Skip to main content

बीत गई सो बात गई

30 मे 20, मुंबई
बीत गई सो बात गई.

क्रिकेटचा सामना रंगलाय. टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवसाच्या शेवटाच्या सत्राच्या खेळाला सुरुवात झाली आहे. वातावरण आभाळी आहे, पण मध्येच सूर्य प्रखरपणे डोकावून जातो. हवा सुद्धा नेहमीपेक्षा थोडी जास्त आहे. पीच वरील गवत अजूनही जिवंत आहे. साठ षटके झाल्यामुळे बॉल थोडा जुना झाला आहे, परंतु एखाद्या मुरलेल्या स्विंग गोलंदाजाला रिवर्स स्विंग टाकायला एकदम पोषक परिस्थिती. हा गोलंदाज, फलंदाजाचा कधी घसा कापला जाईल, तर त्याच्या कधी मानेला फटका बसेल असे बाऊन्सर फेकतो, तर, मध्येच रिवर्स स्विंग करून यॉर्कर टाकतो. फलंदाजांची पुरे पळापळ होते. काय करावे सुचत नाही. असो.

टेस्ट क्रिकेट म्हंटले की गोलंदाज नजरेसमोर येतात. विशेषतः, ऐंशीच्या मध्यापासून ते नव्वदीच्या सुरवातीच्या काळातील वेगवान गोलंदाजी करणारे बरेच विंडीज, ऑस्ट्रेलियन, इंग्लिश, न्यूझिलॅण्ड आणि भारतीय गोलंदाज नजरेसमोर येतात, सोबत येते त्यांची शैली, खासियत. कुठलाही वेगवान गोलंदाज बाऊन्सर टाकण्यात पटाईत असतो. ते त्याचे अस्त्रच असते. परन्तु बाऊन्सर कोण टाकतो, यावर सुद्धा त्या बाऊन्सरची घातकता अवलंबून असते. उदाहरणार्थ, मालकम मार्शल, हा विंडीजचा खेळाडू, त्याच्या संघातील इतर गोलंदाजांच्या तुलनेत कमी उंचीचा होता, परंतु माझ्यामते, त्याचे बाऊन्सर अत्यंत घातक रहायचे. तो फार उंच नव्हता त्यामुळे तो बाऊन्सर टाकतांना ज्या पद्धतीने वाकायचा आणि जोर लावायचा, कदाचित, टेक्निकल भाषेत सांगायचे तर ते optimum असावे. त्याचा असर जबरदस्त व्हायचा. त्याचे उसळणारे चेंडू बघण्यात एक वेगळीच मौज असायची. अर्थात फक्त बघण्यात. फलंदाजांना आपले कसब पणाला लावावे लागायचे. (अर्थात, याच मार्शलला आपल्या कृष्नमाचारी श्रीकांत याने सामन्यातील पहिल्याच षटकाच्या पहिल्या दोन चेंडूवर खेचलेले दोन सलग षटकार हे बघणे सुद्धा तेवढेच मौजेचे). ब्रूस रीड किंवा कोर्टनी वाल्श किंवा कर्टले अंब्रोस यांना प्रभावशाली यॉर्कर टाकणे फारसे कठीण नसायचे, कारण त्यांची उंची फायद्याची ठरायची. भारतीय गोलंदाज कपिल देव, रॉजर बीन्नी किंवा मनोज प्रभाकर हे चेंडूला वेगाने वळवून स्विंग करायचे. प्रत्येकाची आपापली पद्धत होती. प्रत्येक खेळाडू आपल्या शरीरयष्टीचा, आपल्या हुनर चा वापर करून खेळत असतो.

असे वाचले होते की, एकदा, एका वेगवान गोलंदाजाला पत्रकाराने विचारले, तुझा नशिबावर विश्वास आहे का? तो म्हणाला, नेमके सांगू शकत नाही , पण तसे बघायला गेले तर एक गोलंदाज म्हणुन मला सहा चेंडू टाकताना एकदाच नशिबवान ठरावे लागते (त्याची विकेट घेण्यासाठी) , परंतु फलंदाजाला दरवेळेला नशिबवान व्हावे लागते. तेव्हा तुम्ही ठरवा कोण नशीबवान आहे. माझ्या माहितीप्रमाणे या गोलंदाजाचे नाव कपिल देव होते.

