5 जून 20, मुंबई
प्रत्येकक्षेत्रात ते दिसतील, मग ते क्षेत्र व्यापार असो की मनोरंजन, सीनेजगत, खेळ असो की राजकारण. सगळीकडे आपल्याला कौशल्य आणि धोक्याने जिंकणारे दिसतात. काही आपण अनुभवलेले असतात.
वेळेतच जागे व्हा!
कौशल्य की वृत्ती - काय महत्वाचे?
आजचा विषय थोडा वेगळा आहे. त्यासाठी आपण काही किस्से तपासून बघुया.
पहिला किस्सा - धोका जिंकला
एका जंगलात प्राणी आणि पक्ष्यांमध्ये जंगलाचा प्रमुख कोण या विषयावरून मोठा वाद होतो. पक्ष्यांची संख्या जास्त असल्यामुळे काही पक्षी आपल्यालाच गटातील एकाला प्रमुख करावे असे आवाहन करतात. शेवटी निवाडा होतो, की जो कुणी दुसर्या दिवशी सकाळी सूर्याच्या जितक्या जवळ जाऊन दाखवेल त्याला प्रमुख मानण्यात येईल. मग तो पक्षी असो किंवा प्राणी.
दिवस उजाडतो. सगळे प्राणी आणि पक्षी आपल्याला परीने धावपळ करतात. प्राण्यांमध्ये कुणाला वाटते की जर ते पहाडाच्यावरती चढले की सूर्याजवळ पोहोचतील. त्यामुळे त्यांची चढाओढ सुरू होते. बरेचसे भारीभरकम प्राणी धावपळ करून थकतात. नाराज होऊन परत येतात.
पक्ष्यांमध्ये मात्र उत्साह असतो. चिमणी पासून ते गरूड पर्यंत सगळेच पक्षी आपापल्या परीने उंचीने उडतात.
अर्थात चिमणी, मैना, पोपट, कावळे यांसारखे छोटे पक्षी फार उंच आणि लांब पोहोचू शकत नाही, म्हणुन ते नाराज होऊन परत येतात.
सगळ्यांना एक मोठा गरुड आकाशात खूप उंच उडतांना दिसतो. सगळे प्राणी आणि पक्षी खाली उभे आहेत हे पाहून स्वाभाविकपणे गरुड़ाला वाटते की तो जिंकला, आणि तो खाली झेपावतो. परन्तु त्याच वेळेस त्याच्या पंखातून पिवळ्या रंगाचा एक छोटा पक्षी (warbler), बाहेर निघतो आणि अजूनवर झेप घेतो. बराच वेळ उंच भरारी घेतल्यामुळे गरुड थकलेला असतो त्यामुळे इच्छा नसतानाही तो परतवर उडू शकत नाही. तो पण नाराज होऊन खाली येतो.
अर्थात, जंगलातील अनेकांनी हे बघितले असते की "पिवळ्या warbler पक्ष्याने" धोका करून झेप घेतली आहे त्यामुळे तो विजयी नाही असे ते म्हणतात. परंतु अनेक प्राणी आणि पक्षी, ज्यांना फारसे लांबचे दिसत नाही, त्यांच्या लेखी पिवळा warbler पक्षीच विजयी असतो.
असो, ही काल्पनिक कथा आहे, परंतु यातून जे अधोरेखित ते हे की," पिवळा warbler पक्षी" हा त्याचा कौशल्यामुळे नाही जिंकला तर धोक्यामुळे जिंकला. गरुडाकडे कौशल्य आणि ताकद असतांना सुद्धा त्याची हार झाली. धोका जिंकला, कौशल्य हरले.
*****
किस्सा दुसरा - कौशल्य जिंकले
हा खरोखर घडलेला किस्सा आहे. फॉर्म्युला वन काररेसिंग मध्ये 1985 ते 1994 च्या काळात ब्राझीलच्या आय्यरटन सेना (Ayrton Senna) आणि फ्रान्सच्या अँलन प्रॉस्ट (Alain Prost) यांच्या मध्ये नेहमी जुगलबंदी व्हायची.
