.
पण जो सर्वसमावेशी असतो, तो पूर्ण
विचार करतो, त्यात
"ब्लॅक स्वान" ईवेंट
सुद्धा असतो. प्रत्येक कार्यात तो
असू शकतो, गरज
असते ती - तो
काय असू शकतो,
आपण त्याला कसे
सामोरे जाऊ, त्यासाठी काय उपाययोजना राहतील
आणि तो कधी
होऊ शकतो, हे
समजून घेण्याची. हे
जेव्हा जमते तेव्हा
एक समतोल आराखडा
तयार होतो, आणि
कार्य पूर्णपणे तडीस
नेले जाऊ शकते.
इथे हे समजून घेणे गरजेचे आहे की जे लोक एखाद्या अपेक्षित "ब्लॅक स्वान" ईवेंट चा विचार करतात, आणि उपाययोजना करावयास सांगतात ते काही त्यांच्या निराशेपोटी किंवा नकारात्मक मानसिकतेतून सांगत नाही. जो "ब्लॅक स्वान" ईवेंट चा विचार करतो तो नकारात्मक असतो असेही नाही.
अर्थात, प्रत्येक क्षेत्रातील "ब्लॅक स्वान"
ईवेंट हा वेगवेगळा असू शकतो, त्याचा
आवाका आणि त्याची
फळे वेगवेगळी असू
शकतात. जसे की,
- कुणाच्या आयुष्यात दुर्दैवी अपघात, अकाली निधन,
- कुणी नैराश्याच्या गर्तेत जातो;
- शेअर मार्केट मध्ये काही मिनिटांत कीमती 30-50 टक्क्याने पडणे,
- वैद्यकीय क्षेत्रात कोरोना सारखी महामारी,
- २६ जुलै २००५ ला मुंबई मध्ये एका दिवसात 900 mm पाऊस पडणे आणि अनाकलनीय अशी पूरपरिस्थिती निर्माण होणे
- अमेरिकेत 9/11 किंवा मुंबईत 26/11 सारखे आतंकवादी हल्ले होणे
- २५ जुन १९८३ ला वेस्टइंडिज ची बलाढ्य क्रिकेट संघ भारतीय क्रिकेट संघाच्या अवघ्या १८३ धावांचे आव्हान पूर्ण करू शकले नाही। वेस्टइंडिज क्रिकेट साठी एक "ब्लॅक स्वान" इव्हेंटच असावा
- अर्थव्यवस्थेसाठी तेलाच्या किमती रातोरात दुपटीने वाढणे, किंवा
- नागरिकता संशोधन कायद्यास (CAA) झाला विरोध आणि दंगे
- भारताच्या अखंडतेला नख लावणाऱ्या कट्टरपंथीय लोकांची मानसिकता बदलून ते मुख्य प्रवाहात येतील हा भ्रम. हे झाले तर तो ब्लॅक स्वान इव्हेंट होईल
- नेपाळसारख्या हिंदूराष्ट्राने भारताला डोळे दाखविणे (परंतु याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे)
- राजकारणात - महाराष्ट्रात जे मागच्या नोव्हेंबर मध्ये घडले ते.
खरेतर, महाराष्ट्रातील राजकारणात जे घडले त्याची
बरीच चाहूल (2019 च्या
सुरुवातीला प्रशांत किशोर महाराष्ट्रात सक्रिय
झाले, त्यानंतर शिवसेनेत कॉन्ग्रेस मधुन
काही नेतेमंडळी आली,
काही मंडळी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गेली) आधी
पासून दिसत होत्या
- फक्त त्या वेळेत
समजल्या गेल्या
नसाव्यात, किंवा
आपण त्यातून निघून
जाऊ हा विश्वास असावा, किंवा तसं
काही होणे शक्यच
नाही हा विचार
असावा.
कधीही काहीही अघटित
घडू शकते या
मानसिकतेने ज्याने
तयारी केली ते
लोक कुठल्याही संकटातून तरून जातात. तसे
घडले तर संघर्ष
होतो, तरीही कमी
नुकसान किंवा ज्याला
आपण कॅल्क्युलेटेड रिस्क
म्हणतो ते.
जाता जाता..
बर्याच वर्षांपूर्वी वीडियोकॉन मोबाईल
कंपनिच्या नेटवर्क सर्विसच्या जाहिराती फार समर्पक वाटतात.
यात "पकडो लाइफ का हर सिग्नल" या
ब्रीदवाक्याला धरून
वेगवेगळ्या परिस्थितीत (युवा जोडपे, गृहिणी)
सिग्नल वेळेतच पकडण्याचे फायदे दाखविले होते.
अर्थात, वीडियोकॉन कंपनिची मोबाइल सेवा कालांतराने बंद झाली हेही
खरे - कदाचित त्यांना सुद्धा "सिग्नल" पकडता
आला नसावा.
महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती बघता, त्यात बदल अटळ आहे असे दिसते, तो कसा आणि कधी होतो हे पाहणे हे मात्र उत्सुकतेचे ठरेल. येणार्या काळात, महाराष्ट्रातील राजकिय पटलावर पुन्हा एकदा एक नवीन "ब्लॅक स्वान" ईवेंट घडतो का हे बघुया.
आर्टिफिशीयल इंटेलिजन्स (Artificial Intelligence, AI) किंवा
कृत्रिम बौद्धिकतेच्या मदतीने येणार्या काळात बराच बदल
घडू शकतो. कदाचित
AI च्या मदतीने "ब्लॅक
स्वान" ईवेंट ची
चाहूल लागण्यास मदतही
होऊ शकते. परंतु,
बहुतांश वेळी
AI आधी घडलेल्या माहितीवर काम करते, तेव्हा
जुन्या आठवणी पुसून
जाऊ देऊ नका,
त्यातुन बोध
घ्या.
तेव्हा ओळखा, आपल्या
आयुष्यातील, किंवा
व्यवसायातील "ब्लॅक
स्वान" ईवेंट, आणि
करा तरतूद त्याप्रमाणे. नवीन समीकरणे तयार
करा आणि आपल्या
आसपासचे सगळेच
"राजहंस" आहेत या
विशाल भावनेतून कामाला
लागा.
शुभम भवतु.
धनंजय मधुकर देशमुख,
मुंबई
Dhan1011@gmail.com
(लेखक एक स्वतंत्र मार्केट रिसर्च विश्लेषक आहे. वरील पोस्टसाठी लागणारी माहिती (फोटो, आकड़े, कविता) इंटरटनेट वरुन साभार गोळा करण्यात आली .)
***************
Comments
Post a Comment