Skip to main content

Posts

Showing posts from June 25, 2020

किलर इन्स्टिंक्ट

26 जून 20 किलर इन्स्टिंक्ट (Killer Instinct) killer instinct - a tendency to be ruthless and single-minded in dealing with opponents. म्हणजे आपल्या विरोधकांशी लढताना निर्दयीपणे आणि एककल्ली पणे वागणे.. थोडे मागे जाऊया, 1996 च्या क्रिकेट विश्वकप मध्ये जो भारत, श्रीलंका आणि पाकिस्तान येथे झाला होता. श्रीलंकन क्रिकेट टीम विश्वविजेती झाली होती ऑस्ट्रेलियाला हरवुन. या  विश्वचषकातील बंगलोर येथे झालेल्या भारत पाकिस्तान मधील उपांत्यपूर्व सामन्याची गोष्ट आहे. नवज्योतसिंह सिद्धू (93) आणि अजय जडेजा (45) यांच्या भरघोस योगदानामुळे भारतीय चमूने पन्नास षटकांत 287 धावा केल्या. पाकिस्तानला 49 षटकांत 288 धावा करायच्या होत्या. त्यांची सुरुवात जोरदार झाली, 11 व्या षटकांत पहिली विकेट पडली तेव्हा  87 धावा झाल्या होत्या. अपेक्षित असलेल्या रनरेट पेक्षाही पाकिस्तानचा रनरेट या घडीला चांगला होता.  पाकिस्तानचा कर्णधार आमिर सोहेल त्या दिवशी चांगला जमला होता, परंतु 15 व्या षटकांत गम्मत झाली. भारताकडून "लोकल बॉय" वेंकटेश प्रसाद गोलंदाजी करीत होता. त्याचा पाचवा चेंडू सोहेल ने ऑफ साइडला तडकावला, च...