थोडक्यात काय, क्रिकेट असो की राजकारण, किंवा इतर कुठलेही क्षेत्र. फक्त नशीब बलवत्तर असुन चालत नाही. यशस्वी होण्याकरता तुमच्याकडे कर्तुत्व असायला हवे. यशस्वी होण्याची भूक असावी लागते. कर्तुत्व गाजवण्याची ताकद असावी लागते. कर्तव्य दक्षतेचा प्रामाणिकपणा असावा लागतो. असो.

महाराष्ट्रात परतूया. वास्तवात येऊया.

गेल्या नोव्हेंबर पासून महाराष्ट्रातील राजकिय परिस्थिती दोलायमान आहे. वरतून शांत, स्थिर वाटते, परंतु आत मध्ये, घड्याळाच्या ठोक्याला बदलत आहे. बदलली जात आहे.

कोरोना वैश्विक महामारीने महाराष्ट्राला ग्रासले आहे. परिस्थिती गंभीर आहे की नाही, हे, प्रसार माध्यम आणि तथाकथित राजकिय विश्लेषक आपापल्या परीने रंगविताना दिसत आहेत. त्यांना जमेल तसे किंवा त्यांना सांगितले असेल तसे. कोरोना रोगात परिवर्तित झाला आहे त्यामुळे तो आता राहणार. वाढेल ती आपली प्रतिकारशक्ती - वैद्यकीय, शारीरिक आणि मानसिक. पुढच्या काही महिन्यात त्यावर लस सुद्धा येईल. तेव्हा सध्या रुग्णांचे बरे होण्याचे वाढते प्रमाण आणि त्यावरील प्रतिबंधात्मक लस लवकर येण्याची आशा यामुळे सामान्य जनतेची मानसिक प्रतिकारशक्ती थोड्याफार प्रमाणात वाढेल. सगळेच आशावादी आहेत.

मागच्या आठवडय़ात महाराष्ट्र भाजपाने "महाराष्ट्र बचाओ" हे आंदोलन अभिनव पद्धतीने यशस्विपणे पार पाडले.  भाजपच्या म्हणण्यानुसार त्यांनी हे आंदोलन कोरोनामुळे राज्यातील सामान्य लोकांना होत असलेल्या त्रासाला वाचा फोडण्यासाठी किंवा त्याला मोकळी वाट देण्यासाठी केले होते. या आंदोलनाचा परिणाम म्हणजे राज्यातील राजकीय वातावरण तापले. सत्ताधाऱ्यांमध्ये आणि विरोधी पक्षामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.

माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील इतर भाजप नेते आता बाहेर निघाले आहेत. फ्रंटफूटवर आले आहेत. त्यांच्या वर झालेल्या आरोपांच्या फैरी त्यांनी यशस्वीपणे टोलावून लावल्या आहेत.

आता ते गोलंदाजाच्या रुपामध्ये दिसत आहेत. विशेष करून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हे कधी गळा कापणारा तर कधी मान तोडणारा बाऊन्सर फेकतात, तर कधी आत येणारा वेगवान यॉर्कर. आधी त्यांनी वर्चुअल पत्रकार परिषद घेऊन, केंद्र सरकारने दिलेल्या मदतीचा अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत लेखाजोखा मांडला. अर्थात त्यात Devolution of Taxes, Fiscal Space आणि इतर भलीमोठी बाउन्सर्स होतीच.

असो, त्याला उत्तर म्हणुन आघाडी सरकारच्या तीन ज्येष्ठ मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांचे बाउन्सर्स टोलविण्याचे भरपूर प्रयत्न केले. आता ते किती यशस्वी ठरले हे ज्याचे त्यांनी ठरवावे.

परंतु, असे म्हणतात, देवेन्द्र फडणवीस जेव्हा एखाद्या नवीन विषयावर सविस्तर बोलतात ते दोन चार दिवस ताजे राहते. या मागचे कारण असते त्यांचा अभ्यास आणि विषय सुलभपणे मांडण्याची पद्धत. तेव्हा लगेच त्याला "चिरफाड" करणे हे समजूतदार व्यक्तीने टाळावे.
नाहीतर तर त्याचा व्हायचा तो भ्रमनिरास होतो.