सेना हा तसा जिगरबाज आणि कौशल्यवान रेसर होता, प्रॉस्ट मात्र तेवढा धाडसी नव्हता. त्यामुळे सेना बर्याचदा आपल्या कौशल्याच्या आणि धाडसीपणाच्या बळावर जिंकायचा. एकदा एका महत्त्वपूर्ण रेस मध्ये प्रॉस्ट हा सेनापेक्षा बराच पुढे असतो. मात्र शेवटच्या काही लॅप व्हायच्या आधी जोराचा पाऊस येतो. रेस मात्र सुरूच असते.
एरवी पावसात रेसिंग करणे हे नेहमीच जिकरीचे, आणि वेळेचे अन्तर भरून काढणे हे त्याहूनही कठिण. परंतु इथेच सेना आनंदतो. कारण त्याला पावसात चालवण्याचा नुसता अनुभवच नसतो तर तसे करणे त्याला प्रचंड आवडायचे सुद्धा. त्याची खासियतच होती ती.
इकडे पाऊस जोर पकडत असतो आणि दुसरीकडे सेना बघताबघता प्रॉस्टला कधी मागे सोडून पुढे जातो, आणि शेवटच्या लॅप मध्ये जिंकतो हे कुणालाच कळत नाही. अर्थात आय्यरटन सेना ती रेस जिंकतो त्याच्या कौशल्याने आणि धाडसाने.
*****
वास्तवात येऊया!
आता आपण आपल्या जगात येऊया. भारतात येऊया.
जेव्हा आपल्या अवतीभवती आपण बघतो तेव्हा आपल्याला अनेक आय्यरटन सेना आढळतील. आणि अनेक "पिवळे warbler पक्षी" सुद्धा.
प्रत्येकक्षेत्रात ते दिसतील, मग ते क्षेत्र व्यापार असो की मनोरंजन, सीनेजगत, खेळ असो की राजकारण. सगळीकडे आपल्याला कौशल्य आणि धोक्याने जिंकणारे दिसतात. काही आपण अनुभवलेले असतात.
साधे सीनेजगताचेच घ्या. ज्या सिनेअभिनेते, अभिनेत्री, लेखक, गायक किंवा दिग्दर्शक या मंडळींना सामान्य जनतेनी त्यांचे सिनेमे बघून किंवा सिनेमातील नेहमी सत्याची बाजू राखणारी आणि सर्वसामान्यांना न्यायदेणार्या त्यांच्या भूमिकेवर प्रेम करून, डोक्यावर घेतले, प्रसिद्ध केले, गर्भश्रीमंत केले, तीच मंडळी त्यांच्या खर्या अवतारात आपल्याच देशाबद्दल, देशातील व्यवस्थेबद्दल, देशाला दिशा देणार्या लोकांबद्दल विष ओकते.
यात दुर्दैवाने खेळाडू, शास्त्रज्ञ, लेखक आणि इतर सुद्धा अनेक मंडळी त्यांना साथ देतांना दिसतात. खेळाडू, शास्त्रज्ञ सोडले तर बाकीची मंडळी, जरी त्यांच्या कौशल्यावर पुढे आली असली तरी त्यांच्या प्रसिद्धीच्या मनोऱ्यांचा भक्कम पाया हा जनतेच्या प्रेमाचा असतो. आहे. भावनेचा आहे.
आधी सर्वसामन्यांच्या कमाईवर अवलंबूनराहून पैसा कमवायचा, आणि पाहिजे तेवढे जमवल्यानंतर या महानुभावांना समाजसुधारणा सुचते. व्वा.
ही समाजाला अजगर मिठी मारणारी मंडळी इथेच थांबत नाही, तर देशाचे वातावरण सतत कसे खराब होईल, देशात कशी अराजकता माजेल, समाजात तेढ कशी निर्माण यासाठी दिवसरात्र कारनामे करीत असते. त्यांच्या दिमतीला प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया, राजकारणी नेते, विदेशीनिधीवर सोकावलेल्या गैरसरकारी संस्था (NGO) आणि अनेक भरकटलेली डोकी असतातच, विशेषतः युवापिढी (नव्वदीच्या नंतरची).
लोकशाही, धर्मनिरपेक्षता, प्राणीप्रेम, समानता या अनेक गोंडस मथळ्याखाली ते युवा पिढीला जवळ करतात, त्यांचा बुद्धीभ्रम (brainwash) करतात आणि राष्ट्रवादी (nationalistic) सरकारविरोधी एल्गार करावयास भाग पाडतात. "भारत तेरे तुकडे तुकडे होंगे, असे म्हणणाऱ्यांना ही मंडळी राजाश्रय देते.
