28 मे 20
कोरोना ने सगळीकडे हाहाकार केला आहे. महाराष्ट्रराज्य याच्या गर्तेतून सुटू शकले नाही. राज्यातील रुग्णांचा आकडा आज पन्नास हजारावर गेला आहे, समाजातील सगळ्याचा स्तरातील लोकांना, कमीअधिक प्रमाणात कोरोनाची लागण झाली आहे.
काहींना आपले कर्त्तव्य बजावताना तर काहींना घरातून बाहेर ना पडल्यावरही कोरोनाची लागण झाली.
ज्यांना आपण आपली, "फर्स्ट लाइन ऑफ डिफेंस" असे म्हणतो, कोरोनायोद्धा असे म्हणतो, ते डॉक्टर्स, परिचारिका, साफसफाई कर्मचारी यांच्यासोबतच अनेक पोलीसकर्मी सुद्धा कोरोनाच्या विळख्यात सापडले. काही बातम्यांची दखल घेतली तर, राज्यात आजघडीला एक हजारावर पोलिस अधिकारी कोरोनाग्रस्त आहेत. त्यातील 22 अधिकाऱ्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. काल दिवसभरात दोनशेहून अधिक अधिकारी कोरोना बाधित झाल्याची बातमी आहे.
पोलीस हे जनतेच्या सुरक्षेची पहिलीकडी आहेत. सामान्य जनता त्यांना आपल्या सुरक्षेची हमी समजतात.
गेल्या काही महिन्यांत, राज्यातील अनेक ठिकाणी पोलिसांवर हल्ले झालेत, दगडफेक झाली. मुंबईतील एक तरुण पोलीस अधिकारी कोरोना बाधित झाल्याचे निष्पन्न होऊनही त्यांना इस्पितळात जाण्यासाठी वेळेत एम्बुलेंस ना मिळाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे आपण प्रसार माध्यमातून बघितले आहे. वाचले आहे. खरेतर हे दुर्दैवाच्या पलीकडले आहे.
26/11 च्या काळरात्री अत्याधुनिक बंदूक घेऊन निरागस माणसांची क्रूरहत्या करणार्या पाकिस्तानी आतंकवादी अजमल कसाबला, पोलीस अधिकारी शहीद तुकाराम ओंबळे यांनी आपल्या प्राणाची पर्वा ना करून, त्याला धरल्याची शौर्य गाथा आपण अनुभवली आहे. नव्या पिढीने वाचली आहे. सिनेमांत बघितली आहे. पोलीस आपले कर्तव्य बजावताना कसे कर्मठ असतात हे सर्वश्रुत आहे. त्याचा गौरवशाली इतिहास आहे. अभिमान आहे.
आजघडीला, कोरोना महामारीच्या परिवेशात, पोलिसांवर होणारे हल्ले, आणि त्यांना दिलेल्या सुविधा हे अधोरेखित करते आहे की सामान्य पोलीस अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना एका नव्या रक्षाकवचाची गरज आहे.
हवे नवे "रक्षाकवच"
हे रक्षाकवच नुसते कागदावर मजबूत असण्यापेक्षा, ते त्यांना खरोखर, शाश्वत आणि व्यवहारिक सुरक्षा देईल असे असावे.
हे कवच त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची - मानसिक समस्या, शारीरिक दुखणे, आर्थिक विवंचना, वैद्यकिय बाबी, आणि कुणाच्याही कुठल्याही आक्रमणापासून रक्षा करेल असे सर्वसामाईक असावेत. यात काही अजून बाबींचा समावेश करता येईल.
उदाहरणार्थ, जेव्हा आपना इतर देशांतील पोलीस अधिकारी बघतो, तेव्हा त्यांचा पोषाख हा एकात्मिक (integrated) असतो - त्यात बर्याच वस्तू किंवा छोटे शस्त्र असतात. त्यामुळे अधिकार्यांना वेळे वर धावपळ करावी लागत नाही. त्यामुळे अधिकाऱ्याचा आत्मविश्वासच वाढतो.
समाजकंटकांनी पोलिसांच्या वाहनांना सुद्धा लक्ष्य केल्याचे आपण अनेकदा बघितले आहे. अश्या अमानवीय आक्रमणांमुळे अनेक पोलीस अधिकारी घायाळ झाले किंवा दुर्दैवाने मृत झाले. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली.