फोडणीचा कुस्करा (फोडणीची पोळी) हा शिळ्या पोळीचा जास्त चांगला लागतो असे म्हणतात (माझाही अनुभव तोच आहे). ताज्या पोळीचा केलेला फोडणीच्या कुस्कराला खरपूसपणा नसतो. मजा नाही येत. असो.

एका चाणाक्ष गोलंदाजाप्रमाणे, देवेंद्र फडणवीस यांनी त्याच संध्याकाळी त्वरित फ़ेसबुक लाइव (आम्हालाही करता येते) करून तिघा फलंदाजांना जायबंदी केले. त्या दिवशी तर त्यांनी काही चेंडू, वाईड लेगस्पिन टाकून स्वतःच जाऊन काहींना यष्टीचीत सुद्धा केले.

हि अतिशयोक्ती वाटणे साहजिक आहे. परंतु जेवढ्या प्रभावीपणे फडणवीस यांनी आकडेवारी सादर केली तेवढी त्यांचे विरोधक करू शकले असे ऐकिवात नाही आले.

गेल्या काही दिवसांपासून, फडणवीस यांनी मुलाखतसत्रे सुरू केली आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी सगळ्या भाषांच्या माध्यमांना त्यांनी भरपूर वेळ दिला. अर्थात, सद्यः परिस्थिती मध्ये माध्यमे, विशेष करून, राज्यातील मराठी माध्यमे किती एककल्ली किंवा एकाच बाजूने झाली आहे हे संपूर्ण राज्याने अनुभवले आहे. तेव्हा त्यांची प्रश्नावली तयारच होती.

परंतु, आता या मुलाखती बघितल्यावर असे वाटते की काही मुलाखतकार तर चपराक खाऊन खाऊन थकले असतिल. एक मराठी (महा?) संपादक तर, सलग सात ते आठ मिनिटे मूग गिळून होते म्हणतात. देवेंद्र फडणवीस जेव्हा बोलायचे थांबले तेव्हा या पत्रकाराला हायसे वाटले असावे.

एका दुसर्‍या नामांकित मराठी पण इंग्रजी चॅनलच्या संपादकाला फडणवीस यांनी "ऐसी सरकार कभी पाच साल चलती है क्या" असा बाळबोध प्रतिप्रश्न विचारला, तर त्याचे हाव भाव बघण्यासारखे होते. मार खाल्लाय पण रडता येत नाही अशी अवस्था झाली होती. हिंदी मध्ये म्हणायचे झाले तर, "चेहरे की हवाईया उड रही थी". अर्थात या संपादकाला असल्या गोष्टींची सवयच आहे.

दुसर्‍या एका हिंदी - इंग्रजी मुलाखतकाराने, फडणवीस यांना मागच्या नोव्हेंबर मधील घटनाक्रमाबद्दल छेडले असता त्यांनी, अत्यंत नम्रपणे "बीत गई वो बात गई" असे उत्तर देऊन आपले म्हणणे पुढे नेले. जे हाणायचे ते हाणले.

मराठीतिल अजून एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना त्यांनी मुलाखतकारालाच प्रतिप्रश्न केले, "सामान्य नागरिक म्हणुन तुम्हाला खरेच वाटते का राज्यातील, विशेषतः मुंबईची परिस्थिती सुधारली आहे म्हणुन?". अत्यंत शांततामय वातावरणात पुढील मुलाखत झाली. अर्थात व्हायचा तो खट्याळपणा झाला. मुलाखत सुरू असताना जाहिरात ब्रेक घेतला गेला आणि शेवटी फडणवीस बोलत असतानाच मुलाखतकाराने धन्यवाद म्हणुन मुलाखत गुंडाळली!असो, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. लोकशाही आहे.

गम्मत ही आहे, की याच वाहिन्यातील बरेचसे पत्रकार मागच्या वर्षी, देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेशयात्रा सुरू असताना, त्यांच्याशी बसमध्ये बसुन किंवा बसवरती उभे राहून, त्यांची मुलाखत घेताना आपल्याला कसा प्राइम स्पॉट मिळेल याच्या मागे लागलेले दिसत होते. चढाओढ दिसत होती. अगदी, जसे साबणाच्या जाहिराती मध्ये दाखविल्या प्रमाणे "मेरा शर्ट तेरे शर्ट से ज्यादा सफेद है" या तोऱ्यात.