आपण हे 2014 पासून बघत आलो आहोत. अनुभवले आहे. गेल्यावर्षीतर, नागरिकता संशोधन कायद्याला विरोध म्हणुन अनेक आंदोलने उभी केली गेली. या आंदोलनांमधील आगी, गोळीबार, दगडफेक, दंगे, पोलिसांवरील हल्ले हे आपण सगळे बघितले आहेच.
आतातर अमेरिकेत सध्या सुरू असलेल्या "Black Lives Matter" या चळवळीच्याधर्तीवर एक चळवळ भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे ट्विटर वरील संभाषणातून कळते.
अर्थात, देशाच्या संविधानावर, आजघडीच्या राष्ट्रवादी (nationalistic) सरकारवर, आणि त्यांच्या नेतृत्वावर देशातील सर्वसामान्य जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे हे "पिवळे warbler पक्षी" फार काळ उडणार नाही किंवा फारवर जाऊ शकणार नाही हे आपल्याला माहिती आहे. मात्र सर्वसामान्य जनतेलाच त्यांना खाली करायचे आहे. तसे करणे गरजेचे आहे.
साबण जर त्वचा चांगल्या प्रकारे स्वच्छ करीत असेल, आणि मऊ ठेवत असेल, तर त्याचा उपयोग तुम्ही ताप घालविण्यासाठी करणार का? नाही ना.
याच बुद्धीने सर्वसामान्य जनतेने, एखादी व्यक्ति ज्या क्षेत्रातील कामामुळे लोकप्रिय झाली असेल, त्या व्यक्तीला फक्त त्याच क्षेत्रातील बाबींच्या बाबतीत महत्वपूर्ण मानले तर जास्त योग्य. तसेच बघायला हवे. त्यांच्या इतर विषयावरील मतांना फारसे वाव, भाव देता कामा नए. यातच सगळ्यांचे भले आहे.
तरच यातील अनेक "पिवळे warbler पक्षी" जमिनी वर येतील.
वेळेतच जागे व्हा!
पालकांनो, आपले पाल्य वरील नमुद केलेल्या पद्धतीच्या लोकांच्या किंवा, त्यांच्या विचारसरणीच्या तावडीत सापडली की नाही याचा वेळेतच शोध घ्या.
त्यांच्याशी देशातील व्यवस्थेत वर संवाद साधा. त्यांचे मत जाणून घ्या. त्यांच्या विचारांची चाहूल घ्या. "आपल्याला काय करायचे", किंवा "माझा मुलगा /मुलगी, भाऊ /बहीण लहान आहे. त्यांना अजून काही अक्कल नाही" या विचारसारणीतुन बाहेर या. अंमली पदार्थांचे सेवन (Drug addiction) एकदा सुटू शकते पण विचारसरणी ची कीड कधी निघत नाही. हे भयंकर आहे. आपली मुले या कीड पासून वाचवा. समाज वाचवा. देश वाचवा.
असो.
महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या आठ-दहा महिन्यात आपण दोन्ही किस्से बघितले आहे. "पिवळ्या warbler पक्ष्याच्या" किस्स्यासारखे अनेक घटना अनुभवल्या आहेत ज्यात कमी पात्रतेकडून अधिक पात्रतेचा धोखा झाला आहे.
मात्र, येणार्या नजीकच्या काळात अनेक घटना घडू शकतात ज्यात दुसर्या किस्स्यात नमूद केल्यासारखे कौशल्याचा विजय होईल. पुनरागमन होईल. पावसाचे झालेच आहे.
देशाच्या राजकारणात आजघडीला अनेक असे "पिवळे warbler पक्ष्याच्या" मानसिकतेचे पक्ष सक्रिय असतिल. अनेक राजकीय पक्षांमध्येसुद्धा अनेक
"पिवळे warble पक्ष्याच्या" मानसिकतेचे नेते, कार्यकर्ते सक्रिय असतिल.
"पिवळे warble पक्ष्याच्या" मानसिकतेचे नेते, कार्यकर्ते सक्रिय असतिल.
आशा करूया इतर पक्ष किंवा त्यांच्या पक्षातील लोक या "पिवळ्या warbler पक्ष्यांची" वेळेतच दखल घेतील. प्रसारमाध्यमे, आणि इतर विश्वासार्ह व्यक्तींना सोबत घेऊन "पिवळ्या warbler पक्ष्यांच्या" कारनाम्याचा लेखाजोखा जनतेत मांडतील आणि लोकांच्या भावनेचा आदर प्रस्थापित करतील.