तेव्हा पोलिसांचे वाहन हे गुन्हेगार किंवा समाजकंटकांना भीती वाटेल असे असू शकते का? सन्दर्भ हास्यास्पद वाटत असला तरी - या वाहनाचे रूप किंवा त्यामधील वस्तू आणि यंत्र सामग्री आणि यंत्रणा यांचे असे एक उत्कृष्ट (ऑप्टिमल) मॉडेल तयार केले तर?
पोलिसांच्या लाठ्या-काठ्याचा मार हा सामान्य लोकांना तो भितीदायक वाटत असला तरी, त्या लाठ्या काठ्या अट्टल गुन्हेगारांना किंवा समाजकंटकांना खरेच गर्भगळित करतात का? पोलिसांवर चालून येण्याआधी ते लाठ्या-काठ्याना घाबरतात का? दुर्दैवाने, संभाजीनगर, किंवा मुम्बईमध्ये काही ठिकाणी पोलिसांवरील हल्ल्यांमध्ये तर अशी भीती आढळली नाही.
आपल्या पोलीस अधिकाऱ्यांची मानसिक तयारी आणि इच्छाशक्ति ही नेहमीच प्रबळ होती आणि आहे, परंतु एक पोलीस अधिकारी, नेहमी दहा-वीस लोकांचा हिसंक जमाव हाताळू शकेल का? कधीतरी त्याला अपवाद होऊच शकतो, त्यामुळे कुणाचे प्राण जाऊ शकते किंवा अपंगत्व येऊ शकते.
मग, असे काही करू शकतो का, की ज्याच्यामुळे, अश्याप्रकारच्या हिंसक / जातीय जमावाची एक-दोन पोलिसांवर हल्ले करण्याची हिम्मतच होऊ नये? त्यांना भीती वाटेल असे काही?
काल-परवा मुंबई मधील एका वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याला, एका नेत्याने जाहीररित्या अपमानित केल्याचे वृत्त आपण बघितले आहे. हे वृत्त जर खरे असेल, तर याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सगळ्यांनी (राजकारणी - सत्ता / विरोधी दल) प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत.
अश्या कृतीने त्यांचे मनोबल कमी होण्याची शक्यता असते. त्यांच्या मनोबलाचे कुणी खच्चीकरण करू नये यासाठी शाश्वत प्रयत्न व्हायला हवेत.
पोलिसांचा मनोबल नेहमी उंचावर राहील याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे.
कोरोना बाधित प्रभागात कर्तव्य बजावताना लागणार्या सगळ्या सुविधा (सुरक्षाकवच, मास्क, शील्ड, ग्लोव्हज) सगळ्या पोलीस अधिकार्यांना मुबलक प्रमाणात पुरविण्यात आल्या आहेत का? या सुविधांमध्ये प्रतिबंधात्मक औषधि आणि मानसिक समुपदेशन (अधिकाऱ्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे) पण सामिल असावयास हवेत.
आजकाल एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे. विशेष करून सोशल मीडिया वर. बरेच लोकांनी महाराष्ट्र पोलिसांचा लोगो आपल्या फेसबुक / Whatsapp / ट्विटर अकाउंट वर DP म्हणून ठेवला आहे. यात सामान्य नागरिक, पक्षीय (कुठल्याही एका पक्षाचे नाही) कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी, माध्यमांतील मंडळी सगळेच असतिल.
हे कौतुकास्पदच आहे. पोलिसांवर असलेल्या विश्वासा/आदरापोटी आणि प्रेमापोटी हे त्यांनी केले असावे. लोकशाही आहे.
या लोकांनी किमान याचा भान ठेवावं की त्यांच्या प्रोफाईल वर एक महत्त्वपूर्ण / बहुमोल लोगो आहे. त्यांच्या अकाऊंट मधुन अश्लाघ्य भाषा वापरुन आपल्या विरोधकांवर टीका-टिप्पणी होऊ नये एवढी अपेक्षा.
पोलिसांच्या घरांचा आणि घर-दुरुस्तीचा विषय हा दरवर्षी असतो. विशेष करून पावसाळ्यात अनेक प्रसंग पुढे येतात. याचासुद्धा शाश्वत उपाय व्हावयास हवा. कारण जर त्यांचे कुटुंबिय सुरक्षित असतिल तर त्यांचे मनोबल उंच राहील. स्वाभाविक आहे.