थोडक्यात, क्रिकेट मध्ये जसे आढळते त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस गोलंदाजी करीत आहेत. कधी बाऊन्सर तर कधी यॉर्कर टाकून राज्यकर्त्यांना भंडावून सोडत आहेत. त्याचा परिणाम असा झाला की आता काही नेते त्यांना मौनव्रताचे सल्ले देत देऊ लागले आहेत, मौन व्रतावरील पुस्तके भेट देण्याच्या बाता करीत आहेत. बघुया काय होते ते.

कारण, अजून बरेच "महामुलाखतकार" बाकी आहेत. मध्यंतरीच्या काळात ते फलंदाजी करायला येतात की नवीन गोलंदाजी करतात हे बघणे महत्वाचे ठरेल.

महाराष्ट्रात लवकरच मोसमी वारे दाखल होतील. सोबत पाऊस आणतील. सुरुवातीचा पाऊस हा अत्यन्त साग्रसंगीत पद्धतिने होतो - जोराचा वारा सुटतो, घट्ट काळे ढग दाटतात, त्यांची आपसात होणारी जोरदार आदळआपट, मग मध्येच विजेचा कडकडाट. आणि मग वरुणराजा अवतरतात. पाऊस येतो. पडतो. कोसळतो.

जोराचा पाऊस आला की किडे, कावळे, गीधाड़े, साप सगळे एकाच झाडाजवळ येतात. जीवनमरणाचा खेळ रंगतो. त्यांच्यासाठी जीवनाचा व्यवहार असतो तो. असो.

प्राण्यांच्या जीवनचक्रावरून सहजपणे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या अग्निपथ (1991) गाजलेल्या सिनेमातील एक मोठा संवाद आठवला.

"कहने को तो ये शहर है, पर यहा आज भी जंगल का कानून चलता है. यहा हर ताक़तवर कमजोर को निगल लेता है. चींटी को बीस्तुइया (पाल) खा जाती है, और बीस्तुइया को मेंढक निगल लेता है. मेंढक को साप निगल लेता है, और नेवला सांप को फाड़ खा जाता है. भेड़िया नेवले का खून चूस लेता है, और शेर भेड़िये को चबा जाता है. यहा हर कोई अपने से कमजोर को मार के खा जाता है. जीता है."

मॉन्सून केरळ मध्ये दाखल झाल्याचे वृत्त आहे. मुंबईत ढगांचे आगमन झालेले आपण बघतातच आहात. तेव्हा मोसम बदलाचे वारे मुंबईत कधीही वाहू शकतात.

"येरे येरे पावसा" म्हणुन पुढचा खेळ कसा रंगतो, हे आपापल्या घरात बसुन बघुया. कोरोनाला हरवुया.

पाऊस पडला (काहींना इंग्रजी मध्ये म्हणायची सवय आहे, परंतु इथे RainDrop हा शब्द योग्य बसणार नाही) मोठा असे म्हणत, त्याच्या पाण्यासोबत सोबत कोरोनाही वाहून जाईल अशी बालसुलभ अपेक्षा करूया. कोरोना जाताना अप्रत्यक्ष नुकसान (collateral damage) करून जाणार आहे हे दिवसेंदिवस स्पष्ट होत चाललय. मग अर्थव्यवस्था असो की आरोग्यव्यवस्था, त्याचा प्रभाव सगळीकडे राहणार आहे. परंतु आपण सगळे भारतीय मिळून या विस्कटलेल्या व्यवस्था पुन्हा रुळावर आणणारच. मात्र महाराष्ट्रातील राजकीय व्यवस्थेवर याचा काय परिणाम होईल हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.

Go Corona Go.