तळटीप -
दुसर्या किस्स्यातील "पिवळ्या warbler पक्षाची" कथा पूर्ण झाली नव्हती. गरुड खाली आल्यानंतर सगळ्या प्राण्यांना वस्तुस्थिती सांगतो, पुरावे देतो." पिवळ्या warbler पक्ष्याची" उडायची क्षमता किती आहे हे पुरावे देऊन आपले म्हणणे पटवून देतो.
दुसर्या किस्स्यातील "पिवळ्या warbler पक्षाची" कथा पूर्ण झाली नव्हती. गरुड खाली आल्यानंतर सगळ्या प्राण्यांना वस्तुस्थिती सांगतो, पुरावे देतो." पिवळ्या warbler पक्ष्याची" उडायची क्षमता किती आहे हे पुरावे देऊन आपले म्हणणे पटवून देतो.
अर्ध्या प्राण्यांना तर ते आधीच माहित होते, पण गरुडाच्या मुद्देसूद मांडणीमुळे उरलेल्या प्राण्यांमधील बहुतांशी प्राण्यांनासुद्धा त्याचे म्हणणे पटले आणि ते त्याला प्रमुख घोषित करतात.
नंतर ते सगळे त्या "पिवळ्या warbler पक्ष्याचा" शोध घ्यायला जातात. दरम्यान, "पिवळ्या warbler पक्ष्याला" दुसर्या एका पक्ष्याकडून याची कुणकुण लागते, आणि तो आधीच फरार होतो, त्या जंगलात कधी ना परतण्यासाठी.
असे म्हणतात, की आजही हा "पिवळा warbler पक्षी" बहुतांशी वेळ एकटाच असतो. लपूनछपुन असतो. गरुड मात्र दरवेळी उडायच्या आधी आपले पंख नीट तपासून घेतो. असो.
मतितार्थ -
धोका कुणीही कुणालाही कधीही देऊ शकतो. त्यात फारसे कौशल्य लागतय नसते. आम्हीच कसे बुध्दिबाज आहोत याचा कुणी कितीही आव आणीत असले तरीही.
धोका कुणीही कुणालाही कधीही देऊ शकतो. त्यात फारसे कौशल्य लागतय नसते. आम्हीच कसे बुध्दिबाज आहोत याचा कुणी कितीही आव आणीत असले तरीही.
कौशल्य असते ते धोक्याच्या धक्क्यातून बाहेर येऊन सकारात्मक पद्धतीने काम करून यशस्वी होणे यात. पुनरागमन करणे.
धोका देणे ही वृत्ती आहे, ती कधीच कौशल्य होऊ शकत नाही.
धोका देणे हा राजकारणाचा भाग आहे हे माझ्यामते तरी खरे नाही. धोका देणे आणि राजकारण करणे या दोन एकदम वेगवेगळ्या बाबी आहेत. कधीच ना सोबत येणार्या.
धोका कुणीही देऊ शकतो. मात्र राजकारण कुणालाही नाही जमू शकत.
आपल्यात जे कसब आहे ते कर्तव्यदक्षते येणे पार पाडणे हे कौशल्य आहे. राजकारण करण्यासाठी कौशल्य लागते.
तेव्हा तुम्हीच ठरवा, कौशल्य महत्त्वाचे की वृत्ती.
*****
भरोसा जितने कि चीज़ है तोड़ने की नहीं. आखिर, मौका सभी को मिलता है.
किसीने सही ही कहा है -
"किसी पर "भरोसा" करते वक्त सावधान रहिए..
दूर से तो फिटकरी और मिश्री दोनों एक जैसी नजर आते हैं!
दूर से तो फिटकरी और मिश्री दोनों एक जैसी नजर आते हैं!
भरोसा जितना कीमती होता है.. धोखा उतना ही महंगा हो जाता है!
ईमानदारी का दाम कौन जाने, यहा हर बेईमान राजा हो जाता है!"
ईमानदारी का दाम कौन जाने, यहा हर बेईमान राजा हो जाता है!"
कालाय तस्मै नमः.
- धनंजय मधुकर देशमुख, मुंबई
dhan1011@gmail.com
dhan1011@gmail.com
Comments
Post a Comment