एका आकडेवारीप्रमाणे, भारतात दर एक लक्षी लोकांमागे जवळपास दीडशे पोलीस आहेत. ही सरासरी आहे. मुंबईत हा आकडा शंभर-एकशे पंचवीस असावा. स्पेनमध्ये ही संख्या पाचशेच्यावर आहे. या आकडेवारीवरून पोलीस आपल्यासाठी किती अनमोल आहेत हे अधोरेखित होते.
Indiaspend.com नावाच्या संस्थेकडून ऑगस्ट 2019 मध्ये "Status of Policing in India" नावाचा एक रिपोर्ट प्रकाशित केला गेला होता. या अभ्यासात त्यांनी पोलिसांची संख्या (Strength), त्यांना मिळालेल्या सुविधा (Infrastructure) आणि त्यांच्यावर होणारा खर्च (Budget) या तीन बाबींवर आधारित एक इंडेक्स (निर्देशांक) विकसित केला होता. बावीस राज्यांच्या सूची मध्ये महाराष्ट्र (राजस्थान, ओडिशा आणि हरियाणा), 0.08 च्या इंडेक्स सोबत दुसर्या क्रमांकावर होता. भारताची सरासरी 0.06 ही होती, आणि सर्वात शेवटी 0.02 अंकावर आसाम होता. तामिळनाडू पहिल्या क्रमांकावर 0.09 निर्देशांक सोबत होते.
यावरून हे स्पष्ट होते, की महाराष्ट्रात एक सशक्त पोलीस दल आहे आणि त्यांच्या साठी योग्य पद्धतीने विचार होतो. परन्तु, जे चांगले असेल तर त्याला उत्तम किंवा सर्वोत्तम करता येते.
माजी पोलिस अधिकारी, आरोग्य तज्ञ , मानसिक शास्त्रज्ञ, विधी तज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते यांना सोबत घेऊन एक समिती या विषयवार सांगोपांग विचार करून एक नवीन रक्षाकवच तयार करू शकते. राजकीय मतभेद बाजूला ठेवून, नव्याने सर्वसमावेशक विचार व्हायला हवा. रक्षकांना, नव्याने योग्य आणि आधुनिक सुरक्षाकवच (आर्थिक /मानसिक/ शस्त्र / वैद्यकीय) देण्याची हीच ती वेळ आहे.
रक्षणकर्ता सुरक्षित तर समाज सुरक्षित. समाज सुरक्षित तर देश सुरक्षित. वेळ आली आहे की जे पोलिसांच्या कर्तव्यात बाधा घालतात, किंवा त्यांच्यावर हल्ले करतात, अश्या व्यक्तींवर योग्य चौकशी करून गुन्हे दाखल केले पाहिजे, CCTV किंवा इतर पुरावे सादर करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई - परंतु त्यांना आणि दुसर्यांवर वचक बसेल अशी कारवाई केली पाहिजे. जेणेकरून असे हल्ले, घटना घडणार नाही.
आज आपण, कोरोनाच्या युद्धात "मीच माझा रक्षक" म्हणतो. आपल्या रक्षकांना सुद्धा एक शाश्वत आणि नवीन रक्षाकवच प्रदान करण्याची वेळ आली आहे.
शुभम भवतु. 🙏
धनंजय मधुकर देशमुख, मुंबई
dhan1011@gmail.com
आपला रक्षणकर्ता, हाच आपला दुखहर्ता..

दुरदैवाने अनेक राजकीय पक्ष सैनिक व पोलिसांवर संशय घेतात.त्यांच्या कृतीचे पुरावे मागतात त्यामुळे देशविरोधी लोक यांच्या राजश्रया खाली अशी कृत्ये करतात.याबाबत अनेक कडक कायदे आहेत पण आरोपीवर या कायदान्वये कार्यवाही होत नाही.
ReplyDeleteअन तुम्ही म्हणता त्याप्रमाणे खरोखरच पोलिस व डॅाक्टर यांना सुरक्षा कवचाची आवश्यकता आहे.
होय 🙏
Delete