कालाय तस्मै नमः!
धनंजय मधुकर देशमुख, मुंबई
dhan1011@gmail.com

Comments

Popular posts from this blog

TrendSpotting : New and Rising - Pickleball

20 November 2022, Mumbai Let’s have a ball, Pickleball! A school friend of mine recently got transferred from Kolkata to Mumbai. Being a fitness-oriented person, he asked me if there are any good recreation (sports) facilities nearby. Knowing that he got an apartment in the heart of Vile Parle East, I was quick to recommend Prabodhankar Thackeray Krida Sankul (PTKS) – an obvious choice for anyone living in the western suburbs to relax, unwind, train and play!   While he was thrilled to see the Olympic size swimming pool, he got curious about a game that a group of boys were playing in the open area. While the game looked like lawn tennis, but it was not. It appeared to be an easy yet fitness-oriented game to him. When I told him that it is called “ Pickleball” he was like I was kidding! It was natural, A commoner may be amused to hear “Pickleball” being name of a sport! Well, that it is true.   I then took up the opportunity to introduce him to some trainers of the...

उद्योगांवर बोलू काही - विदर्भात उद्योगांची भरारी गरजेची!

23 एप्रिल 23, मुंबई  उद्योगांवर बोलू काही - विदर्भात उद्योगांची भरारी गरजेची! पीएम मित्रा योजनेअंतर्गत केंद्र सरकारने अमरावतीमध्ये 'मेगा इंटीग्रेटेड टेक्सटाईल पार्क' घोषित केला आहे. देशात सात शहरांत अशाप्रकारचे पार्क होणार असून यामध्ये अमरावतीचा समावेश आहे. अमरावतीसह गुजरात, मध्य प्रदेश, तामिळनाडू, तेलंगण, कर्नाटक व उत्तर प्रदेश याठिकाणी पीएम मित्रा योजनेअंतर्गत सदर प्रकल्प उभारले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सातही प्रकल्पांसाठी चार हजार कोटीची गुंतवणूक होणार आहे. अमरावतीच्या प्रकल्पात १० हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. नांदगाव पेठ औद्योगीक वसाहतीजवळील पिंपळविहीर येथे सदर प्रकल्प होणार आहे, जवळपास ३ लाख लोकांना रोजगार त्‍यातून मिळणार आहे.    ‘पाच एफ’ अर्थात ‘फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन’ याअंतर्गत सदर प्रकल्प उभारले जाणार आहेत. सदर प्रकल्पासाठी केंद्र सरकार ७०० कोटी खर्च करणार असून या पार्कचे मार्केटिंग केंद्र सरकार राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर करणार आहे. यातूनच अनेक मोठे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ब्रँड अमरावतीला येणार असल्याची माहिती आहे. ...

राजकीय आरसा - श्री देवेंद्र फडणवीस

21 जुलै 2022, मुंबई राजकीय आरसा – श्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस काल सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाचा मुद्द्यावर निर्णायक बाजू घेऊन त्यांचे राजकिय आरक्षण बहाल केले. गेले अडीच-तीन वर्ष फोफावलेल्या अनिश्चिततेला पूर्णविराम मिळेल असे दिसतेय. मागच्या जुलै मध्ये तत्कालीन विरोधीपक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडणवीस यांनी सदनात घोषणा केली होती की त्यांचे सरकार आले तर तीन ते चार महिन्यात हे आरक्षण बहाल करण्यात येईल असे प्रयत्न करू. काळाची किमया बघा, आज ते उपमुख्यमंत्री आहेत आणि हा निर्णय आला. पदग्रहण केल्यापासून दोन-तीन आठवड्यात त्यांनी या विषयी निर्णायक हालचाली केल्या असे म्हंटले जाते. असो, राज्यात राजकिय स्थैर्यासाठी हे होणे आवश्यक होते. तसे बघितले गेले तर, राज्यात स्थैर्य येईल असे दर्शवणारी गेल्या चार आठवड्यात घडलेली ही एकमेव घटना नाही. याची नांदी जून मध्ये घडलेल्या राज्यसभा निवडणुकीत लागली होती. भाजपचे श्री धनंजय महाडिक यांनी भाजप आणि मित्र पक्षांकडे संख्याबळ नसतांना अटीतटीच्या लढतीत तिसरी जागा जिंकली. त्या वेळेस महाविकास आघाडीच्या तीन मतांवर आक्षेप आला होता, त्यातील...